Nagpur Businessman Murder News: नागपुरातील दोन व्यावसायिकांचे अपहरण केल्यानंतर त्यांना गोळी घालून त्यांची हत्या करण्यात आली आणि नंतर अंगावर पेट्रोल टाकून त्यांचे मृतदेह वर्धा नदीत  फेकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली असून राज्याची उपराजधानी (Nagpur)  हादरली आहे. पैशाच्या व्यवहारातून हे हत्याकांड घडल्याची बाब पोलीस तपासात समोर आली असून याप्रकरणी पोलिसांनी पाच आरोपींना अटक केली आहे.


एखाद्या हिंदी चित्रपटाचा कथानक वाटावा अशा प्रकारे नागपूरमध्ये गुंडाच्या एका टोळीने दोन व्यापाऱ्यांची हत्या केली.  मृतक निराला कुमार यांचा ऑनलाइन व्यापार होत तर अंबरीश गोळे हे बांधकाम व्यावसायिक होते. या प्रकरणातील मुख्य आरोपी 25 वर्षीय ओंकार तलमले याची दोन्ही व्यावसायिकांसोबत ओळख होती. ओंकारचा फर्निचरचा व्यवसाय आहे. आमच्याकडे मोठ्या प्रमाणात ब्लॅक मनी असून तो वाईट करायचा आहे अशी बतावणी त्याने केली. त्यात दुसरा आरोपी 22 वर्षीय हर्ष वर्मा हा देखील सामील झाला. 


दोन कोटी 80 लाख रुपये आमच्याकडे ब्लॅक मनी आहे, या दोन कोटी 80 लाख रुपयांच्या मोबदल्यात एक कोटी पन्नास लाख देण्यास निराला कुमार सिंग आणि अमरीश गोळे तयार झाले. एका हाताने पैसे द्या आणि दुसऱ्या हाताने त्याचे व्हाईट करून घेण्यासाठी आरोपींनी त्यांच्या नावे अगोदरच दीड कोटी रुपयांचा डीडी तयार करायला सांगितला. निराला कुमार सिंग आणि आशिष गोळे यांनी हा डीडी तयार केला. त्यानंतर गुरुवारी दुपारच्या सुमारास ते नागपूरच्या सिविल लाईन परिसरात एका ठिकाणी आरोपींसोबत भेटले. 


आरोपींनी निराला सिंग आणि अमृत गोळे यांना पैसे देण्याचे आमिष दाखवून नागपूर अमरावती महामार्गावरील कोंढाळी गावानजीकच्या लकी तुरकेल याच्या फार्म हाऊसवर घेऊन गेले. फार्म हाऊसवर वर गेल्यावर 2 कोटी 80 लाख रुपये थोड्याच वेळात एक जण घेऊन येत आहे अशी बतावणी करून दोघांनाही एका खोलीत बसवले. बराच वेळ होऊ नये कोणीच पैसे घेऊन आले नाही, त्यामुळे निराला सिंग आणि अमरीश गोळे यांना संशय आला त्यांनी तिथून निघून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र भीती पोटी आरोपींनी  गोळी झाडली त्यामुळे घटनास्थळी दोघांचाही मृत्यू झाला. 


मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी सुरवातीला मृतदेह जाळण्याचे ठरवले. मात्र त्यावेळी पाऊस असल्याने मृतदेह पूर्णपणे जळाला नाही. त्यानंतर तिथून काही किलोमीटर अंतरावर असलेल्या वर्धा नदीत दोघांचेही मृतदेह फेकून दिले. तिकडे रात्रीपर्यंत घरी न परतल्याने दोघांच्याही कुटुंबीयांनी पोलिसात धाव घेतली पोलिसांनी मिसिंगचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. त्यावेळी हे दोघे शेवटच्या वेळी आरोपी ओमकार तलमले यांच्यासोबत दिसल्याचे समोर आलं. पोलिसांनी ओमकार तलमलेला ताब्यात घेतल्यावर संपूर्ण धक्कादायक घटना उघडकीस आली. धक्कदायक बाबा म्हणजे आरोपीकडे कुठलीही रोख रक्कम नव्हती ज्यासाठी ही घटना घडली.


ही बातमी वाचा: