Latur Crime News : गेल्या 24 तासाच्या आत लातूरमध्ये (Latur) दोन जणांचा खून झाल्याची घटना घडली आहे. गांधी चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे दोन खून झाले आहेत. या घटनामुळं लातूर हादरले आहे. पैगंबर हाजी मलंग सय्यद या (32 वर्षे) तरुणाचा आज खून झाला आहे. पैगंबर हाजी मलंग सय्यद याचे एका व्यक्तीबरोबर वाद झाले. वादाचे रुपांतर हाणामारीत झालं. भांडण सुरु असताना पैगंबर हाजी मलंग सय्यद याच्या गळ्यावर समोरच्या व्यक्तीने वार केला. मानेवर वार लागल्याने खूप रक्तस्त्राव झाल्याने पैगंबर हाजी मलंग सय्यद याचा मृत्यू झाला.
लातूर शहरातील मुख्य बाजारपेठेतच ही घटना झाल्याने व्यापाऱ्यांची आणि नागरिकांची धावपळ झाली. घटनेची माहिती तात्काळ गांधी चौक पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पैगंबर हाजी मलंग सय्यद याला उपचारासाठी लातूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आलं. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. घटना नेमकी कोणत्या कारणामुळे घडली हल्ला करणारा तरुण कोण होता? याबाबत कोणतीही माहिती अद्याप समोर आली नाही.
हत्येच्या घटनेमुळं लातूर हादरले
काल मध्यरात्री झालेल्या घटनेमुळे लातूर शहर हादरले आहे. किरकोळ कारणामुळे झालेल्या बाचाबाचीत केलेल्या चाकू हलल्यात एकाचा मृत्यू झाला आहे. तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. महोसीन मैन्नोद्दीम सय्यद (वय 21) रा. खुब्बा नगर लातूर असे मृत झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर अरबाज गफूर पठाण (वय 21) रा. खुब्बा नगर लातूर हा गंभीर जखमी आहे. हॉटेलमध्ये जेवण करून रस्त्याने निघालेल्या तरुणांनी दुचाकीला कट मारल्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ बाचाबाचीत एका तरुणाने जवळील चाकूने दोघांवर सपासप वार केल्याची घटना शहरातील बसस्थानक ते हनुमान चौक परिसरात रात्री घडली आहे. चाकूने भोसकलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला तर दुसऱ्या गंभीर जखमीवर लातूरच्या शासकीय सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गांधी चौक पोलीस ठाण्यामध्ये या बाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत. दरम्यान, राज्यात दिवसेंदिवस हत्येच्या घटनेमध्ये वाढ होताना दिसत आहे. विशेषत मराठवाडा आणि विदर्भात अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
महत्वाच्या बातम्या: