एक्स्प्लोर

Kalyan : घरासमोर खेळत असलेल्या अल्पवयीन गतिमंद मुलीवर अत्याचार, कल्याणमधील नराधमास बेड्या

Kalyan Crime : घरासमोर खेळत असलेल्या गतिमंद मुलीला बोलावून तिच्यावर एका नराधमाने अत्याचार केल्याची घटना कल्याणमध्ये घडली. 

ठाणे :  कल्याण जवळील मोहने गाळे गाव परिसरात एका 15 वर्षीय गतिमंद अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना घडली.  याच परिसरात राहणाऱ्या इसमाने हे कृत्य केल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. याप्रकरणी टिटवाळा पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी सुनील पवार याला बेड्या ठोकल्या. आरोपीला कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. 

कल्याण जवळील मोहने गाळेगाव परिसरात सदर गतिमंद मुलगी ही आपल्या कुटुंबासोबत राहते. बुधवारी ही गतिमंद मुलगी आपल्या घराच्या परिसरातील अंगणात खेळत असताना सुनील पवार या नराधमाची नजर तिच्यावर पडली. सुनील पवार याने तिला घरात बोलवून घेतले आणि घराचे दार बंद करत तिच्याशी अश्लील चाळे केले.

बराच वेळ झाला मुलगी दिसत नसल्याने तिच्या कुटुंबीयांनी आजूबाजूच्या परिसरात शोध घेतला. त्यांना सुनीलवर संशय आल्याने त्यांनी सुनीलचा दरवाजा ठोकवला. मात्र दरवाजा बंद होता. अखेर या दरवाजाचा टाळा तोडून पीडितेचे कुटुंब घरात गेले असता त्यांना तिकडे मुलगी आढळून आली. 

घाबरलेल्या मुलीने घडलेला प्रकार तिच्या कुटुंबीयांना सांगितला. या प्रकरणी तात्काळ टिटवाळा पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. या तक्रारीनुसार पोलिसांनी सुनील पवार याच्या विरोधात गुन्हा दाखल करत त्याला अटक केली.

उबेर चालकाकडून अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन विनयभंग

उबेर चालकाकडून अल्पवयीन मुलीचे अपहरण करुन विनयभंग केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पवई येथे राहणारी 14 वर्षीय मुलीने मंगळवारी दुपारी 4.30 दरम्यान दादर प्रभादेवी येथून घरी जाण्यासाठी उबेर अॅपवरुन कार बुक केली होती. उबेर चालकाने मुलीने दिलेल्या पवई येथील घराच्या दिशेने कार न घेऊन जाता इस्टन एक्सप्रेसकडे कार निर्जनस्थळी नेल्याचा आरोप मुलीने तक्रारीत केला आहे. तसेच उबेर चालकाकडून मुलीसोबत गैरवर्तन करत तिची छेड काढल्याचा आरोप तक्रारीत मुलीने केला आहे.

दादर पोलिसांकडून उबेर चालकावर गुन्हा दाखल

या प्रकरणी मुलीच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीनुसार दादर पोलिसांनी उबेर चालकावर 75, 79 बीएनएस 2023 सह कलम 12 पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी दादर पोलिस अधिक तपास करत आहेत. दरम्यान, उबेर चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस त्याचा तपास घेत आहेत. 

ही बातमी वाचा: 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ब्लॉग : मोडून पडलाय संसार आणि मोडलाय 'कणा' सुद्धा...!
ब्लॉग : मोडून पडलाय संसार आणि मोडलाय 'कणा' सुद्धा...!
मी आंदोलनात असेन किंवा नसेनही, लक्ष्मण हाकेंची भावनिक पोस्ट; आरक्षणाच्या लढाईबाबत मोठा निर्णय?
मी आंदोलनात असेन किंवा नसेनही, लक्ष्मण हाकेंची भावनिक पोस्ट; आरक्षणाच्या लढाईबाबत मोठा निर्णय?
निलेश घायवळ लंडनला, पोलिसांनी कोथरूडचा घर गाठलं; 2 स्कॉर्पिओ अन् टू-व्हिलर जप्त, आरोपींची धिंडही काढली
निलेश घायवळ लंडनला, पोलिसांनी कोथरूडचा घर गाठलं; 2 स्कॉर्पिओ अन् टू-व्हिलर जप्त, आरोपींची धिंडही काढली
BLOG: नवरात्री विशेष | भाग 5 : आनंदीबाई जोशी : भारताची पहिली महिला डॉक्टर
BLOG: नवरात्री विशेष | भाग 5 : आनंदीबाई जोशी : भारताची पहिली महिला डॉक्टर
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Omraje Nimbalkar Video : गळ्याएवढ्या पाण्यात बाजी लावली,  'कोहीनूर' ओमराजेंचा UNCUT व्हिडीओ
Sharad Pawar| Gorakshak मुळे शेतकऱ्यांचे हाल: म्हशी विकल्या तरी अडवणूक : शरद पवार
Azam Khan Bail : आझम खान दोन वर्षांनंतर तुरुंगातून सुटणार? शेवटच्या गुन्ह्यातही मिळाला जामीन
Parbhani Lower Dhudhna : परभणीलाही पावसाने झोडपलं, लोअर दुधना प्रकल्पातून पाण्याचा विसर्ग
Heavy Rain In Marathwada : मराठवाड्यात जनजीवन ठप्प, Dharashiv, Beed, Jalna मध्ये थैमान!

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ब्लॉग : मोडून पडलाय संसार आणि मोडलाय 'कणा' सुद्धा...!
ब्लॉग : मोडून पडलाय संसार आणि मोडलाय 'कणा' सुद्धा...!
मी आंदोलनात असेन किंवा नसेनही, लक्ष्मण हाकेंची भावनिक पोस्ट; आरक्षणाच्या लढाईबाबत मोठा निर्णय?
मी आंदोलनात असेन किंवा नसेनही, लक्ष्मण हाकेंची भावनिक पोस्ट; आरक्षणाच्या लढाईबाबत मोठा निर्णय?
निलेश घायवळ लंडनला, पोलिसांनी कोथरूडचा घर गाठलं; 2 स्कॉर्पिओ अन् टू-व्हिलर जप्त, आरोपींची धिंडही काढली
निलेश घायवळ लंडनला, पोलिसांनी कोथरूडचा घर गाठलं; 2 स्कॉर्पिओ अन् टू-व्हिलर जप्त, आरोपींची धिंडही काढली
BLOG: नवरात्री विशेष | भाग 5 : आनंदीबाई जोशी : भारताची पहिली महिला डॉक्टर
BLOG: नवरात्री विशेष | भाग 5 : आनंदीबाई जोशी : भारताची पहिली महिला डॉक्टर
हिंगोलीत गौतमीच्या कार्यक्रमात हुल्लडबाज तरुणांनी घातला गोंधळ,  पोलिसांनी केला लाठीचार्ज  
हिंगोलीत गौतमीच्या कार्यक्रमात हुल्लडबाज तरुणांनी घातला गोंधळ,  पोलिसांनी केला लाठीचार्ज  
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2025 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2025 | शुक्रवार
आरक्षण वाचविण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, पण...; छगन भुजबळांचं ओबीसींना आवाहन
आरक्षण वाचविण्यासाठी आपण प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय, पण...; छगन भुजबळांचं ओबीसींना आवाहन
Asia Cup 2025 : आशिया चषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानला धक्का, आयसीसीची हॅरिस राऊफवर मोठी कारवाई, साहिबजादा फरहानला फटकारलं
आशिया चषकाच्या अंतिम सामन्यापूर्वी पाकिस्तानला धक्का, आयसीसीची हॅरिस राऊफवर मोठी कारवाई
Embed widget