Kolhapur Crime News: कोल्हापूर (Kolhapur) जिल्ह्यातील पन्हाळा (Panhala) तालुक्यातील भाचरवाडी येथे एसटी (ST Bus) चालकाला शिवीगाळ करत काठीने मारहाण आणि एसटी वाहकाला धक्काबुक्की झाल्याची गंभीर घटना समोर आली आहे. हा संपूर्ण प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला असून सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. (Kolhapur Crime News)

Continues below advertisement

याबाबत अधिक माहिती अशी की, भाचरवाडी येथे अरुंद रस्त्यावर एसटी बस आणि स्कूल बस एकमेकांना पास होण्यासाठी थांबल्या होत्या. दोन्ही बसचालकांमध्ये चर्चेचे होत असतानाच मागून मोटारसायकलवर येणारा विनायक विष्णू रेडेकर (भाचरवाडी) अचानक चिडला. दोन बस रस्त्यात थांबल्याने वेळकाढूपणा होत असल्याचा आरोप करून त्याने संताप व्यक्त केला. त्याने एसटी बसच्या चालकाला “ही चर्चा करण्याची जागा आहे का? रस्ता तुझ्या बापाचा आहे का?” अशा म्हणत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. 

Kolhapur Crime News: एसटी चालकाला मारहाण आणि वाहकाला धक्काबुक्की 

त्यानंतर त्याने काठीने चालकाच्या खांद्यावर मारहाण केली. शिवाय विनायक रेडेकर याची समजूत काढण्याचा प्रयत्न करणार्‍या एसटी वाहक दिनकर पाटील यांना देखील त्याने धक्काबुक्की केल्याची माहिती समोर येत आहे. दोघेही सरकारी कर्तव्य बजावत असताना झालेल्या या हल्ल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये संतापाची भावना निर्माण झाली आहे.

Continues below advertisement

Kolhapur Crime News: पन्हाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

नागरिकांनी या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला असून तो सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये आरोपी रेडेकर काठीने मारहाण करताना आणि शिवीगाळ करताना दिसून येत आहे. या प्रकरणी पन्हाळा पोलीस ठाण्यात विनायक विष्णू रेडेकर विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.

Pune Crime News: मौजमजेसाठी दागिने चोरणारा अट्टल चोर जाळ्यात

दरम्यान, पुण्यात मौजमजेच्या हव्यासातून दागिने चोरणाऱ्या अट्टल चोराला फुरसुंगी पोलिसांनी अटक केली आहे. राहुल उत्तम पठारे असे आरोपीचे नाव असून तो पुण्यातील विविध दुकानांत जाऊन सोन्याचे दागिने चोरत होता. चोरी केलेले दागिने विकून मिळालेला पैसा तो नर्तिकेवर खर्च करत असल्याचे तपासात उघड झाले. पोलिसांनी आरोपीकडून 6 लाख रुपये किंमतीचे सुमारे 5 तोळे सोने जप्त केले असून पुढील तपास फुरसुंगी पोलीस करत आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यात टीईटी सक्तीविरोधात गुरुजी एकवटले, पण पदवीधर, शिक्षक आमदारकीचा वास लागला!