Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...
Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...

पार्श्वभूमी
Maharashtra Live Blog Updates: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांत 10 वा गुन्हा दाखल झाला आहे. अशोक खरात विरोधात 8 आणि त्याच्याशी निगडीत 2 असे एकूण...More
अशोक खरातला लाजवेल असा आयआरएस अधिकाऱ्याचा प्रताप
भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांचा गौप्यस्फोट
सचिन मोटेंनी नातेवाईकांच्या मदतीने नवी मुंबईत २ हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप
महिलांसोबत अश्लील व्हिडिओ ही असल्याचा पडळकरांचा दावा
सिडको, जीएसटी, गृहनिर्माण विभागातील बडे अधिकारी सामील असल्याचा आरोप
आमदार, खासदार, कलाकारांसह सर्वसामान्यांच्या २० इमारतींचे बांधकाम रखडले
शेतरस्ते अडवणाऱ्यांच्या अडचणीत वाढ होणार
थेट ५ वर्षे सरकारी योजनांसाठी अपात्र करण्याचा सरकारचा निर्णय
मुख्यमंत्री बळीराजा शेत आणि पाणंद रस्ते योजनेच्या महत्त्वाच्या सुधारणा
शेतरस्त्यांवर अतिक्रमण करणाऱ्या किंवा रस्त्याचे नुकसान करणाऱ्यांचे आधार कार्ड आणि फार्मर आयडी तब्बल ५ वर्षांसाठी ब्लॉक करणार
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरुन महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा मोठा निर्णय
राज्य सरकारकडून शासन निर्णय जारी
परळी : मंत्री पंकजा मुंडे यांनी आज परळीतील काळाराम मंदिरातील रामनवमी उत्सवात सहभाग घेतला.यावेळी मंत्री पंकजा मुंडे भजनात रमलेल्या दिसून आल्या.राम जन्मानंतर त्यांनी पाळणाही म्हटलं तरी दिसून आले.यानंतर परळीत रामराज्य येऊ द्या अशी प्रार्थना त्यांनी प्रभू रामचंद्र समोर केल्याचे दिसून आले. दरम्यान काळाराम मंदिरात रामजन्मोत्सवासाठी मोठ्या संख्येने भाविक उपस्थित होते.
अमेरिका-इराण युद्धानंतर गॅसपासून सुरु झालेली टंचाईची झळ आता पेट्रोल-डिझेलपर्यंत येऊन पोहचलीये. अकोला जिल्ह्यातील अकोट शहरात घरगुती गॅससाठी ग्राहकांच्या मोठ्या रांगात रांगा पाहायला मिळतायेत. पेट्रोल-डिझेल संपणार अशी अफवा पसरल्याने अकोट शहरातल्या बहुतांश पेट्रोल पंपांवर अचानक गर्दी वाढलीये.. अकोटमधील विविध पेट्रोल पंपांवर पेट्रोल-डिझेल घेण्यासाठी वाहनधारक रांगेत उभे दिसून आले.. पेट्रोल संपण्याच्या भीतीने ग्राहकांनी सकाळपासूनच विविध पंपांसमोर रांगा लावल्याये.. 4 तास उलटूनही पेट्रोल भरण्यासाठी लागलेल्या वाहनांच्या रांगा कमी होत नसल्याची परिस्थिती आहेय.
शिर्डी साईमंदिरात रामजन्मोत्सव मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडलाय....रामजन्माचे किर्तन पार पडल्यानंतर चांदीच्या पाळण्यात प्रभु रामचंद्राची प्रतिमा ठेवुन रामजन्माचे स्वागत करण्यात आले. संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी सपत्नीक पाळण्याची दोर हलवत रामजन्माचे जल्लोषात स्वागत करण्यात आले...यावेळी महिला साईभक्त देखील उपस्थित होत्या.. मोठ्या भक्तिमय वातावरणात पार पडलेल्या या सोहळ्यात शेकडो साईभक्त सामिल झाले होते त्यानंतर प्रभु रामचंद्राचा पाळणा साई समाधीवर ठेवून साईबाबांची मध्यान्ह आरती पार पडली..
यवतमाळ जिल्ह्यात पेट्रोलची टंचाई असल्याचे चुकीचे चित्र उभे केले जात आहे. मात्र टंचाई नसली तरी काही जण एकाच वेळी येऊन 100 लिटर पेट्रोल मागत आहेत. काही जण कॅनमध्ये पेट्रोल मागत आहे. त्यामुळे अशा प्रकारे कुणालाही कॅनमध्ये पेट्रोल देऊ नये, अशा सूचना पेट्रोल पंप मालकांना दिल्या असल्याचे जिल्हाधिकारी डॉ विकास मीना यांनी सांगितले. या आदेशाचे उल्लंघन झाल्यास कारवाईचा इशाराही त्यांनी दिला आहे. जिल्ह्यात 820 केएल पेट्रोल आणि 1179 केएल डिझेलचा साठा उपलब्ध आहे. त्यामुळे ग्राहकांनी पेट्रोलपंपावर अनावश्यक गर्दी टाळावी, असे आवाहन जिल्हाधिकारी विकास मिना यांनी केले.
कार्ला येथील आई एकविरा देवीच्या चैत्र यात्रेला काल मोठी गर्दी उसळली होती, मात्र गडावर आई एकविरा देवीची चैत्री यात्रा संपन्न झाल्यावर, कार्ला गडावरून खाली उतरल्यावर. क्षुल्लक कारणावरून दोन गटात बाचाबाची झाल्याने, काहीसा गोंधळ उडाल्याची घटना समोर आली आहे. लाखो भाविकांच्या गर्दीत पालखी प्रस्थानानंतर दोन गटांमध्ये वाद होऊन किरकोळ दगडफेक झाली. मात्र यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने भाविकांमध्ये भीती पसरली. या घटनेनंतर लोणावळा ग्रामीण पोलीस बंदोबस्त आणि नियोजनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून, भविष्यात अशा प्रकारांना आळा घालण्यासाठी कडक उपाययोजनांची मागणी केली जात आहे.
रामनवमी अर्थात राम जन्मदिन संपूर्ण देशात साजरा केला जातोय... अवघ्या महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरीचा खंडोबा गडावर देखील राम जन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा केला जातोय... राम जन्मोत्सवा निमित्त जेजुरीतील खंडोबा मंदिरामध्ये राम-लक्ष्मण सीता आणि हनुमान यांच्या प्रतिमेची आकर्षक अशी सजावट करण्यात आलीय. त्याचबरोबर मंदिराच्या गाभाऱ्यात देखील आकर्षक अशी फुलांची सजावट करण्यात आलीय. ही सजावट भाविकांसाठी आकर्षणाचा केंद्र बिंदू ठरतोय.
चिपळूण नागरी पतसंस्थेच्या विरोधात उपोषणाला बसलेल्या तरुणाला चिपळूणमध्ये जमावाकडून अमानुष मारहाण.... घटना कव्हर करायला गेलेल्या दूरदर्शनच्या प्रतिनिधीलाही 30 ते 40 लोकांकडून लाथा बुक्क्यांनी मारले.
दूरदर्शनचे प्रतिनिधी दीपक भागवत गंभीर जखमी... रक्ताच्या उलट्या येऊ लागल्याने दीपक भागवत यांना खाजगी रुग्णालयात उपचारासाठी केलं दाखल. मारहाण करणाऱ्या विरोधात चिपळूण पोलिसात तक्रार.
राजकीय पुढार्याशी संबंधित असलेल्या चिपळूण नागरी पतसंस्थेच्या गुंडानी मारल्याचा पत्रकार दीपक भागवत आणि आंदोलक रुपेश पवार यांचा आरोप.
जिल्ह्यातील पत्रकार संघटनाकडून घटनेचा निषेध.
मारहाणीचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल.
भोंदू बाबा अशोक खरात यांच्या शिवनिका संस्थांचे बँक अकाऊंट सील
आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू
विशेष तपास पथकाकडून (SIT) मालमत्तेची माहिती मागवली
कुटुंबीयांच्या नावावर असलेल्या जमीन, घर, दुकानांची चौकशी
नोंदणी विभागाकडून राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू
कोट्यवधी रुपयांची आर्थिक माया उघड होण्याची शक्यता
मालमत्ता खरेदीसाठी पैसा कुठून आला, याचा तपास
बेनामी मालमत्ता असल्याचा संशय
पुढील 2–3 दिवसांत तपासाला वेग येणार
मुंबईच्या सहार डोमेस्टीक एअरपोर्टवर पून्हा एकदा धमकीची अफवा
इंडिगो मुंबई ते गाझियाबाद फ्लाईट मध्ये बाॅम्ब ठेवल्याची अफवा
सहार एअरपोर्टच्या मुख्यनियंत्रण कक्षाकडे माहिती मिळताच पोलिसांना याची कल्पना देण्यात आली
तसेच फ्लाईटची तपासणी केली असता कोणतीही संशयास्पद गोष्ट आढळून आली नाही
या प्रकरणी एकाला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती सूत्रांच्या हवाले मिळत आहे
या ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तीने त्याच्या परिचयाचा व्यक्ती फ्लाईटने आला तेव्हा मुंबई ते गाझियाबाद या फ्लाईटमध्ये बाॅम्ब असल्याचे सांगितल्याचा दावा केला आहे
या प्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत
भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणात पोलिस तपासाला नवे वळण
बड्या आयुर्वेदिक औषधे आणि जडीबुटी दुकानाच्या मालकाची चौकशी होणार
खरातने या दुकानातून हरिणाची कस्तुरी आणि जडीबुटी खरेदी केल्याचा संशय
नाशिकरोड परिसरातील एक ज्वेलरही पोलिसांच्या रडारवर
संबंधित ज्वेलर्सकडून बनावट रत्नांची खरेदी केल्याची माहिती
अंधश्रद्धा आणि फसवणूक प्रकरणातील पुरावे जोडण्याचा पोलिसांचा प्रयत्न
आर्थिक व्यवहार आणि धार्मिक विधींचा संबंध तपासात उलगडण्याची शक्यता
वाळू घाटावरून निघणाऱ्या ट्रॅक्टर आणि भरधाव टिप्परमुळे गावातील रस्ते धुळेमय झाले असून ग्रामस्थांना या धुळीचा त्रास होतोय. त्यामुळे या रस्त्यांवर पाणी मारावे अशी मागणी करणाऱ्या ग्रामस्थांवरच वाळूघाटाच्या चौकीदारानं देशी कट्ट्याच्या दस्त्यानं डोक्याच्या मागील भागात जबर मारहाण केली. यानंतर संतप्त ग्रामस्थांनीही चौकीदाराला मारहाण केल्याची घटना भंडारा जिल्ह्याच्या पवनी तालुक्यातील शिवनाळा वाळू घाटावर काल सायंकाळी घडली. पवनी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून देशी कट्टा बाळगणाऱ्या चौकीदाराला अटक करण्यात आली आहे. शैलेश इटनकर (२८) असं जखमी झालेल्या इसमाचं नाव आहे. तर, नूरबेग अब्बास बेग असं पोलिसांनी अटक केलेल्या चौकीदाराचं नावं आहे. हरित लवादाच्या बंदी नंतर दोन दिवसांपूर्वीच भंडारा जिल्ह्यातील सर्व वाळू घाट सुरू झाले असून अशी घटना घडल्याने आता प्रचंड खळबळ उडाली आहे. काही दिवसापूर्वी चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यात वाळू वाहतुकीवरून घडलेल्या घटनेत एकाची हत्या झाली होती, त्यामुळे भंडारा महसूल आणि पोलीस प्रशासनान आता इथं खबरदारी घेण्याची गरज आहे.
नाशिकच्या अतिप्राचीन काळाराम मंदिरात आज दुपारी 12 वाजता राम जन्माचा उत्सव मोठ्या भक्तिभाव पुर्ण वातावरणात साजरा केला जाणार आहे,
सकाळ पासूनच भाविकांची दर्शनासाठी गर्दी होत आहे, कुंभमेळा च्या पार्श्वभूमीवर राम काल पथ ची निर्मिती होत आहे, त्यासाठी पूर्व दरवाजा बंद ठेवण्यात आला असून उत्तर आणि दक्षिण दरवाजा चा उपयोग भाविकांना करावा लागत आहे, राम नवमीच्या पार्श्वभूमीवर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.
राम नवमी निमित्ताने गुढीपाडवा पासून विविध धार्मिक कार्यक्रमाचे अयोजन करण्यात आल असून विद्युत रोषणाई आणि फुलांनीमंदिर सजविण्यात आले आहे
रायगड मधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांनी आपल्या पदाचा त़डकाफडकी राजिनामा दिला आहे. होमी भाभा सामाजिक विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनिश कामत यांच्याकडे या विद्यापीठाचा अतिरिक्त कार्यभार सोपवण्यात आला आहे. राज्यपालांच्या आदेशावरून कुलगुरू काळे यांनी राजीनामा दिल्याचे सांगितले जाते मात्र त्यामागचे कारण स्पष्ट झालेलं नाही.
महाड शहरातील रस्त्यांवर व्यावसायिकांनी मोठ्या प्रमाणात केलेल्या अतिक्रमणावर महाड नगर पालिकेने अखेर हातोडा चालवून अनधिकृत बांधकाम पाडण्याचा निर्णय घेतला.या अनधिकृत बांधकामांवर महाड नगर पालिकेचे उपनगराध्यक्ष संदिप जाधव यांनी अतिक्रमणाचा प्रश्न उपस्थित करीत उपोषणाचा इशारा दिला होता.त्यानंतर नागरीकांच्या वाढत्या तक्रारींनंतर महाड नगर पालिकेने अखेर अतिक्रमणांवर कारवाई केली आहे.JCB, डंपर या यंत्रणांसह नगर पालिकेच्या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात आलीय .व्यावसायिकांचे नुकसान टाळले जावे यासाठी नगर पालिकेने दवंडी देऊन कठोर कारवाईचा अगोदरच इशारा दिला होता.
ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ.जयसिंगराव पवार यांचं निधन
वयाच्या 85 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज, शाहू महाराज यांच्यासह महाराणी ताराराणी यांच्याबाबत जयसिंगराव पवार यांनी केलं आहे संशोधनपर लिखाण
डॉ जयसिंगराव पवार हे आचार्य आत्रे, कोल्हापूर भूषण पुरस्कारसह अन्य महत्त्वाच्या पुरस्कारांनी सन्मानित
रामनवमीच्या पार्श्वभूमीवर नागपूरच्या प्रसिद्ध पोद्दारेश्वर राम मंदिरात भाविकांची गर्दी पाहायला मिळत आहे... सकाळपासूनच रामभक्त प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी मंदिरात पोहोचत आहेत.. यंदा मंदिराचा प्रवेशद्वार आणि सभामंडपात नारळाची सुंदर आरास तयार करण्यात आली आहे... तब्बल 17000 नारळाचा वापर यासाठी करण्यात आला आहे.. आज बारा वाजता राम जन्मोत्सव साजरा केला जाईल.. त्यानंतर संध्याकाळी चार वाजता प्रभू श्रीराम, सीतामाता आणि लक्ष्मण यांच्या मूर्ती खास रथावर ठेवून शोभायात्रा काढली जाईल.. चार वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीमध्ये प्रभू श्रीरामाची आरती केली जाईल... त्यानंतर परंपरेनुसार ही शोभायात्रा नागपूर शहरातील विविध मार्गातून जाईल आणि मध्यरात्रीच्या सुमारास शोभायात्रेची मंदिरातच सांगता होईल... यंदा पोदारेश्वर राम मंदिरातून निघणाऱ्या शोभायात्रेचा साठवा वर्ष आहे...
- मुख्यपृष्ठ
- क्राईम
- Maharashtra Live Blog Updates: राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडींचे सर्व अपडेट्स...