Chhatrapati Sambhaji Nagar News: छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) वैजापूरमध्ये शौचालयामध्ये (Toilet) जाण्याच्या किरकोळ कारणावरून दोन गट आपसात भिडल्याचे पाहायाला मिळाले. तर यावेळी जमावाने लॉज चालक आणि मालकाला चक्क लोखंडी रॉडने फिल्मी स्टाइल बेदम मारहाण करीत रक्तबंबाळ केल्याची घटना समोर आली आहे. वैजापूर शहराजवळ असलेल्या मुंबई-नागपूर महामार्गावर ही घटना घडली. तर या घटनेनंतर पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे. तौसीफ हनिफोद्दीन शेख (रा. पीरजाद गल्ली), सय्यद अजहर कदीर (रा. खान गल्ली), जमील सगीर शेख (रा. वैजापूर) या तीन आरोपींना पोलिसांनी तत्काळ अटक केली आहे. तर या घटनेत इंगळे वस्तीवर राहणारे लॉज चालक आकाश मापारी आणि त्यांचे वडील संजय मापारी 'जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी रात्री आरोपी तौसीफ, अजहर आणि जमील द्रोपदी लॉजवर असलेल्या शौचालयात जाण्याच्या कारणावरून लॉज चालक आणि मालकांत अगोदर किरकोळ वाद झाला. या दरम्यान, तीन आरोपी सोबत असलेले दहा ते पंधरापण घटनास्थळी पोहचले. त्यांनी फिल्मीस्टाइल लॉज चालक आकाश मापारी यांच्यावर लोखंडी रॉडने हल्ला चढविला. मुलाला वाचविण्यासाठी वडील संजय मापारी गेले असता आरोपींनी त्यांनाही रॉडने बेदम मारहाण केली. ही सर्व घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. 


पोलिसांकडून आरोपींची धरपकड...


घटनेची माहिती मिळताच विजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय लोहकरे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेत, पोलिसांचे पथकाने जखमींना रुग्णालयात दाखल केले. घटनेनंतर पोलिसांनी सीसीटीव्ही आणि जखमी व्यक्तीकडून माहिती गोळा करत रात्रीच पोलिसांचे पथक तयार करून विविध ठिकाणी आरोपींना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू केली. तर पोलिसांनी तीन आरोपींना बेड्या ठोकल्या आहे. या घटनेनंतर आकाश मापारी यांनी फिर्याद दिल्यानंतर वैजापूर पोलीस ठाण्यात आरोपी विरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न आणि विविध कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


शहरात तणावाचे वातावरण...


या घटनेनंतर रात्री शहरात तणाव निर्माण झाले होते. त्यामुळे शहरात शांतता राहावी यासाठी पोलीस एक्शन मोडमध्ये आली असून कायदा आणि सुव्यवस्था खराब करणाऱ्या विरुद्ध पोलिसांनी सक्त कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. या घटनेतील आरोपींना शोधण्यासाठी स्थानिक पोलीस सोबत शनिवारी गुन्हे शाखेचे पथक शहरात दाखल झाले असून, त्यांनी फरार 10  ते 15 आरोपीची शोध मोहिम सुरू केली आहे. मात्र परिस्थिती नियंत्रणात असून, पोलीस लक्ष ठेवून आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या : 


छत्रपती संभाजीनगरमध्ये निघणाऱ्या 'हिंदू जनगर्जना मोर्चा'ला पोलिसांनी परवानगी नाकारली