कोल्हापूर: अनैतिक संबंधातून एका विधवा सरपंच महिलेची गळा दाबून हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी भिवंडीत घेऊन आल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. सुरेखा शिवाजी न्यारे वय ४० रा. शिरगाव ता. शाहूवाडी जि. कोल्हापूर असे हत्या झालेल्या महिलेचे नाव आहे. तर प्रकाश उर्फ बाबू आनंदा पाटील असे हत्या करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. माझ्याशी लग्न कर म्हणून धमकावणाऱ्या प्रेयसीचा प्रियकराने खून केल्याची प्राथमिक माहिती भिवंडी पोलिसांकडून मिळत आहे. खून झालेल्या महिलेचं नाव सुरेखा शिवाजी न्यारे असून, त्या शाहूवाडी तालुक्यातील शिरगावच्या माजी सरपंच होत्या. या खून प्रकरणी संशयित प्रकाश ऊर्फ बाबू आनंदा पाटील याला भिवंडी (Kolhapur Crime News) पोलिसांनी अटक केली आहे. शिरगाव येथे खून केल्यानंतर आरोपी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी स्वतःच्याच गाडीतून मृतदेह भिवंडीकडे घेऊन जात होता.
Kolhapur Crime News: भिवंडी तालुक्यातील कशेळी येथील आपल्या नातेवाईकाकडे गेला....
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विधवा महिला सुरेखा न्यारे व हत्या करणारा प्रकाश पाटील यांच्यात अनैतिक संबंध होते. त्यासोबत मयत महिलेने प्रकाशकडे लग्नासाठी तगादा लावून धमकावत होती. या रागातून प्रकाश पाटील याने २६ जुलै रोजी सकाळी ११ वाजताच्या सुमारास गावातील शेतातमध्ये गळा दाबून खून केला. त्यानंतर प्रकाश पाटील हा हत्येचा पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह इको कारच्या डिक्कीत ठेवून तो भिवंडी तालुक्यातील कशेळी येथील आपल्या नातेवाईकाकडे मंगळवारी पहाटे आला. येथे सकाळी नातेवाईकाला या हत्येबाबत समजताच त्याने या धक्कादायक घटनेची माहिती स्थानिक नारपोली पोलिसांना दिली. नारपोली पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजय कदबाने यांच्या मार्गदर्शनाखाली नारपोली पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल होत त्यांनी मृतदेह ताब्यात घेत आरोपी प्रकाश पाटील या ताब्यात घेतले. मृतदेहाचे शवविच्छेदन भिवंडी येथे करून मृतदेह कोल्हापूर येथे रवाना केला असून आरोपी प्रकाश विरोधात नारपोली पोलिस ठाण्यात शून्य क्रमांकाने हत्येचा गुन्हा दाखल करून तो कोल्हापूर येथे वर्ग केला आहे.
Kolhapur Crime News: माझ्याशी लग्न कर म्हणून धमकी अन्....
माझ्याशी लग्न कर म्हणून सतत मागे लागलेल्या प्रेयसीचा गळा आवळून खून केल्याची धक्कादायक घटना भिवंडी येथे उघडकीस आली आहे. सुरेखा शिवाजी न्यारे असे मृत महिलेचे नाव असून, त्या शिरगावच्या माजी सरपंच होत्या. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी प्रकाश ऊर्फ बाबू आनंदा पाटील (वय ४०, रा. शिरगाव, ता. शाहूवाडी) याला बेड्या ठोकल्या आहेत. या घटनेबाबत संदेश सर्जेराव मोरे (वय २७, रा. भिवंडी) यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.(Kolhapur Crime News)
Kolhapur Crime News: नेमका प्रकार काय?
मिळालेल्या माहितीनुसार, शिरगावच्या माजी सरपंच सुरेखा न्यारे या आरोपी प्रकाश पाटील याच्या घराशेजारीच राहत होत्या. गेल्या काही दिवसांपासून सुरेखा या प्रकाशकडे लग्नासाठी सतत तगादा लावत होत्या आणि त्याला धमकावतही होत्या. या त्रासाला कंटाळून रविवारी (२६ जुलै) सकाळी ११ वाजेच्या सुमारास प्रकाशने सुरेखा यांचा गळा दाबून खून केला.
