एक्स्प्लोर

Mahadev Munde Death Case: परळीतील महादेव मुंडेप्रकरणी आज दोघांची 'नार्को', एकाची 'ब्रेन मॅपिंग' चाचणी; आतापर्यंत काय काय घडलं?

Mahadev Munde Death Case: महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणी आयपीएस पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखाली एसआयटीची स्थापना करण्यात आली. आता एसआयटीकडून मुंबईतील ज्ञानवैज्ञानिक प्रयोगशाळेत दोघांची नार्को तर एकाची ब्रेन मॅपिंग टेस्ट केली जाणार आहे.

Mahadev Munde Death Case: बीडच्या परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांच्या निघृण हत्या (Mahadev Munde Death Case) प्रकरणात दोघांची 'नार्को', एकाची 'ब्रेन मॅपिंग' चाचणी करण्यात येणार आहे. या प्रकरणात  तपास करत असलेल्या एसआयटीने तसा निर्णय घेतला आहे. महादेव मुंडे यांची हत्या होऊन दोन वर्षांहून अधिक काळ लोटला असून, आता या प्रकरणाचा तपास अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. आयपीएस पंकज कुमावत यांच्या नेतृत्वाखालील एसआयटीने वैज्ञानिक चाचण्यांवर लक्ष केंद्रित केले असून, मंगळवारी मुंबईच्या न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत दोघांची नार्को टेस्ट तर एकाची ब्रेन मॅपिंग चाचणी होणार आहे. यापूर्वी तिघांची नार्को चाचणी पूर्ण झाली आहे. मंगळवारी उर्वरित तिघांपैकी दोघांची नार्को आणि ब्रेन मॅपिंग चाचणी करण्यात येईल.

'ते' सहा जण कोण? (Mahadev Munde Death Case)

एसआयटीने सात जणांच्या नार्को टेस्टचा प्रस्ताव पाठवला होता. एका संशयिताला लिव्हरचा त्रास असल्याने वैद्यकीय कारणास्तव त्याची तपासणी नाकारण्यात आली. आता 6 जणांच्या चाचणीला परवानगी मिळाली. ज्या पहिल्या तिघांची चाचणी पार पडली, ते सर्व जण महादेव मुंडे यांच्याशी आर्थिक व्यवहाराने जोडलेले होते, तर मंगळवारी होणाऱ्या चाचण्यांमधील दोघे जण वाल्मीक कराड याच्या घरी कामाला होते  तिसरा त्यांचा मित्र असल्याची माहिती समोर येत आहे.

कसा झाला आहे या प्रकरणाचा तपास- (Mahadev Munde Death Case)

एसआयटीने गेल्या सहा महिन्यांत सुमारे 200 लोकांची कसून चौकशी केली आहे. 150 हून अधिक संशयित आणि 500 हून अधिक लोकांचे कॉल डिटेल्स तपासण्यात आले. महादेव मुंडे हे पिग्मी एजंट असल्याने प्रामुख्याने पैशांच्या व्यवहारातून ही हत्या झाली का, यादृष्टीने सखोल तपास सुरू आहे. यासह प्लॉटिंगचे व्यवहार, वैयक्तिक वाद आणि कौटुंबिक बाबी अशा सर्व बाजूंनी तपासाची चक्रे फिरली आहेत.

नेमकं प्रकरण काय? (Mahadev Munde Death Case)

20 ऑक्टोबर 2023 रोजी  परळीतील व्यापारी महादेव मुंडे यांचापरळीतील तहसील कार्यालयासमोर निर्घुणपणे खून करण्यात आला. या घटनेत आत्तापर्यंत एकाही आरोपीला अटक नाही. त्यामुळे मुंडे कुटुंब आजही न्यायाच्या प्रतीक्षेत आहे. भाजप आमदार सुरेश धस यांनी केलेल्या दाव्यानुसार, महादेव मुंडेंची हत्या केवळ 12 गुंठे जमिनीच्या किरकोळ कारणावरून झाली आहे. आणि यात वाल्मिक कराड आणि त्याच्या मुलाचा हात असल्याचा आरोप आहे. काही दिवसांपूर्वी वाल्मीक कराडचे सहकारी बाळा बांगर यांनी महादेव मुंडे यांच्या हत्या प्रकरणात अनेक खळबळजनक दावे केले आहेत. हत्या केल्यानंतर वाल्मीक कराडनं टेबलावर मुंडेंचं कातड हाड आणि रक्त आणून ठेवलेलं होतं, दावा बाळा बांगर यांनी केला होता.

संबंधित बातमी:

महादेव मुंडे प्रकरणात वेगवान घडामोडी, संशयित आरोपी देश सोडून जाण्याच्या तयारीत? अलीकडच्या काळात काय काय घडलं?

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

धक्कादायक! चॉकलेटच्या बॉक्समधून गांजाची तस्करी, पुणे विमानतळावर तब्बल 8.71 कोटी रुपयांचा गांजा जप्त
धक्कादायक! चॉकलेटच्या बॉक्समधून गांजाची तस्करी, पुणे विमानतळावर तब्बल 8.71 कोटी रुपयांचा गांजा जप्त
Baramati Accident News: काम आटोपून घरी परतताना काळाचा घाला, बारामतीत भीषण अपघातात ग्रामसेवकाचा दुर्दैवी अंत, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको
काम आटोपून घरी परतताना काळाचा घाला, बारामतीत भीषण अपघातात ग्रामसेवकाचा दुर्दैवी अंत, संतप्त ग्रामस्थांचा रास्ता रोको
Pune Porsche Accident : कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; पोराच्या हाती 17 व्या वर्षी पोर्शे कारचं स्टिअरिंग देणाऱ्या विशाल अग्रवालांना जामीन मंजूर
कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात मोठी अपडेट; पोराच्या हाती 17 व्या वर्षी पोर्शे कारचं स्टिअरिंग देणाऱ्या विशाल अग्रवालांना जामीन मंजूर
Beed News : बीडच्या नगर रोडवर मारहाणीनंतर संतापाचा उद्रेक; गंभीर जखमी अवस्थेतील व्यक्तीकडून चहाचा गाडा उलथवला, व्हिडिओ व्हायरल
बीडच्या नगर रोडवर मारहाणीनंतर संतापाचा उद्रेक; गंभीर जखमी अवस्थेतील व्यक्तीकडून चहाचा गाडा उलथवला, व्हिडिओ व्हायरल
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar Politics : फोडाफोडीचा मॅटर, फकडली कॉलर Special Report
Iran Israel Effect On Industry : गॅस रखडला, उद्योगांचा श्वास कोंडला Special Report
LPG Gas Shortage In Hotels : व्यावसायिक गॅस मिळेना, हॉटेलमध्ये काही शिजेना Special Report
Nagpur Buffalo Attack : अगं अगं म्हशी; वळूनंतर आता मारकुट्या म्हशीचा धुमाकूळ Special Report
Sunetra Pawar On Womens : लाडकी वहिनी, लाभार्थी सरकारी बहिणी Special Report

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sunetra Pawar: अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
अजितदादांचं नाव येताच सुनेत्रा पवार भावुक, शेजारी बसलेल्या आदिती तटकरेंच्या डोळ्यातही पाणी  
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
JNPA निर्णयामुळे निर्यातदारांना दिलासा; अडकलेल्या फळे-भाजीपाला कंटेनरवरील साठवण शुल्क माफ
Gas Shortage : गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
गॅस टंचाईवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; घरगुती गॅसला प्राधान्य, नंतर खते, उद्योग आणि व्यावसायिक पुरवठा
ECA 1955 Explained : अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
अत्यावश्यक वस्तू कायदा म्हणजे काय? इतिहास, तरतुदी आणि सरकार हा कायदा का लागू करते?
ESMA Act Explained : ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
ESMA कायदा म्हणजे काय? आवश्यक सेवा पुरवठा कायद्याचा इतिहास आणि नियम जाणून घ्या
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
जिष्णू देव वर्मा महाराष्ट्राचे 22 वे राज्यपाल; हायकोर्टाच्या न्यायमूर्तींकडून शपथ, मुख्यमंत्री फडणवीसांकडून अभिनंदन
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
मुंलुंड डम्पिंग ग्राऊंडबाबत शासनाचे लेखी उत्तर येताच नार्वेकरांचे पत्र; कॅन्सर रुग्णालयासाठी 10 एकर जागा द्या
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
युद्धस्य करूण कथा... शरण न गेलेला माणूस, एका लोहाराच्या पुतळ्यासमोर का नतमस्तक होतात लोक
Embed widget