Kalyan Crime News : हे बीड नाही...! मै हूँ डॉन गाण्यावर नाचत हातावर फिरवली रिव्हॉल्व्हर; भाजपचा पदाधिकाऱ्याचा प्रताप
Kalyan Crime News : कल्याणमध्ये (Kalyan Crime) एका हळदीच्या कार्यक्रमात भाजपच्या (BJP) पदाधिकार्याने चक्क रिव्हॉल्व्हर काढून हाताच्या बोटांवर फिरवत असल्याच्या एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

कल्याण: बीडमध्ये (Beed Crime) मोठ्याप्रमात गुन्हेगारी वाढल्यामुळे अनेकांचे रिव्हॉल्व्हर परवाने रद्द करण्यात आले असताना कल्याणमध्ये (Kalyan Crime) एका हळदीच्या कार्यक्रमात भाजपच्या (BJP) पदाधिकार्याने चक्क रिव्हॉल्व्हर काढून हाताच्या बोटांवर फिरवतांचा व्हिडिओ शूट केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात चांगलाच व्हायरल होतो आहे. चिंतामण लोखंडे असे या रिव्हॉल्व्हर फिरवणाऱ्या भाजप काऱ्याकर्त्यांचे नाव आहे.
कल्याणचे बीड होतंय का?
दरम्यान, हळदीमध्ये फायरिंग झाल्याच्या अनेक घटना कल्याण- डोंबिवलीत समोर आल्या आहेत. वाढदिवसात कधी तलवार नाचवणे, तर कधी बंदूक मिरवणे अशा घटना अनेकदा घडल्या आहेत. आता पुन्हा एकदा हळदीचा एक व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत भाजप पदाधिकारी चिंतामण लोखंडे रिव्हॉल्व्हर घेऊन हळदीत मैं हूँ डॉन या या गाण्यावर नाचताय. इतकच नाही तर सार्वजनिक ठिकाणी लायन्सन असले तरी अशा प्रकारे हत्यार काढून मिरवणं कितपत योग्य आहे? असा सवाल आता निर्माण झाला आहे. कल्याण उंबर्डे गावातील हा व्हिडिओ असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. त्यामुळे पोलीस या प्रकरणी नेमकी काय कारवाई करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. तर दुसरीकडे कल्याणचे बीड होतंय का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
सुरुची बाग परिसरात वणवा, मोठ्या प्रमाणात पर्यावरणाचे नुकसान
वसईच्या सुरुची बाग परिसरात शनिवारी सकाळी साडे नऊच्या सुमारास मोठ्या प्रमाणात वणवा पेटला होता. या आगीमुळे समुद्र किनाऱ्यावर असलेल्या सुरूच्या झाडांना मोठा फटका बसला आहे. सुरुची बाग परिसर समुद्र किनारी असल्याने येथे मोठ्या संख्येने सुरूची झाडे आहेत. मागील आठवड्यातही अशाच प्रकारची आग लागली होती. वारंवार लागणाऱ्या या आगींमुळे पर्यावरणाची मोठी हानी होत आहे. मोठ्या प्रमाणात झाडे जळून खाक होत असल्याने परिसरातील जैवविविधतेवरही गंभीर परिणाम होत आहे.
ही आग नैसर्गिक कारणांमुळे लागली की कोणीतरी जाणूनबुजून पेटवली, याचा शोध घ्यावा, अशी मागणी पर्यावरणप्रेमींनी केली आहे. स्थानिक प्रशासन आणि वनविभागाने या घटनांची चौकशी करून तातडीने आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशीही मागणी होत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या























