Maharashtra ATS : पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टी (Shahzad Bhatti) याच्याशी सोशल मीडियाच्या माध्यमातून कथित संपर्कात असलेल्या व्यक्तींविरोधात महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मोठी कारवाई सुरू केली आहे. या कारवाईअंतर्गत राज्यभरातील 150 हून अधिक ठिकाणी एकाच वेळी शोधमोहीम (Search Operation) सुरू केलं आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, कुर्ला, वांद्रे, जोगेश्वरी, नवी मुंबई, मीरा रोड, भाईंदर, सांगली, सातारा, छत्रपती संभाजीनगर तसेच अन्य अनेक ठिकाणी ATSचे (Maharashtra ATS Raids) छापे सुरू आहेत.
प्राथमिक माहितीनुसार, पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टी याच्याशी सोशल मीडियाद्वारे कथित संपर्क असल्याच्या संशयावरून 150 हून अधिक व्यक्ती ATSच्या रडारवर असून, त्याच अनुषंगाने ही व्यापक शोधमोहीम राबविण्यात येत आहे. दरम्यानया शोधमोहीमसंदर्भातअद्यापकुठलीहीअधिकृतमाहितीसमोरआलेलीनसलीतरीयासर्चऑपरेशनचाचर्चेनंएकचखळबळउडालीआहे.
Shahzad Bhatti : शहजाद भट्टीशी संबंधित कथित दोन मॉड्यूल्स उद्ध्वस्त; दिल्ली आणि पंजाबमधून सहा संशयित कार्यकर्त्यांना अटक
दिल्ली पोलिसांच्या 'स्पेशल सेल'ने बुधवारी शहजाद भट्टीशी संबंधित कथित दोन गट (मॉड्यूल्स) उद्ध्वस्त करून दिल्ली आणि पंजाबमधून सहा संशयित कार्यकर्त्यांना अटक केली होती; त्यानंतर महाराष्ट्रात या धाडी टाकण्यात आल्या आहेत. संबंधित यंत्रणेने सांगितले की, ज्या व्यक्ती सोशल मीडियाद्वारे भट्टीच्या संपर्कात होत्या, त्यांना या कारवाईत लक्ष्य करण्यात आले. या तपासाबाबतची अधिक माहिती अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही. तपासकर्त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, संशयितांनी दिल्लीतील सिव्हिल लाइन्स परिसरातील 'न्यू पोलीस लाइन्स', आनंद विहार आंतरराज्य बस टर्मिनस (ISBT), एक रेल्वे स्थानक आणि अनेक गजबजलेल्या बाजारपेठांची रेकी (पाहणी) केली होती. या ठिकाणांचे व्हिडिओ संशयितांच्या मोबाईल फोनमध्ये आढळून आले असून, ते एका बंदी घातलेल्या मेसेजिंग ॲप्लिकेशनद्वारे भट्टीला पाठवण्यात आले होते
Maharashtra ATS : चांद मियाँला देण्यात आली होती माल पोहोचवण्याची जबाबदारी
सूत्रांनुसार, तपासादरम्यान मिळालेल्या सोशल मीडिया चॅट्समधून असे उघड झाले आहे की, भट्टी कथितपणे दानिश, जो चांद मियाँ म्हणूनही ओळखला जातो, त्याला माल पोहोचवण्याबाबत आणि साठवण्याबाबत सूचना देत होता. तपासकर्त्यांचा असा विश्वास आहे की, हा माल हल्ल्यांमध्ये वापरण्यासाठी असलेले पेट्रोल बॉम्ब होते. हे लक्षात घेण्यासारखे आहे की, दिल्ली पोलिसांच्या विशेष पथकाने यापूर्वी तपासादरम्यान राजघाटामागील विजय घाटावरून पेट्रोल बॉम्ब जप्त केले होते.
Shahzad Bhatti Crime News : 20,000 रुपयांची लाच देऊ करण्यात आली
तपासकर्त्यांच्या मते, अटक केलेले सहा आरोपी पाकिस्तानात राहणाऱ्या इतर 10 व्यक्तींच्या संपर्कात होते, जे कथितपणे भट्टीसाठी काम करत होते. या मोठ्या कटात त्यांची भूमिका आणि कथित सहभागाची चौकशी सुरू आहे. तपासकर्त्यांनी सांगितले की, दानिश, जो चांद मियाँ म्हणूनही ओळखला जातो, त्याला दिल्लीतील हल्ल्यांसाठी नियोजन आणि टेहळणी करण्याचे काम सोपवण्यात आले होते. ऑपरेशन यशस्वी झाल्यास त्याला 20,000 रुपये देण्याचे वचन देण्यात आले होते. त्याचा साथीदार सलमाननेच हल्ल्याचे चित्रीकरण करून ते फुटेज भट्टीला पाठवल्याचा आरोप आहे.
Shahzad Bhatti : कोणआहे पाकिस्तानातील गँगस्टर शहजाद भट्टी?
शहजाद भट्टी हा पाकिस्तानातील लाहोरचा रहिवासी असून, दुबईतून डोगर गँग आणि इतर टोळ्यांशी संबंधित नेटवर्क चालवतो. तो सोशल मीडियावर भारतीय तरुणांना सहज ओढून कट्टरतावादी विचारसरणी आणि हेरगिरीकडे नेतो. गेल्या काही महिन्यांत भारतातील दहशतवादी भरती आणि गुप्तहेर प्रकरणांमध्ये त्याचं नाव वारंवार समोर आलं आहे. महाराष्ट्रातही काही तरुण त्याच्याशी संपर्कात असल्याची माहिती मिळाल्यानंतर एटीएसने हे नेटवर्क तोडण्यासाठी मोठी कारवाई केली. शहजाद भट्टीच्या उलटगणती आता सुरू झाली असून, त्याला भारतात पकडण्यासाठी प्रयत्न तीव्र झाले आहेत.
पाकिस्तानस्थित सोशल मीडिया व्यक्तिमत्त्व शहजाद भट्टी हा दहशतवादाशी संबंधित कारवाया आणि कट्टरतावादी नेटवर्कशी कथित संबंधांमुळे भारतीय सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर आला आहे. एकेकाळी ऑनलाइन कॉन्टेन्ट (content) निर्मितीच्यामाध्यमातून सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग निर्माण करण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या भट्टीवर आता डिजिटल प्लॅटफॉर्म्सच्या माध्यमातून असुरक्षित तरुणांची भरती करण्याचा आणि त्यांना गुन्हेगारी व अतिरेकी नेटवर्कशी जोडण्याचा आरोप आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
