Maharashtra Live Blog Updates: भोंदू अशोक खरात SIT चौकशीची मोठी अपडेट; मोबाईल मधला डेटा रिकव्हर करण्याचे काम सुरू

Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...

Advertisement

मुकेश चव्हाणLast Updated: 30 Mar 2026 04:14 PM

पार्श्वभूमी

Maharashtra Live Blog Updates: नाशिकमधील भोंदू अशोक खरातला 1 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. काल खरातची पोलीस कोठडी संपल्यानंतर त्याला कोर्टात हजर करण्यात आलं. त्यानंतर त्याच्या पोलीस कोठडीत वाढ...More

सायन रुग्णालय कार्यक्रमावरून वाद, भाजप पदाधिकाऱ्यांची डावलणी? 

सायन रुग्णालयाच्या इमारतीच्या भूमिपूजन कार्यक्रमावरून महापालिका वर्तुळात नव्या वादाला तोंड फुटले आहे. भारतीय जनता पक्षाचे आरोग्य समिती अध्यक्ष हरीश भांदिर्गे यांना कार्यक्रमात प्रवेश नाकारण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. विशेष म्हणजे सायन रुग्णालय हे महानगरपालिकेच्या अखत्यारित येत असताना, आरोग्य समिती अध्यक्षांनाच डावलण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.


याचबरोबर स्थायी समिती अध्यक्ष आणि सभागृह नेते हे देखील भाजपचे असताना त्यांनाही दुय्यम वागणूक मिळाल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.


सूत्रांची माहिती अशी की, या प्रकारामुळे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये तीव्र नाराजी असून, हा मुद्दा लवकरच उच्च पातळीवर उपस्थित केला जाण्याची शक्यता आहे. महापालिकेतील सत्ताधारी आणि प्रशासन यांच्यातील समन्वयाचा अभाव पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा सुरू आहे.

© Copyright@2026.ABP Network Private Limited. All rights reserved.