ठाणे :मुंबई, ठाणे आणि उपनगरात मनसैनिकांकडून (MNS) महिलांवरील अन्याय, आणि मराठी माणसांच्या प्रश्नासंदर्भात सातत्याने आवाज उठवला जातो. अनेकदा मराठीच्या प्रश्नावरुन मनसे पदाधिकारी, कार्यकर्ते आक्रमक होऊन संबंधित व्यक्तीला मारहाणही करतात, त्याचे व्हिडिओ (Video) देखील सोशल मीडियात व्हायरल झाल्याचं पाहायला मिळालं आहे. आता, कल्याणमध्ये रेल्वे स्थानकातील अधिकाऱ्यालाच मनसैनिकांनी चोप दिल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. यावेळी, पोलिसांनी मध्यस्थी करत मनसे पदाधिकाऱ्यांना थांबवल्याचं पाहायला मिळत आहे. मनसे रेल्वे कामगार सेनेच्या माध्यमातून ही दखल घेण्यात आली. 

Continues below advertisement

कल्याण रेल्वे स्थानकात सहकारी महिला कर्मचाऱ्यासोबत वरिष्ठ अधिकाऱ्याकडून व्हाट्सअप मेसेज पाठवून गैरवर्तन करण्यात आल्याचा प्रकार समोर आला. त्यानंतर, संबंधित महिलेनं मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यावरुन, कल्याण स्थानिकातील स्टेशन मास्तरला मनसेच्या रेल्वे कामगार सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी चांगलाच चोप दिला. संबंधित महिलेने याची तक्रार सहा महिन्यांपूर्वी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे करून देखील ठोस कारवाई झाली नव्हती. तसेच सहकारी स्टेशन मास्तराकडून सतत अश्लील मेसेजेस येत असल्याने हतबल झालेल्या महिलेने आपलं गाऱ्हाणं मनसेच्या कार्यकर्त्यांपुढे मांडलं. घरी बोलावणं, कुठली मिठाई खाऊ घालणार, असे मेसेज संबंधित स्टेशन मास्तरकडून महिलेला करण्यात आले आहेत. संबंधित घटनेबाबत मनसे पदाधिकाऱ्यांनी स्टेशन मास्तरला याचा जाब विचारत चांगलाच चोप दिला. दरम्यान, याप्रकरणी महिलेच्या तक्रारीनुसार जीआरपी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

1 वर्षाच्या चिमुकलीची सुखरुप सुटका

ठाण्यातील नौपाडा, ब्राह्मण सोसायटी येथील प्राजक्ता सोसायटीत एका बेडरूमचा दरवाजा अचानक लॉक झाल्याने 1 वर्षाची मधुमिता नाडकर आत अडकली होती. दुपारी 2 वाजता घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दल व आपत्ती व्यवस्थापन पथकाने तात्काळ धाव घेतली. जवानांनी डोअर ब्रेकरने अवघ्या 20 मिनिटांत दरवाजा तोडून चिमुकलीला सुखरूप बाहेर काढले व आजी-आजोबांच्या ताब्यात दिले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जिवितहानी झाली नाही.

Continues below advertisement

हेही वाचा

Video: मी तुमच्या रागात सामिल व्हायला आलोय; राज ठाकरेंचा पुण्यातील MPSC आंदोलनात सहभाग, सांगितली 'मन की बात'