Kolhapur Crime news: कोल्हापूरच्या राधानगरी (Radhangari news) परिसरात एका महाविद्यालयीन तरुणीवरती चार जणांनी लैंगिक अत्याचार (Crime News) केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. आरोपींनी पिडीत तरुणीचे अश्लील व्हिडीओ आणि फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन तिच्यावर अनेक महिने शारीरिक अत्याचार केल्याचे प्राथमिक तपासात उघड झाले आहे. या घटनेमुळे कोल्हापूर (Kolhapur News) जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. ( Kolhapur Rape news) या प्रकरणी अनेक धक्कादायक खुलासे समोर आले आहेत, यामध्ये आधी तरूणीचा फोटो एडिट करून ते सोशल मिडीयावरती व्हायरल करण्याची धमकी दिली त्यानंतर तिच्यासोबत अनेक लॉजवर आणि बाकी ठिकाणी अत्याचार केले त्यानंतर तिला धमकावत आपल्या मित्रांसोबत बोलण्यास भाग पाडलं, त्यांनी देखील त्या तरूणीवरती अत्याचार केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे.
या प्रकरणी पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणात राधानगरी येथील चार तरुणांना मुरगूड पोलिसांनी अटक केली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आल्यानंतर चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. आदित्य शेटके, पवनगिरी पालकर, विक्रम पाटील, रणजीत मुधोळकर अशी आरोपींची नावे आहेत. यापैकी एकजण पिडीत मुलीचा प्रियकर होता. सर्वात आधी आदित्य शेटके याने पिडीत तरुणीचे अश्लील व्हिडीओ शूट केले. त्यानंतर त्याने पिडीत मुलीला आपल्या मित्रांसोबत बोलण्यास भाग पाडले. यानंतर या चारही जणांना मुलीवर अनेकदा बळजबरी करुन तिच्याशी शारीरिक संबंध ठेवले. या चार संशयित आरोपींनी गेल्या 10 महिन्यांमध्ये मुलीला अश्लील फोटो आणि व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देऊन अनेकदा वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर अत्याचार केले. (Maharashtra Crime news)आदित्य शेटके याचा राधानगरीत फोटोग्राफीचा व्यवसाय आहे. त्यामधूनच पीडित तरुणीची ओळख झाली होती. काही काळानंतर या दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. त्यानंतर आदित्याने पिडीत तरुणीशी शारीरिक जवळीक करुन तिचे व्हिडीओ चित्रित करुन तिचा गैरफायदा घेतला. या प्रकरणात पोलिसांकडून आरोपींची चौकशी आणि अन्य तपास सुरु आहे.
Kolhapur Crime news: प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे फोटो व व्हिडीओ...
ओळखपत्र तयार करून देण्याच्या बहाण्याने या महाविद्यालयीन तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून तिचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत चार तरुणांनी दहा महिन्यांत वारंवार अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणीची मुख्य आरोपी आदित्य बाजीराव शेटके (रा. खिंडी व्हरवडे, ता. राधानगरी) याच्याशी ओळख झाली होती. ओळखपत्र देण्याच्या बहाण्याने त्याने तरुणीला मुदाळतिट्टा येथे बोलावून घेतले व नंतर मुरगूड येथील तलाव परिसरातील झाडीमध्ये तिला नेले. तेथे तिचे फोटो काढून ते एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली. बदनामीची भीती दाखवून तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर आदित्य शेटकेने या तरुणीची ओळख रणजित संभाजी मुधोळकर (रा. सोळांकूर) याच्यासोबत करून दिली. रणजितने फोटो व्हायरल करण्याची भीती दाखवून त्या तरुणीला गिरगाव, कात्यायनी, कोल्हापूर तसेच पाचगाव परिसरातील विविध लॉजमध्ये नेऊन जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. अश्लील फोटो व व्हिडीओ काढून ते व्हायरल करण्याची धमकी वारंवार दिली. यानंतर रणजित मुधोळकर याने या तरुणीची ओळख प्रणवगिरी चंद्रशेखर पालकर (रा. राधानगरी) याच्याशी करून दिली. त्यानेच त्या तरुणीला प्रणवगिरीशी बोलण्यास भाग पाडले. त्यानंतर त्याने भीती दाखवत त्या तरुणीला स्वतःच्या कारमधून घेऊन एका लॉजमध्ये अत्याचार केला. रणजित मुधोळकर याने या तरुणीची विक्रम रामचंद्र पाटील (रा. बुजवडे) याच्याशीही जबरदस्तीने ओळख करून दिली. ओळखीनंतर विक्रम पाटील याने या तरुणीला, "तुझे आधीचे सर्व फोटो व व्हिडीओ डिलीट करून हे प्रकरण मिटवतो," असे सांगून पाचगाव येथील लॉजमध्ये नेऊन अत्याचार केला.
