Kalyan Crime News कल्याण: कल्याणमधील सिंडिकेट परिसरात एक धक्कादायक घटना (Kalyan Crime News) घडली आहे. उबर बाईक चालकाने तरुणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न (Kalyan Crime News) केल्याचं समोर आलं आहे. सदर प्रकरणी कल्याण महात्मा फुले पोलिसांनी याप्रकरणी तातडीने गुन्हा दाखल करत आरोपी बाईक चालक सिद्धेश संदीप परदेशी (19) याला अटक केली आहे. त्याला कल्याण न्यायालयाने गुरुवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.

Continues below advertisement

कल्याण येथे उबर बाईक चालकाकडून एका प्रवासी तरुणीचा विनयभंग केल्याची घटना घडली (Kalyan Crime) आहे. या पार्श्वभूमीवर कायदा धाब्यावर बसवून अवैध रित्या प्रवासी वाहतूक करणाऱ्या रॅपिडो, ओला, उबेर यासारख्या संस्थांना दिलेला तात्पुरता परवाना रद्द का करण्यात येऊ नये?, या संदर्भात परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी मोटार परिवहन विभागाची 16 डिसेंबर रोजी सकाळी 10.30 वाजता मंत्रालयातील आपल्या दालनात तातडीची बैठक बोलावली आहे.

नेमकं काय घडलं? (Kalyan Crime News)

सदर घटना 13 डिसेंबर रोजी सायंकाळी 7.30 वाजताच्या दरम्यान कल्याण पश्चिममध्ये एका तरुणीने उबर मोटरसायकल बुक केली. त्या मोटरसायकलवरून संबंधित तरुणी जिमला जात होती. आरोपीने तिला घराजवळून पिकअप केले. मात्र प्रवासाचा मेसेज आला नसल्याने तरुणीने ओटीपी विचारला. यादरम्यान, सिंधीगेट चौकाच्या दिशेने जात असताना आरोपी बाईकचालक सिद्धेश परदेशी याने अचानक बाईक निर्जन भागातील एका पडक्या इमारतीकडे वळवली. आरोपी चालकाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने तरुणीने कोणतीही भीती न बाळगता चालत्या बाईकवरून उडी मारली. यात संबंधित तरुणीच्या पायाला दुखापत झाली. तरीही आरोपीने तिला अंधारात ओढत नेत चाकूचा धाक दाखवला. त्याने तरुणीकडील सोन्याची आणि मोत्याची माळ तसेच एक हजार रुपये रोख हिसकावून घेतले. इतकेच नाही तर आरोपीने स्प्रे दाखवत ॲसिड हल्ल्याची धमकीही दिली. मात्र तरुणीने जोरदार प्रतिकार करून आरोपीच्या तावडीतून सुटका करून घेतली. तिने आरडाओरडा सुरू केला. तरुणीचा आवाज ऐकून परिसरातील स्थानिक नागरिक तात्काळ जमा झाले. नागरिकांनी बाईकचालकाला पकडून त्याला चोप दिला आणि नंतर महात्मा फुले चौक पोलिसांच्या ताब्यात दिले.

Continues below advertisement

राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, VIDEO:

संबंधित बातमी:

Pune Crime News: आधी धमक्या नंतर वाद मिटवण्यासाठी भेटायला बोलावलं अन्...; प्रियकरानं प्रेयसीच्या नवऱ्याला क्रूरपणे संपवलं; घटनेनं जेजुरी हादरलं