Latur Crime News : हृदयद्रावक! चार वर्षाच्या चिमुकलीनं चॉकलेट मागितलं, जन्मदात्यांने अतिशय क्रूरपणे लेकीला संपवलं, घटनेनं लातूर हादरलं
Latur Crime : चार वर्षाच्या निरागस मुलीने वडिलांकडे चॉकलेटसाठी हट्ट धरला होता. या क्षुल्लक कारणावरून नराधम पित्याने साडीने चिमुकलीचा गळा आवळून या चिमुकलीचा खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

Latur Crime News : चार वर्षाच्या निरागस मुलीने वडिलांकडे चॉकलेटसाठी हट्ट धरला होता. या क्षुल्लक कारणावरून नराधम पित्याने साडीने चिमुकलीचा गळा आवळून या चिमुकलीचा खून (Crime News) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. लातूर जिल्ह्यातील भीमा तांडा येथे ही संतापजनक आणि हृदयद्रावक घटना घडली आहे. या प्रकरणी बालाजी बाबु राठोड या 36 वर्षीय व्यक्तीला अटक करण्यात आली असून तो पळून जात असतानाच त्याला तात्काळ अटक करण्यात आली. सध्या पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. मात्र या संपूर्ण घटनेने संपूर्ण जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.
चिमुकली गतप्राण होईपर्यंत आरोपीने साडीचा फास सोडला नाही
पुढे आलेल्या माहितीनुसार, उदगीर तालुक्यातील भीमा तांडा येथील बालाजी बाबु राठोड या 36 वर्षीय व्यक्तीला चार वर्षाची मुलगी आहे. बालाजी राठोड हा व्यसनाच्या आहारी गेला आहे. दुपारी चार वर्षाच्या त्याच्या मुलीने चॉकलेटसाठी हट्ट धरला. दरम्यान याचा राग आनावर झाल्याने रागाच्या भरात असलेल्या बालाजी राठोड याने साडीने स्वतःच्या चार वर्षाच्या मुलीचा गळा आवळून खून केला आहे. आरुषी बालाजी राठोड ही चार वर्षाची चिमुकली गतप्राण होईपर्यंत आरोपीने साडीचा फास काही सोडला नव्हता. अखेर आरुषीची आई वर्षा घरी आल्यानंतर तिला प्रकार लक्षात आला. त्यानंतर तीने तात्काळ उदगीर ग्रामीण पोलीस स्टेशन गाठत पोलीस ठाण्यात याबाबत तक्रार दिली. तपासांती हा गुन्हा बालाजीनेच केल्यास उघड झालं. उदगीर ग्रामीण पोलिसांचे पथक माहिती घेत असल्याची खबर बालाजीला लागली आणि तो पळून जात असतानाच त्याला तात्काळ अटक करण्यात आली. सध्या पोलीस या हृदयद्रावक घटनेचा पुढील तपास करत आहेत.
माझ्या लेकराला त्याने मारून टाकले, त्याला फाशी द्या!
माझ्या लेकराला त्याने मारून टाकले, त्याला फाशी द्या, त्याला असं सोडू नका. अशी आरुषीची आई वर्षा राठोड सातत्याने पोलीस ठाण्याला सांगत होती. आरुषीचे चुलते राजू राठोड यांनी हतबल होत कैफियत मांडली की, बालाजीने आम्हाला खूप त्रास दिला. वेगळं राहतो म्हणाला आणि घर वेगळे केलं. मला आणि आईला वाटणी मागत होता. बायकोबरोबर भांडत होता. मुलीला फाशी देऊन मारलं. सारखा आम्हाला मारतो, अशी धमकी देत होता. आज मुलीला मारून टाकलं आहे. असेही ते म्हणाले.
हे ही वाचा
























