Maharashtra ATS Action: राज्यभरात एटीएसकडून धाडींचं सत्र, यवतमाळमध्ये 14 तर अहिल्यानगरमध्ये 7 ठिकाणी छापेमारी; पोलिसांचा मोठा बंदोबस्त, नेमकं कारण काय?
Maharashtra ATS Actions : राज्यभरात सध्या सुरु असलेल्या एटीएसच्या कारवाईमुळे मोठी खळबळ उडाली आहे. अशातच विदर्भातील यवतमाळमध्ये(Yavatma) पुसद आणि उमरखेडमध्ये 14 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे.

Maharashtra ATS Actions : राज्यभरात सध्या सुरु असलेल्या एटीएसच्या कारवाईमुळे (ATS Action) मोठी खळबळ उडाली आहे. अशातच विदर्भातील यवतमाळमध्ये (Yavatma) पुसद (Pusad) आणि उमरखेडमध्ये (Umarkheed) 14 ठिकाणी छापेमारी करण्यात आली आहे. तर अहिल्यानगरमध्ये (Ahilyanagar) 7 ठिकाणी एटीएसचे छापे पडल्याची माहिती आहे. दहशतवादी संघटनांच्या (Terrorist Organization) संपर्कात राहून अनेक तरुणांना सक्रिय करण्याच्या हालचाली आढळल्यानंतर एटीएसनं सर्च ऑपरेशन राबवलं आहे. त्या अनुषंगाने अनेक भागात जवळपास 21 ठिकाणी एटीएसचे सकाळपासून सर्च ऑपरेशन सुरु असल्याची माहीती आहे. सोबतच या प्रकरणी अनेकांना ताब्यात घेऊन चौकशी केली जात असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ATS Actions : विदर्भात 4 ते 5 ठिकाणी छापे, एकट्या यवतमाळ जिल्ह्यात जवळपास एटीएस 20 पथक दाखल
राज्यात काल रात्रीपासून अनेक भागात ATS ची गोपनीय कारवाई सुरुये. विदर्भातही 4 ते 5 ठिकाणी ATS पथकाने कारवाई सुरू केली आहे. यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड आणि पुसद गावात ATS पथकाची काल रात्रीपासून कारवाई सुरु आहे. तर अकोला जिल्ह्यातील उरळ पोलीस स्टेशनअंतर्गत काही भागातही कारवाई सुरू आहे. एटीएसचे 20 पथक हे रात्रीपासून उमरखेड आणि पुसद गावात तळ ठोकून आहे. ATS प्रमुख चंद्रकिशोर मीणा यांच्या नेतृत्वात विविध पथके तयार करण्यात आले असून राज्यात अनेक ठिकाणी काल रात्रीपासून हे पथके तळ ठोकून आहेत. एकट्या यवतमाळ जिल्ह्यात जवळपास एटीएस 20 पथक दाखल आहे. या ठिकाणी स्थानिक पोलिसांसह आयपीएस अधिकारी देखील हजर आहे. त्यामुळे या कारवाईत नेमकं काय घडतं हे पाहणं महत्वचे ठरणार आहे.
Maharashtra Police: स्थानिक पोलिसांसह आयपीएस अधिकारी हजर, पोलिसांचा मोठा बंदोबस्त
अत्यंत गोपनीय पद्धतीनं राज्यातल्या अनेक ठिकाणी एटीएस पथकाकडून चौकशी सुरु आहे. स्थानिक घरांमध्ये जात लोकांकडून चौकशी केल्या जात आहे. मात्र कारवाईत पथकाने अद्यापपर्यत कुणालाही ताब्यात घेतले नाही, अशी माहिती सूत्रांनी दिलीये. संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर एटीएससह तपास यंत्रणांनी काल मध्यरात्रीपासून राज्यात बहुतांश जिल्ह्यातीळ विविध परिसरात कारवाईला सुरुवात केलीय. कारवाई सुरू असताना यावेळी मोठा बंदोबस्त ठेवला जात आहे.
आणखी वाचा
























