एक्स्प्लोर

शॉकिंग! रुग्णालयातील तरुणीला नशेखोर तरुणाकडून बेदम मारहाण; शिवीगाळ करत विनयभंग

कल्याण पूर्वमधील पिसवाली गाव येथील रहिवासी असलेल्या सोनाली प्रदीप कळासारे हिच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर सोशल मीडियातून व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

ठाणे : कल्याणमधील (Kalyan) नांदिवली परिसरात धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून एका खासगी रुग्णालयामधील रिसेप्शनिस्ट तरुणीला बेदम मारहाण करण्यात आली आहे. या घटनेचा व्हिडिओ चांगलाच व्हायरल (Viral video) होत असून गोपाल झा असं मारहाण करणाऱ्या परप्रांतीय तरुणाचे नाव आहे. डॉक्टरकडे एमआर बसले आहेत, तुम्ही जरा थांबा इतकंच ही तरुणी बोलली होती. त्यावरुन तरुणीला मारहाण करण्यात आल्याचं पीडितेनं म्हटलं आहे. याप्रकरणी मानपाडा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद आहे. त्याआधारे, मानपाडा पोलीस (Police) आरोपीच्या शोधात आहेत. मात्र, या धक्कादायक प्रकाराने पीडित मुलीच्या मनात भीती बसली आहे. 

कल्याण पूर्वमधील पिसवाली गाव येथील रहिवासी असलेल्या सोनाली प्रदीप कळासारे हिच्यासोबत हा धक्कादायक प्रकार घडल्यानंतर सोशल मीडियातून व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यामुळे, आरोपीविरुद्ध तीव्र संताप व्यक्त होत आहे. सोनाली ही कल्याण पूर्वमधील श्री बाल चिकस्तालय (लिनिक) नांदिवली गाव येथे रिसेप्शनिस्ट म्हणून कार्यरत आहे. आपल्या कर्तव्यानुसार ती काम होती. 

डॉक्टरांच्या आदेशानुसार आतमध्ये म्हणजेच डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये एमआर बसले असताना कोणालाही आतमध्ये पाठवू नये, अशा सूचना आहेत. डॉक्टरांच्या याच नियमाचं पालन करत असताना एक नशेखोर तरुण कोणालाही न जुमानता सरळ डॉक्टरांच्या कॅबिनमध्ये घुसला. त्यावेळी त्याला थांबा,आत जाऊ नका असं म्हटल्यामुळे त्याने मला सरळ पळत येऊन तोंडावर लाथ मारून खाली पाडलं. तसेच, माझे कपडे फाडून मला लाथा बुक्क्यानी मारहाण केल्याचं फिर्यादी तरुणीने म्हटलं आहे. घडलेला प्रकार हा काल म्हणजेच 21 जुलै 2025 सायंकाळी 6:45 वाजत घडला आहे. त्यानंतर, फिर्यादी तरुणीने काल मानपाडा पोलीस स्टेशन येथे जाऊन तक्रार नोंदवली आहे. दरम्यान, पोलिसांत तक्रार नोंदवल्यानंतर देखील तो नशेखोर तरुण अजूनही माझ्या राहत्या घराच्या अवती भोवती दिसून येत आहे, असे सोनाली कळासारे हिने म्हटलं आहे. दरम्यान, आरोपीला पोलिसांनी लवकरात लवकर अटक करावी आणि पीडितेला न्याय द्यावा, अशी मागणी सहकारी व पीडितेच्या नातेवाईकांनी केली आहे.

अविनाश जाधव घेणार मुलीची भेट

का खाजगी रुग्णालयामध्ये  रिसेप्शनिस्टला परप्रांतीय तरुणाने बेदाम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेबाबत डोंबिवली मानपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून पीडित मुलीच्या बहिणीने परप्रांतीय तरुणांनी मारहाण केल्याचा दावा केला आहे. या कुटुंबाच्या भेटीसाठी मनसेचे पदाधिकारी अविनाश जाधव येणार असल्याची माहिती पीडित मुलीच्या बहिणीला फोनद्वारे अविनाश जाधव यांनी दिली. 

हेही वाचा

एकनाथ खडसेंवरच मुलाच्या खुनाचा आरोप; गिरीश महाजनांवर संतापले नाथाभाऊ, म्हणाले...

महत्त्वाच्या बातम्या

FDA चा कारवाईचा धडाका सुरुच, मुंबईतील 110 वर्ष जुन्या आणि प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मवर करावाई, परवाना केला रद्द
FDA चा कारवाईचा धडाका सुरुच, मुंबईतील 110 वर्ष जुन्या आणि प्रसिद्ध पारसी डेअरी फार्मवर करावाई, परवाना केला रद्द
Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंचा डॉक्टर, त्यांच्याशी ओळख, काम असल्यास करुन देऊ, व्हाटस ॲप ग्रुपवर मेसेज टाकणं पुण्यातील डॉक्टरला भोवलं, गुन्हा दाखल
तुकाराम मुंढेंचा डॉक्टर, काम असल्यास करुन देऊ, व्हाटस ॲप ग्रुपवर मेसेज टाकणाऱ्या डॉक्टरवर गुन्हा
Khalil Shaikh Ravindra Dhangekar : खलिल शेख आत्महत्या प्रकरणात रविंद्र धंगेकर अडचणीत, 10 जणांवर गुन्हा दाखल, अटकेची शक्यता 
खलिल शेख आत्महत्या प्रकरणात रविंद्र धंगेकर अडचणीत, 10 जणांवर गुन्हा दाखल, अटकेची शक्यता 
धक्कादायक! जळगावात धावत्या बसमधून सराफा व्यवसायिकाची 25 लाखांची बॅग लंपास, 24 तासाच्या आत चार आरोपींना अटक
धक्कादायक! जळगावात धावत्या बसमधून सराफा व्यवसायिकाची 25 लाखांची बॅग लंपास, 24 तासाच्या आत चार आरोपींना अटक

व्हिडीओ

Pankaja Munde Special Report : मीच बीडची खरी पालक,पंकजा मुंडेंच्या विधानाने राजकीय वातावरण तापले
NCP Inside Story : राष्ट्रवादीचे बडे नेते-फडणवीसांच्या भेटीबाबत सुनेत्रा पवार अंधारात?
Zero Hour Full : मतदार पुनर्रचवेवरुन देशात नवं राजकारण, झीरो अवरमध्ये सविस्तर चर्चा
NCP Merger News : राष्ट्रवादीचं विलिनीकरण की पवारांच्या पक्षात फूट? Special Report
Sanjay Raut On Chandrashekhar Bawankule : चंद्रशेखर बावनकुळे संवाद साधण्यासाठी चांगला माणूस; ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना संजय राऊत काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Re-NEET UG 2026 Result: नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
नीट यूजी परीक्षेचा निकाल जाहीर, 11.21 लाख विद्यार्थी पास, पंजाब-हरियाणाच्या विद्यार्थ्यांनी बाजी मारली 
UDAN : ‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
‘उडान’च्या पुढील टप्प्याअंतर्गत 28840 कोटी रुपयांची गुंतवणूक होणार,मुरलीधर मोहोळ यांची माहिती
Sonam Wangchuk : सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
सोनम वांगचुक यांनी उपोषण मागं घ्यावं, काँग्रेसच्या बड्या नेत्यांचं आवाहन, के.सी. वेणुगोपाल म्हणाले...
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
शॉकींग! मुंबईत भीषण दुर्घटना; बांधकामाधीन क्रेन कोसळून 22 वर्षीय तरुणाचा मृत्यू, 15 ते 16 वाहनांचेही नुकसान
Virat Kohli and Rohit Sharma : विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
 विराट कोहली आणि रोहित शर्मानं इतिहास रचला, गांगुली आणि द्रविडला मागं टाकलं, कोहलीचं अर्धशतक
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
महापालिकेत घोषणाबाजी, किशोरी पेडणेकरांना सभागृहात चक्कर; महापौरांसह नेतेमंडळी मदतीला धावली
Aaditya Thackeray: आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
आदित्य ठाकरेंचं PM नरेंद्र मोदींना पत्र; लाखोंची 'मन की बात', इथेनॉलमिश्रित पेट्रोलमुळे वाहनांचा मालयेज कमी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 16 जुलै 2026 | गुरुवार
Embed widget