Ketan Agrawal Pune Lohagad Case Siya Goyal: पुणे जिल्ह्यातील लोहगड येथील केतन अग्रवाल हत्या प्रकरणातील (Ketan Agrawal Pune Lohagad Case) मुख्य संशयित सिया गोयल (Siya Goyal) आणि चेतन चौधरी (Chetan Choudhari) यांच्या न्यायालयीन कोठडीत 14 दिवसांची वाढ करण्यात आली. याप्रकरणी काल (16 जुलै) वडगाव मावळ न्यायालयात व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयाने दोघांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. 

Continues below advertisement

केतन अग्रवाल प्रकरणात पुणे पोलिसांनी आतापर्यंत खूप चांगला तपास केला आहे. यासाठी पुणे पोलिसांचं कौतुकही होत आहे. तसेच सदर प्रकरणात विविध धक्कादायक माहिती समोर येत आहे. याचदरम्यान, पुन्हा एकदा केतन अग्रवाल प्रकरणातील संशयित सिया गोयल आणि चेतन चौधरीबाबत हादरवणारी माहिती समोर आली आहे. केतनची हत्या करण्यास सुरूवातीला दोघांनी कॉन्ट्रॅक्ट किलरला शोधले. या कॉन्ट्रॅक्ट किलरसोबत सिया आणि चेनतची एकदा भेटही झाली. यावेळी दोघांनी केतनची कॉन्ट्रॅक्ट किलरला माहिती दिली. परंतु केतन अग्रवालची माहिती जाणून घेताच या कॉन्ट्रॅक्ट किलरने नकार दिला. त्यामुळे होकार देणाऱ्या त्या कॉन्ट्रॅक्ट किलरनं ऐनवेळी माघार घेतली. आता तीच व्यक्ती सिया आणि चेतनविरोधात प्रमुख साक्षीदार ठरणार असल्याची शक्यता आहे. तसंच ज्या कॅफेमध्ये सिया आणि चेतननं या व्यक्तीसोबत मीटिंग केल्याचं समजतंय, त्या कॅफेचं सीसीटीव्ही जप्त करून पोलिसांनी पुढचा तपास सुरू केला आहे. (Ketan Agrawal Pune Lohagad Case)

सिया आणि चेतनने जपानी व्हिडीओ पाहिले- (Siya Goyal Chetan Choudhari)

केतन अग्रवालला ट्रेकिंगची आवड असल्यानं त्याला लोहगडावर घेऊन जाणं कठीण नाही हे सियानं हेरलं होतं. तसंच सियाने आपला कट तडीस नेण्यासाठी लोहगडावरची जी जागा निवडली होती तिथे सीसीटीव्ही नसल्याची खात्री देखील तिनं केली होती. याशिवाय त्या ठिकाणी सर्वसामान्य पर्यटक फिरकत नाही हे देखील तिला माहिती होतं. पोलीस चौकशीदरम्यान शांत कसं राहायचं? पोलिसांच्या प्रश्नांना कशा पद्धतीने उत्तर द्यायची? याबाबत जपानी व्हिडीओद्वारे माहिती घेतली होती. पोलिसांनी या दोन्ही व्हिडीओच्या लिंकही सिया आणि चेतन यांच्या वेब हिस्ट्रीमधून मिळाल्याचं समजतंय.

Continues below advertisement

सिया आणि चेतनचा फ्री सेक्स ग्रुप चालवत होते? (Ketan Agrawal Pune Lohagad Case Marathi News)

पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार, चेतन आणि सिया हे दोघंच एकमेकांचे मित्र नव्हते, त्याच्याशिवाय सुद्धा आणखी त्यांचे काही मित्र होते. हे कुठे भेटायचे त्याचे किमान 4 ते 5 हॉटेल्सचे पत्ते पोलिसांना सापडले. तर एका ठिकाणच्या हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये सिया आणि चेतन त्या हॉटेलमध्ये जाताना दिसत आहेत. काही काळानंतर, तास-दीड तासानंतर सिया बाहेर येते आणि नंतर एका दुसऱ्या मैत्रिणीसोबत चेतन त्याच हॉटेलमध्ये, त्याच रूममध्ये जाताना दिसतोय, असंही सीसीटीव्ही फुटेजद्वारे समोर आल्याची माहिती आहे. तसेच सिया आणि चेतनचा फ्री सेक्स ग्रुप चालवत होते, असंही आता समोर येत आहे.

संबंधित बातमी:

Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case: केतन अग्रवाल प्रकरणात बीडमधील तरुणाची एन्ट्री; लोहगडावरुन ढकलून दिल्यानंतर सिया आणि चेतन पहिले त्याला भेटले-बोलले!

Ketan Agrawal Siya Goyal Lohagadh Case Pune: घराबाहेर पडताच सिया गोयलचे अश्लील हावभाव; मिडल फिंगर दाखवत काय काय केलं?, VIDEO