कल्याण : कल्याणच्या मलंग रोडवरील नीलकंठ सोसायटीत उघडकीस आलेल्या खूनप्रकरणाने परिसरात खळबळ उडाली आहे. प्रियकराची हत्या करून त्याचा मृतदेह पोत्यात भरत पुरावे नष्ट करण्याचा (Kalyan Crime News) प्रयत्न केल्याचा आरोप एका महिलेवर असून, मृतदेह लवकर (Kalyan Crime News) सडावा म्हणून तब्बल २४ तास बाथरूममधील नळ सुरू ठेवल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या प्रकरणातील एका व्हॉइस मेलमुळे पोलिसांना महत्त्वाचा धागा मिळाल्यानंतर तपासाला वेग आला आहे.या प्रकरणी मानपाडा पोलिसांनी हत्येचा (Kalyan Crime News) गुन्हा दाखल केला असून घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने पाहणी केली आहे. आरोपी महिलेचा कथित 'वॉटर प्लॅन' उघड झाल्यानंतर तपास अधिक तीव्र करण्यात आला असून, पुढील तपासासाठी पोलिसांची विशेष पथके कोलकात्याकडे रवाना झाली आहेत. या हत्येमागील नेमके कारण आणि इतर आरोपींचा सहभाग याचा तपास सध्या सुरू आहे.(Kalyan Crime News)
कल्याणच्या मलंग रोड परिसरातील काकाचा ढाबा येथे एका हायप्रोफाईल मर्डर मिस्ट्रीने (Kalyan Crime News) खळबळ उडवून दिली आहे. नीलकंठ सोसायटीत एका व्यक्तीची डोक्यात वार करून धारदार शस्त्राने हत्या (Kalyan Crime News) करण्यात आल्याची पोलिसांची प्राथमिक आहे. अत्यंत थंड डोक्याने केलेल्या या हत्येनंतर पुरावा नष्ट करण्यासाठी आरोपी महिलेने जी क्रूर शक्कल लढवली, ती पाहून सराईत गुन्हेगारही चक्रावून जातील. मानपाडा पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून 'मोस्ट वाँटेड' आरोपी महिलेचा शोध सुरू केला आहे.(Kalyan Crime News)
Kalyan Crime News: दुर्गंधी आणि 'ती' गोणी: असा उघड झाला क्राईम सीन
गेल्या दोन ते तीन दिवसांपासून नीलकंठ सोसायटीतील एका बंद घरातून प्रचंड दुर्गंधी येत होती. स्थानिक रहिवाशांनी तात्काळ याची माहिती मानपाडा पोलिसांना दिली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले तेव्हा घर बाहेरून लॉक होते. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. घरात सगळीकडे शांतता होती, पण बाथरूमच्या दिशेने जाताच पोलिसांना संशयास्पद गोणी आढळून आली. ती गोणी उघडली असता, पोलिसांना आत सडलेल्या अवस्थेत एका पुरुषाची 'डेड बॉडी' आढळली.(Kalyan Crime News)
Kalyan Crime News: 'वॉटर प्लॅन' पुरावा नष्ट करण्याचा क्रूर कट
गुन्ह्याचा तपास करत असताना पोलिसांच्या हाती अत्यंत धक्कादायक माहिती लागली. आरोपी महिलेने प्रियकराचा गेम वाजवल्यानंतर मृतदेह गोणीत भरला. मृतदेहाची विल्हेवाट लावणे किंवा तो नष्ट करणे हा यामागचा हेतू असावा, असा पोलिसांचा संशय आहे. यासाठी तिने बाथरूमचा नळ पूर्ण चालू ठेवला. सोसायटीत दररोज पाणी सुटले की ते पाणी थेट गोणीवर पडत होते, ज्यामुळे मृतदेह पाण्यात भिजून लवकर सडत होता आणि रक्ताचे डागही वाहून जात होते.(Kalyan Crime News)
Kalyan Crime News: आरोपी महिलेचा 'व्हाईस मेल' आणि पोलिसांना चॅलेंज
हत्या केल्यानंतर आरोपी महिला मागचा-पुढचा कोणताही पुरावा न ठेवता थेट कोलकात्याच्या दिशेने फरार झाली. मात्र, पळून गेल्यानंतर तिने घरमालकाला एक व्हॉईस मेल पाठवला. या व्हाईस मेलमध्ये तिने म्हटले, "फ्लॅटमधील बाथरूमचा नळ चालू राहिला आहे आणि तिथे एक डेड बॉडी ठेवली आहे." हा व्हाईस मेल ऐकताच घरमालकाच्या पायाखालची जमीन सरकली. त्याने तात्काळ पोलिसांशी संपर्क साधला. मानपाडा पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी पाठवला असून गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे.
