Maharashtra ATS Action: फुटबॉल क्लबच्या नावाखाली युवकांचे ब्रेनवॉशिंग, युवकांना केरळ आणि बंगालमधील कट्टरतावादी छावण्यांमध्ये धाडलं?; ATSच्या छापेमारी धक्कादायक वास्तव उघड
Maharashtra ATS Action: महाराष्ट्र एटीएसने तीन दिवसांपूर्वी पुसद (जि. यवतमाळ) आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल 21 ठिकाणी सर्च ऑपरेशन (Terrorist Organization) राबवले होते.

Maharashtra ATS Action: एटीएसच्या (ATS Action) वतीने नुकतंच यवतमाळच्या पुसद आणि अहिल्यानगरसह जिल्ह्यातील तब्बल 21 ठिकाणी सर्च ऑपरेशन राबवले होते. गेल्या रविवारी करण्यात आलेल्या या कारवाईत आता अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहे. महाराष्ट्र एटीएसने तीन दिवसांपूर्वी पुसद (जि. यवतमाळ) आणि अहिल्यानगर जिल्ह्यातील तब्बल 21 ठिकाणी सर्च ऑपरेशन (Terrorist Organization) राबवले होते. एटीएसच्या सूत्रांच्या माहितीनुसार, या सर्च ऑपरेशनदरम्यान पुसद येथे राहणाऱ्या काही मुस्लिम युवकांचे मोठ्या प्रमाणावर रॅडिकलायझेशन (कट्टरपंथी विचारांकडे वळवणे) केले जात असल्याची माहिती समोर आली आहे. अहिल्यानगर व यवतमाळमध्ये एटीएसने 21 ठिकाणी छापे टाकून फुटबॉल क्लबच्या नावाखाली चालणाऱ्या कट्टरतावादी नेटवर्कचा पर्दाफाश केल्याची माहिती आहे.
ATS Actions : युवकांना खेळाच्या बहाण्याने केरळ आणि बंगालमधील कट्टरतावादी छावण्यांमध्ये भरती
दरम्यान, युवकांना खेळाच्या बहाण्याने केरळ आणि बंगालमधील कट्टरतावादी छावण्यांमध्ये पाठवले जात असल्याचीही माहिती समोर आली आहे. ATSच्या 20 पथकाने यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड आणि पुसदच्या वसंतनगर भागात हे छापे टाकले होते. पहाटे 3 वाजता पासून दुपारी 12 पर्यंत पुसदच्या वसंतनगर परिसरातील घरी छापमारी सुरु होती. तर पुसद व उमरखेड या भागातील काही तरुण हे कट्टर धर्मांध आणि देश विरोधी कारवाईत सक्रिय सहभागी असल्याचीही माहिती एटीएस आणि सुरक्षा एजन्सीजला मिळाली होती. त्यानुसार राबलेल्या या छापेमारीत कागदपत्रे, मोबाईल आणि इतर डिजिटल डिव्हाइसची तपासणी केली होती. त्याच्यातून फुटबॉल क्लबच्या नावाखाली युवकांचे ब्रेनवॉशिंग सुरू असल्याचे धागेदोरे समोर आल्याची माहिती आहे.
Maharashtra ATS Action: सर्व तरुण अतिउच्च शिक्षित; टेररिस्ट मॉड्युल'मधील 'की पर्सन'
एटीएसने अहिल्यानगर आणि यवतमाळमध्ये टाकलेल्या छाप्यात अनेक धक्कादायक बाबी उघड. ज्या संशयीतांच्या घरांवर छापे टाकले ते सर्व तरुण अतिउच्च शिक्षित आहे. हे देशभरातील काही 'टेररिस्ट मॉड्युल'च्या संपर्कात आल्याची माहिती. गेल्या सहा महिन्यापासून या तरुणांच्या संशयास्पद कारवायांकडे एटीएसचे लक्ष होते. छापा टाकण्यात आलेले तरुण आकार घेत असलेल्या 'टेररिस्ट मॉड्युल'मधील 'की पर्सन'. यांच्या माध्यमातून मुस्लिम तरुणांची दहशतवादी संघटनांमध्ये मोठ्या भरतीची योजना होती. यवतमाळमध्ये 14 आणि अहिल्यानगरमध्ये सात ठिकाणी पथकांनी केली होती कारवाई. प्रत्येक पथकाच्या कारवाईत नोंदवली गेलीत वेगवेगळी निरीक्षणे. प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या तरुणांचा इंटरेस्ट पाहून त्या पद्धतीने त्यांचं ब्रेन वॉशिंग होत असल्याची माहिती आहे. पैसा, खेळाची संधी, नोकरी अशी वेगवेगळी आमिषा दिली गेल्याची माहिती आहे. या छाप्यानंतर अद्यापही कुणाला अटक झाली नाही. मात्र, या छाप्यानंतर मिळालेल्या माहिती मधून एक मोठं दहशतवादी कनेक्शन उघड करण्यात एटीएसला यश आलं आहे.
























