Madha Crime News : माढ्याच्या अरण गावातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे.  यात अपहरण झालेल्या दहा वर्षांच्या शाळकरी मुलाची अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आली आहे. दगडाने ठेचून या शाळकरी मुलाची हत्या करण्यात आली आहे. कार्तिक बळीराम खंडागळे असं हत्या झालेल्या मुलाच नाव आहे. कार्तिक हा 15 जुलै रोजी याच शाळेच्या मैदानावरून अचानक गायब झाला होता. प्राथमिक अंदाजानुसार कार्तिकचं अपहरण झालं असावा, असा अंदाज यावेळी वर्तवण्यात आला होता. दरम्यान घटनेची माहिती समजताच पोलिसांनी आणि कुटुंबियानी शोध घेतला मात्र  कार्तिकचा कुठेही शोध लागला नाही.

चार दिवसानंतर कालव्यात सापडला मृतदेह

दरम्यान, चार दिवसानंतर अखेर कार्तिक खंडागळेचा आज  मृतदेह आढळून आला आहे. कालव्यात हा मृतदेह सापडून आला असून यात अतिशय क्रूरपणे हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. मात्र या हत्येचे नेमकं कारण काय हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. सध्या टेंभुर्णी पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहे. मात्र या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे. तर  शाळकरी मुलाच्या  कुटुंबियांमध्येही दहशत निर्माण झाली आहे.

अकोल्यात सराईत गुन्हेगारांची धिंड; अट्टल गुन्हेगार ढसाढसा रडले

अकोल्यात गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी अकोला पोलिसांनी सराईत गुन्हेगारांची धिंड काढायला सुरुवात केलीय. गेल्या 2 दिवसात अकोला पोलिसांनी दोन ठिकाणी टोळीने गुन्हेगारी करणाऱ्या गुन्हेगारांचा 'रोड शो' केलाय. आज अकोल्यातल्या जुने शहर पोलीस स्टेशन हद्दीत टोळीने गुन्हेगारी करणाऱ्या 3 आरोपींची धिंड काढण्यात आली.. तर परवा अकोल्यातल्या कृषी नगरात दोन गटात वाद गॅंगवॉर झाला होता. याठिकाणी काल रात्री 7 आरोपींची धिंड काढण्यात आली होतीय. कृषी नगरात वर्चस्वाच्या लढाईतून हा गॅंगवॉर झाला होता. तलवारीसह बंदुकीचा या वादात वापर झाला होता. त्यामुळे नागरिकांमध्ये मोठी दहशत पसरली होती. आता या दोन्ही गटातील प्रमुखांना आणि त्यांच्या साथीदारांची कृषी नगर परिसरात धिंड करण्यात आली होती.. तर आज जुने शहरात तीन गुंडांची धिंड काढण्यात आलीय. अकोला शहरातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात आणणारे या गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी हा 'रोड शो' होताय.. त्यामुळे या गुन्हेगारांना अकोला पोलिसांनी चांगला धडा शिकवला.. 

इतर महत्वाच्या बातम्या