Kolhapur Crime News : मुलाचे अपहरण करून 29 लाख रुपये लुटल्याप्रकरणी कोल्हापूर (Kolhapur Crime News) जिल्ह्यातील कळे आणि आसगावमधील पाच जणांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या पाच जणांनी सावकारीमधून हे कृत्य केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. यामुळे कोल्हापुरात एकच खळबळ उडाली आहे.  

Continues below advertisement

विठ्ठल पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, कळे येथील अशोक पाटील याच्याकडून फिर्यादी विठ्ठल पाटील यांनी फेब्रुवारी 2022 साली पाच लाख रुपये घेतले होते. फिर्यादीने अशोक पाटील व त्याचा मुलगा अवधूतला 29 टक्के व्याजदराने एकूण 29 लाख रुपये रोख व ऑनलाईन स्वरूपात परत केले होते. मात्र, पैसे परत केल्यानंतर देखील अशोक पाटील, अवधूत पाटील व प्रल्हाद भोसले यांनी फिर्यादीच्या मुलाचे अपहरण करून आणखी पैशांचा तगादा लावला होता. 

पाच लाख घेतले अन् 29 लाख वसूल केले

या प्रकरणी विठ्ठल पाटील यांनी पोलीस अधीक्षक यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. यानंतर संशयित अशोक पाटील व अवधूत पाटील यांनी 20 टक्के व्याजदराने पैसे घेतल्याचे कबूल केले आणि 29 लाख रुपये परत देण्याचे कबूल केले. संशयित अशोक पाटील, प्रदीप भोसले व प्रल्हाद भोसले यांनी फिर्यादीने पोलीस अधीक्षकांकडे दिलेल्या तक्रार अर्जानुसार गुन्हा टाळण्यासाठी फिर्यादीच्या खात्यावर 27 लाख रुपये पाठविले होते. परंतु संशयितांनी फिर्यादींचा मुलगा पियुष याला धमकी देऊन ते परत वसूल केले. 

Continues below advertisement

पाच जणांवर गुन्हा दाखल 

दरम्यान, विठ्ठल आनंदा पाटील यांचे कुटुंबीय सावकाराविरोधात कारवाई होत नसल्याच्या संतापातून काही दिवसापासून कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत आंदोलन सुरू केलं होतं. या आंदोलनानंतर कळे मधील झोपलेल्या पोलीस प्रशासनाने अखेर पाच जणांवर गुन्हा दाखल केला आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Kolhapur News : पुण्यात दिवसाढवळ्या मुडदे पाडणारा कोयता कोल्हापुरातही पोहोचला, किरकोळ वादातून कोयते नाचवत दहशत, दुकान फोडले

Kolhapur News : कोल्हापुरात 'मोक्का'तील आरोपीची जेलपासून घरापर्यंत मिरवणूक, दारात रांगोळी काढून अन् खूर्चीवर बसवून दुग्धाभिषेक! पाठिराखे सोडाच 'नातेवाईक' सुद्धा सामील