Kerala Crime News : केरळच्या एर्नाकुलम जिल्ह्यातील चोट्टानिकारा (Chottanikkara) भागातील एका घरात मानवी कवटी आणि हाडे सापडल्याने खळबळ उडाली आहे. हे घर जवळपास 20 वर्षांपासून रिकामे होते आणि स्थानिक रहिवाशांच्या मते, ते समाजकंटकांचे आश्रयस्थान बनले होते. स्थानिक पंचायत सदस्य इंदिरा धर्मराज यांनी संशय व्यक्त करून पोलिसांत तक्रार दाखल केल्यावर ही घटना उघडकीस आली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घराची झडती घेतली. झडतीदरम्यान, एका फ्रिजमधून तीन प्लास्टिकच्या आवरणांमध्ये पॅक केलेली मानवी कवटी आणि हाडे जप्त करण्यात आलीय. घरात सापडलेल्या अनेक वस्तू एका दीर्घकाळ चाललेल्या गूढतेकडे निर्देश करतात, असेही पोलिसांनी सांगितले. तरयाप्रकरणी घरमालक डॉ. फिलिप जॉन यांची पोलिसांनी चौकशी सुरू केली.
मिळालेल्यामाहितीनुसार, 74 वर्षीय घरमालक डॉ. फिलिप जॉन सध्या केरळमधील वायटिला येथे राहतात. पोलिसांनी त्यांना या घटनेची माहिती दिली असून त्यांची चौकशी सुरू केली आहे. फिलिप जॉन यांची मुले परदेशात राहतात आणि हे घर अनेक वर्षांपासून रिकामे होते. हे अवशेष घरात कसे पोहोचले आणि या घटनेत घरमालकाचा काही सहभाग होता का, हे पोलीस शोधण्याचा प्रयत्न करत आहेत.
Ernakulam Incident: मानवी अवशेष फोरेन्सिक टीमकडे तपासणीसाठी पाठवले
मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी सापडलेले मानवी अवशेष न्यायवैद्यक तपासणीसाठी पाठवले आहेत. या तपासणीतून अवशेषांचे वय निश्चित होईल. या घटनेसंदर्भात अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलीस जवळच्या रहिवाशांचीही चौकशी करत आहेत. सध्या, पोलीस या प्रकरणाचा सर्व बाजूंनी तपास करत आहेत. हे घर बऱ्याच काळापासून रिकामे असून समाजकंटकांकडून त्याचा वापर केला जात असल्याने हे प्रकरण अधिकच गुंतागुंतीचे झाले आहे. पोलिसांनी जनतेला या घटनेशी संबंधित कोणतीही माहिती तात्काळ पोलिसांना कळवण्याचे आवाहनही केले आहे.
हे सुद्धा वाचा:
