(Source: Poll of Polls)
Kalyan Crime News : भाचीच्या डिलिव्हरीसाठी एकत्र आले, किरकोळ वाद विकोपाला; भाच्याने मामाचं डोकं रुग्णालयाच्या पायऱ्यांवर आपटलं, अन्...
Kalyan Crime News : कल्याण मोहने परिसरात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. यात घरगुती वादातून भाच्यानेच चक्क मामाची हत्या केली आहे. यात मामाचं डोकं रुग्णालयाच्या शिड्यावर आपटून हि हत्या केलीय.

Kalyan Crime News : कल्याण मोहने परिसरात एक अतिशय धक्कादायक घटना घडली आहे. यात घरगुती वादातून भाच्यानेच चक्क मामाची हत्या (Crime News) केली आहे. यात मामाचं डोकं रुग्णालयाच्या शिड्यावर आपटून हि हत्या केलीय. दरम्यान, या संपूर्ण मारहाणीची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. गणेश रमेश पुजारी असे हत्या करणाऱ्या भाच्याचे नाव आहे तर मारिअप्पा राजू नायर (वय 40 वर्ष) असे मयत झालेल्या मामाचे नाव आहे.
Kalyan Crime News : भाचीच्या डिलिव्हरीसाठी एकत्र आलेत, किरकोळ वाद विकोपाला, अन्...
मिळलेल्या माहितीनुसार, मामा आणि भाचे दोन्ही मुंबईच्या गोरेगावमध्ये एकत्र राहत असून भाचीच्या डिलिव्हरीसाठी हे दोघे मोहण्यात आले होते. यावेळी रुग्णालयात दोघात वाद झाला आणि भाच्याने मारहाण करत मामाचं डोकं रुग्णालयाच्या शिड्यावर आपटून त्याची हत्या केली. या प्रकरणी खडकपाडा पोलिसांना माहिती मिळताच खडकपाडा पोलिसांनी अवघ्या एक तासाच्या आत कल्याण स्थानकावरून पळून जाणाऱ्या भाच्याला अटक केलीय. सध्या पोलिसांकडून या घटनेचा तपास सुरू असून या घटनेने परिसरामध्ये एकच खळबळ उडाली आहे.
Barshi News : कोयता हातात घेऊन दहशत; पोलिसांनी काढली आरोपीची धिंड
दरम्यान, अशीच एक घटना सोलापूरच्या बार्शी तालुक्यात घडली आहे. यात ग्रामीण भागात कोयता घेऊन दहशत माजवल्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी पोलिसांनी आरोपीची धिंड काढलीय. या प्रकरणी वैराग पोलीसांनी तत्काळ ॲक्शन घेत आरोपीला अटक करून पूर्ण गावातून धिंड काढलीय.
मिळालेल्या माहिती नुसार, वैराग येथे दिवसाढवळ्या कोयता हातात घेऊन सुरज भोसले यांच्या किराणा दुकानाची तोडफोड केली होती. मागील प्रकरणात पोलिसांनी नाव सांगितल्याचा राग मनात धरून हातात कोयता घेऊन धमकवल्याचा प्रकारसमोर आला होता. आयाज अश्फाक शेख असं कोयता हातात घेऊन दहशत वाजवणाऱ्या युवकाचे नाव आहे. याप्रकरणी वैराग पोलिसांनी ॲक्शन घेत आरोपीला तत्काळ अटक केलीय. दरम्यान, सुरज भोसले यांच्या किराणा दुकानात घेऊन जात आरोपी शेख याची दहशत कमी करण्याचा पोलिसांनी प्रयत्न केलाय. आयाज शेख यांनी दुकानदाराला शिवीगाळ करत 'तुला आता जिवंत सोडत नाही, तुला बघतोच. तू मागच्या केसमध्ये आमचं नाव पोलिसांना का सांगितलं' म्हणून धमकावलंय. आयाज शेख यांनी दुकानातील साहित्यांची कोयत्याच्या माध्यमातून तोडफोड केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय. याप्रकरणी आयाज शेख याच्या विरोधात वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आणखी वाचा



















