Pune News : पुण्याच्या पोलीस विभागासंदर्भात (Pune Police News) एक मोठी बातमी समोर आली आहे. गाडीच्या बोनेटवर बसून आरोपीची धिंड काढणं पुणे पोलिसांना आता चांगलंच महागात पडल्याचेसमोरआलंआहे. राज्य मानवाधिकार आयोगाकडून पुणे पोलिसांना (Pune Police)  दणका दिलाअसल्याचेबोललंजातआहे. खून प्रकरणातील संशयीतांची जाहीर दिंड काढल्या प्रकरणी राज्य मानवाधिकार आयोगाकडून (Maharashtra State Human Rights Commission) मुख्य सचिव डीजीपीसह पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना नोटीस पाठवण्यातआलीआहे. पुणे पोलिसांच्या या प्रतापाला राज्य मानवाधिकार आयोगाकडून 'जंगल राज' असा उल्लेख करण्यातआलाआहे. (Human Rights Commission on Pune Police)

Continues below advertisement

Human Rights Commission: राज्य मानवाधिकार आयोगाकडून 'जंगल राज' असा उल्लेख

दरम्यान, जुलै महिन्यात एका तरुणाची हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी चार संशयीतांना अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी या चारही जणांची गाडीच्या बोनेटवर बसवून दिंड काढली. सोबतच गुडघ्यावर चालायला सांगून त्यांना मारहाण देखील केली. त्यावेळी ज्या तरुणाची हत्या झाली त्याच्या कुटुंबीयांनी या संशयितांना चपलेने मारल्याचे देखील व्हिडीओमध्ये दिसत आहे.

Continues below advertisement

Pune News: पुणे पोलिसांना या संपूर्ण कारवाईचा अहवाल 20 ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आदेश

अशातच, या संपूर्ण प्रकरणाची राज्य मानवाधिकार आयोगाने गंभीर दखल घेतली आणि पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार, झोन दोनचे डीसीपी, आणि भारती विद्यापीठाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना नोटिसा बजावण्यात आले आहे. पुणे पोलिसांना या संपूर्ण कारवाईचा अहवाल 20 ऑगस्टपर्यंत सादर करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळेयाप्रकरणीपुढेनेमकंकायहोतं, हेपाहणेम्हणत्वाचेठरणारआहे.

Pune Crime News: मृताच्या आईकडून आरोपींना चपलेने मारहाणीचा प्रयत्न

दरम्यान, याप्रकरणाचाव्हिडीओसमाजमाध्यमांवरव्हायरलझाल्यानंतरसंमिश्रप्रतिक्रियाउमटल्या. अशातच आरोपींना पोलिसांच्या गाडीच्या बॉनेटवर बसवून दोरीने बांधून त्यांची धिंड काढल्याच्या वेळी एकवेगळाचआणिअनपेक्षितप्रकारघडलाहोता. यात पोलिस ठाण्याबाहेर उपस्थित असलेल्या मृत तरुणाच्या आईने संतापाच्या भरात आरोपीवर झेप घेऊन त्याला चपलेने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. यावेळीएकचगोंधळउडाला. मात्र, उपस्थित पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप करून परिस्थिती नियंत्रणात आणली.

इतर महत्वाच्या बातम्या