Crime News : दिवसेंदिवस चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. कल्याणमध्ये वालधुनी परिसरात विराट दर्शन या इमारतीमध्ये काल दुपारच्या सुमारास एका वृद्ध दांपत्याच्या घरी अज्ञात चोरट्यानं डल्ला मारला आहे. सोन्या चांदीचे दागिण्यांसह रोकड असा एकूण 12 लाख 69 हजारांचा मुद्देमाल लंपास केला आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महात्मा फुले पोलिस ठाण्याचे पथकाकडून चोरट्यांचा शोध सुरु

चोरी करण्यासाठी दुचाकीने आलेले हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. महात्मा फुले पोलिस ठाण्याचे पथक सीसीटीव्हीच्या आधारे या चोरट्यांचा शोध घेत आहेत. कल्याण पूर्वेकडील वालधुनी शिवाजीनगर परिसरात विराट दर्शन इमारतीमध्ये  72 वर्षीय सुखदेव आव्हाड हे आपल्या पत्नीसह राहतात. काल दुपारच्या सुमारास ते आपल्या पत्नीसोबत कामानिमित्त घराबाहेर गेले होते. याच वेळेस अज्ञात चोरट्याने त्यांच्या घराचा दरवाजा तोडून बेडरुम आणि किचन मधील लोखंडाच्या कपाटाचे लॉक तोडले. कपाटातून सोन्या चांदीच्या दागिन्यांसह रोकड असा मिळून तब्बल 12 लाख 69 हजारांचा मुद्देमाल चोरून नेला आहे. काही वेळाने आव्हाड घरी परतले असता त्यांना घरात चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यांनी या प्रकरणी महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली. हे चोरटे सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाले आहेत. या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करत चोरट्याचा शोध सुरू केला आहे.

महत्वाच्या बातम्या:

स्पायडर मॅनसारखा इमारतीवर चढून चोरी; पोलिसांनी 12 तासांत मुसक्या आवळल्या, 36 लाखांचे दागिने जप्त