कल्याण: "फ्लॅटमधील बाथरूमचा नळ चालू राहिला आहे आणि तिथे एक डेड बॉडी ठेवली आहे...", एका आरोपी महिलेने घरमालकाला पाठवलेल्या या एका धक्कादायक व्हॉईसमेलने कल्याण पोलिसांच्या (Kalyan Crime News) तपासाला अचानक वेगळाच वळण दिलं. कल्याणमधील मलंग रोडवर असलेल्या नीलकंठ सोसायटीत घडलेल्या या हायप्रोफाईल मर्डर मिस्ट्रीने(Kalyan Crime News) संपूर्ण परिसरात प्रचंड खळबळ उडवून दिली आहे.(Kalyan Crime News)
प्रियकराची डोक्यात वार करून निर्घृण हत्या केल्यानंतर, आरोपी महिलेने अत्यंत थंड डोक्याने त्याचा मृतदेह एका पोत्यात भरला. पुरावे नष्ट करण्यासाठी तिने तब्बल २४ तास बाथरूमचा नळ सुरूच ठेवला, जेणेकरून मृतदेह पाण्यात भिजून लवकर सडावा आणि रक्ताचे डागही वाहून जावेत. हा क्रूर 'वॉटर प्लॅन' आखून महिला थेट कोलकात्याच्या दिशेने फरार झाली. मात्र, पळून गेल्यानंतर तिने घरमालकाला पाठवलेल्या एका व्हॉईसमेलमुळे या संपूर्ण थराराचा पर्दाफाश झाला.(Kalyan Crime News)
Kalyan Crime News: व्हॉईसमेल ऐकला अन् घरमालकाच्या पायाखालची जमीन सरकली!
गेल्या दोन-तीन दिवसांपासून नीलकंठ सोसायटीतील या बंद घरातून प्रचंड दुर्गंधी येत होती. त्यातच फरार झालेल्या आरोपी महिलेचा घरमालकाला तो धक्कादायक व्हॉईसमेल आला. मेसेज ऐकताच हादरलेल्या घरमालकाने क्षणाचाही विलंब न करता तात्काळ मानपाडा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत दरवाजा तोडून आत प्रवेश केला. बाथरूमच्या दिशेने गेल्यावर पोलिसांना एक संशयास्पद गोणी आढळून आली, ज्यात मृतदेह अत्यंत सडलेल्या अवस्थेत होता.
Kalyan Crime News: फॉरेन्सिक पथक दाखल; पोलिसांची पथके कोलकात्याकडे रवाना
मानपाडा पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून घटनास्थळी फॉरेन्सिक पथकाने पाहणी करून महत्त्वाचे पुरावे गोळा केले आहेत. व्हॉईसमेलच्या महत्त्वाच्या धाग्यावरून पोलिसांनी आपली तपासाची चक्रे वेगाने फिरवली असून 'मोस्ट वाँटेड' आरोपी महिलेच्या अटकेसाठी पोलिसांची विशेष पथके थेट कोलकात्याकडे रवाना झाली आहेत. हत्येमागील नेमके कारण काय होते आणि यामध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा कसून तपास सध्या पोलीस करत आहेत.
Kalyan Crime News: नेमकं प्रकरण काय?
प्रेयसीनेच आपल्या प्रियकराची हत्या केली असावी असा पोलिसांना संशय आहे. हत्या केल्यानंतर पुरावे नष्ट करण्यासाठी बाथरूमचा नळ सुरू ठेवून ती कोलकात्याला पसार झाल्याचे मानले जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून परिसरातील रहिवाशांना या बंद फ्लॅटमधून प्रचंड दुर्गंधी येत असल्याचे जाणवत होते. दुर्गंधी वाढतच गेल्याने त्यांनी तात्काळ मानपाडा पोलिसांना याची माहिती दिली. पोलिसांचे पथक जेव्हा अपार्टमेंटमध्ये पोहोचले, तेव्हा त्यांना घर बाहेरून लॉक असल्याचे आढळले. पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला आणि झडती घेतली असता, बाथरूममध्ये ठेवलेल्या एका ड्रममध्ये मोठी गोणी (पोते) आढळून आली. ती गोणी उघडली असता, पोलिसांना आत त्या तरुणाचा अत्यंत सडलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळला, ज्याचे अनेक तुकडे करून ते ड्रममध्ये कोंबण्यात आले होते.
घटनास्थळावरून पुरावे गोळा करण्यासाठी तात्काळ फॉरेन्सिक पथकाला पाचारण करण्यात आले, तर मृतदेह शवविच्छेदनासाठी (Post-mortem) रुग्णालयात पाठवण्यात आला. प्राथमिक तपासातून असे दिसून येते की, हा गुन्हा लपवण्याच्या उद्देशाने मृतदेह ड्रममध्ये कोंबण्यापूर्वी पीडितावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला होता. हत्या केल्यानंतर आरोपी महिलेने जाणीवपूर्वक बाथरूमचा नळ चालू ठेवला होता, असा संशयही पोलिसांनी व्यक्त केला आहे. पाण्याच्या सततच्या प्रवाहामुळे मृतदेह लवकर सडावा आणि रक्ताचे डाग किंवा इतर फॉरेन्सिक पुरावे धुऊन जावेत, या हेतूने तिने हे केल्याचे तपासाधिकाऱ्यांचे मानणे आहे.
तपासादरम्यान पोलिसांना असे आढळून आले की, आरोपी महिलेने पळून जाण्यापूर्वी घरमालकाला एक व्हॉईस मेसेज पाठवला होता.तपासाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तिने घरमालकाला फ्लॅटच्या बाथरूममध्ये एक मृतदेह पडला असून नळ चालू ठेवल्याची माहिती दिली होती. या मेसेजमुळेच अखेर या गुन्ह्याचा पर्दाफाश झाला आणि पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. मानपाडा पोलिसांनी याप्रकरणी हत्येचा गुन्हा दाखल केला असून सखोल तपास सुरू केला आहे. संशयित महिलेचा शोध घेऊन तिला अटक करण्यासाठी पोलिसांचे एक विशेष पथक कोलकात्याला रवाना करण्यात आले आहे.
मृत व्यक्ती आणि आरोपी महिला यांच्यातील संबंध, हत्येमागील संभाव्य कारण आणि हा गुन्हा आधीच आखलेला कट (Preplanned) होता का, या सर्व बाबींचा पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. प्रारंभिक तपास हा पूर्वसु नियोजित हत्येकडे बोट दाखवत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. मात्र, हत्येचा नेमका घटनाक्रम आणि कारण हे पूर्ण तपासानंतर तसेच शवविच्छेदन आणि फॉरेन्सिक अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
