Kurla Bus Accident: कुर्ल्यात मृत्यूचं थैमान घालणाऱ्या बस नंबर 332 चा पंचनामा पूर्ण, आरटीओने प्रत्येक डिटेल नोंदवली
Kurla Bus Accident: कुर्ल्यात मृत्यूचं थैमान घालणाऱ्या इलेक्ट्रिक बसची पाहणी करण्यात आली आहे. तर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर बसची संपूर्ण तपासणी करण्यात आली आहे.
कुर्ला: कुर्ला पश्चिम परिसरामध्ये घडलेल्या एका भीषण अपघाताने मुंबई हादरलं. बेस्टच्या इलेक्ट्रिक बसने अनेक वाहनांना धडक दिली. त्याचवेळी बसने काही नागरिकांना देखील चिरडलं. या अपघातात आतापर्यंत 7 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले आहेत. या घटनेमुळे परिसरात मोठा गोंधळ उडाला आहे. दरम्यान पोलिसांनी आता संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. आरोपी चालक संजय मोरे याचा वाहन चालवण्याचा परवाना ताब्यात घेतला आहे. या इलेक्ट्रिक बसची (Kurla Bus Accident) पाहणी करण्यात आली आहे. तर चालकावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचबरोबर बसची संपूर्ण तपासणी करण्यात आली आहे.
कुर्ला आगार या ठिकाणी अपघात (Kurla Bus Accident) झालेल्या बसला ठेवण्यात आले आहे. आरटीओकडून बसचा पंचनामा करण्यात आला आहे. तांत्रिक बाबींची तपासणी यात करण्यात आली आहे. बस बाबत प्रत्येक नोंद नोंदवली आहे. ही बस वातानुकूलित असून 332 या मार्गावर धावत होती. कुर्ला ते अंधेरी अशा मार्गाने ही बस जात होती. कुर्ला पश्चिम आंबेडकरनगर परिसरात हा भीषण अपघात झाला आहे. अपघातात चार पोलीस जखमी झाले आहेत. कुर्ला बस (Kurla Bus Accident) स्थानकातून सर्व गोष्टींचा पंचनामा झाला. त्यानंतर पोलिस प्रशासनाकडून घटनास्थळी ही पाहणी करण्यात आली आहे, सध्या बस ही आगारामध्ये ठेवण्यात आली आहे, बस पोलिसांच्या निगराणी खाली ठेवण्यात आली आहे. कुर्ला आगारमध्ये राज्य राखीव पोलीसांची तुकडी उपस्थित आहे.(Kurla Bus Accident)
अपघात कसा झाला?
ही बस काल सोमवारी रात्री 9.45 च्या सुमारास कुर्ला रेल्वे स्थानक (पश्चिम) येथून साकीनाकाकडे जात होती. यावेळी बस चालकाचा बसवरील ताबा सुटला, त्यामुळे वेग वाढला आणि ही दुर्घटना घटना घडली.या अपघातात एकूण 49 जण जखमी झाले असून त्यापैकी 7 जणांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी चालकाविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. तर घटनेनंतर स्थानिक लोकांनी जखमींना तातडीने जवळच्या भाभा रुग्णालयात नेण्यास सुरुवात केली. पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथकही घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जखमींवर भाभा हॉस्पिटल, कोहिनूर हॉस्पिटल, सेव्हन हिल्स हॉस्पिटल, सिटी हॉस्पिटल आणि हबीब हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. (Kurla Bus Accident)
देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
या घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मुख्यमंत्री सहायता निधीतून राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी 5 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे. त्याचबरोबर या घटनेत मृत कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. तसेच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी मी प्रार्थना करतो, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. या घटनेत जे जखमी झाले, त्यांच्या उपचाराचा खर्च मुंबई महापालिका आणि बेस्टच्या वतीने करण्यासाठी आदेश देण्यात आले आहेत, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. फडणवीसांनी याबाबत सोशल मिडिया एक्सवरती पोस्ट लिहून घटनेतील मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे, तर जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे.
बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकरांनी दिली महत्त्वाची माहिती
चालकाने मद्यपान केल होतं असं कुठही निदर्शनास आलं नाही. पोलिसांच्या अहवालात देखील असं काही नमूद नाही. तो नवीन ड्रायव्हर नाही याआधी देखील त्याने ड्रायव्हिंग केल आहे. 4 वर्ष वेगळ्या बेस्टच्या कंपन्यांना मधे काम केलं आहे. आत्ता आपण तत्काळ 2 समित्या स्थापन केल्या आहेत. एका समिती मध्ये 2 आरटीओ अधिकारी आणि 1 बेस्ट प्रशासनाचा अधिकारी आहे. ही समिती 2 दिवसांत अहवाल सादर करेल. यामधे गाडी सदोष आहे की, ड्रायव्हर चूक होती याची माहिती ते देतील. दुसरी समिती प्रामुख्याने जखमीच्या आणि मृत्यांचा नातेवाईकांना क्लेमचे पैसे लवकर मिळावेत यासाठी काम करेल. राज्य शासनाने 5 लाख रुपये जाहीर केले आहेत. आम्ही 2 लाख रुपये मृतांच्या नातेवाईकांना देणार आहोत. जखमीच्या उपचाराचा पूर्ण खर्च आम्ही करू. कालपासून सगळ्या घटनेवर लक्ष ठेऊन आहे अशी माहिती बेस्टचे महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांनी यावेळी दिली आहे.