Kalyan Crime News : झाडावरच्या कैऱ्या तोडण्यावरून वाद; अल्पवयीन मुलांच्या राड्यात पित्यावर प्राणघातक हल्ला; कल्याणमधील धक्कादायक घटना
Kalyan Crime News : कैऱ्या तोडण्यास गेलेल्या मुलांचा काही मुलांशी वाद झाला. या वादातून संतापलेल्या एका गटाने भर रस्त्यात एका मुलाच्या वडीलांवर चाकूने हल्ला (Crime News) केलाय.

Kalyan Crime News : कल्याण पश्चिमेकडील जोशी बाग परिसरात एक धक्कादायक घटना घडलीय. जोशिबाग परिसरातच कैऱ्या तोडण्यास गेलेल्या मुलांचा काही मुलांशी वाद झाला. या वादातून संतापलेल्या एका गटाने भर रस्त्यात एका मुलाच्या वडीलांवर चाकूने हल्ला (Crime News) केला. रायसिंग खुशवाह असे या जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे . ते जोशी बाग परिसरात पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करतात. खुशवाह यांना उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हल्ला करणारे आरोपी अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती आहे.
हल्ला करणारे आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती
पुढे आलेल्या माहितीनुसार, कल्याण पश्चिम जोशीबाग परिसरात राहणारे रायसिंग खुशवाह हे जोशीबाग परिसरात पाणीपुरी विकण्याचा व्यवसाय करतात. त्यांचा लहान मुलगा काल (18 एप्रिल) आपल्या काही मित्रांसोबत जोशी बाग परिसरातच कैऱ्या तोडण्यासाठी गेला होता. यावेळी त्याचा याच परिसरातील काही मुलांशी त्याचा वाद झाला. या वादामुळे संतापलेला मुलांचा एक गट जोशी बाग परिसरात खुशवाह पाणीपुरी विकत असलेल्या ठिकाणी आला. त्यांनी खुशवाह यांना मुलाबाबत विचारणा करत खुशवाह याना मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांच्यात शाब्दिक वाद झाला आणि या वादाचे रूपांतर नंतर हाणामारीत झालं. यात त्यांनी आपल्या जवळील चाकूने खुशवाह यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात खुशवाह जखमी झाले असून त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी तपास सुरू केलाय. हल्ला करणारे आरोपी अल्पवयीन असल्याची प्राथमिक माहिती आहे. मात्र या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जेसीबीने वीज वाहिनी तोडल्याने वसई पूर्व भागातील पाच गावे अंधारात
वसई पूर्व भागात महावितरणाचा गलथान कारभार समोर आला असून एका जेसीबीने मुख्य पाच गावांना जाणारी विद्युत वहिनी तोडल्याने पाच गावे अंधारात आहेत. मेढे, आडने, भिणार, आंबोडे, वडघर, कळभोन, लेंडी या गावात जाणारी मुख्य विद्युत वाहिनी जेसीपीनी तोडल्याने या गावातील विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. मात्र असे असतानाही महावितरणाचा एकही अधिकारी या ठिकाणी फिरकला नसल्याने नागरिकांचे संतापाचे वातावरण असून उन्हाळ्याच्या दिवसात हा प्रकार घडल्याने नागरिक उकाड्याने हैराण झाले आहे. या भागातील साधारण पाच हजार नागरिक आज अंधारात सापडले आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या























