ठाणे : युक्रेनमधील एका महिलेसोबत असलेल्या अनैतिक संबंधांना विरोध केला, पण सांगूनही पती युक्रेनला (Kalyan man relationship with Ukrain woman) गेल्याचं समजल्यानंतर पत्नीने आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणानंतर युक्रेनवरून परतलेल्या पतीला अटक करण्यात आली आहे. नितीश नायर असे अटक आरोपी पतीचे नाव असून तो  कल्याण (पूर्व) येथील काटेमानिवली परिसरात राहणारा आहे.


एका शिपिंग कंपनीत डेस्क मॅनेजर म्हणून नोकरी  करणाऱ्या 26 वर्षीय व्यक्तीचे  युक्रेनमध्ये राहणाऱ्या एका महिलेसोबतच्या अनैतिक संबंध होते. तिच्या पत्नीने त्याला विरोध केला होता. मात्र विरोध करूनही पती गुपचूप पत्नीला न सांगता युक्रेनला गेल्याचे कळल्यानंतर 25 वर्षीय पत्नीने  आत्महत्या  केली होती. याप्रकरणी कोळसेवाडी पोलीस ठाण्यात पतीवर गुन्हा दाखल केला. गुन्ह्याचा तपास सुरू असतानाच युक्रेनमधून  परतलेल्या पतीला  अटक करण्यात आली आहे. 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृतक काजलचे वडील सुरेंद्र सावंत यांनी  कोळसेवाडी पोलीस ठाण्यात दिलेल्या  तक्रारीत म्हटले की, आरोपी  नितीशवर माझ्या मुलीचे प्रेम होते. त्यामुळे दोघांचा  प्रेमविवाह  2020 मध्ये झाला होता. दोन वर्ष सुखाने संसार सुरू असतानाच, सप्टेंबर महिन्यात पत्नीला माहिती मिळाली होती की आपला पती नितीशचे युक्रेनमधील एका महिलेसोबत अनैतिक  संबंध असल्याचा संशय आला होता. शिवाय  तिच्या पतीचे त्या महिलेसोबतचे काही फोटोही मोबाईलमध्ये दिसल्याने संशय अधिकच बळावला होता. 


पती गुपचूप युक्रेनला गेला


कुटुंबीयांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले  आहे की मृत काजलला तिच्या पतीच्या अनैतिक संबंधाबद्दल कळल्यानंतर तिने त्याच्या नात्याला विरोध केला होता आणि भविष्यात युक्रेनला न जाण्याचा इशारा पतीला दिला होता. मात्र 8 नोव्हेंबरला नितीशने आपल्या पत्नीला सांगितले की तो काही कामासाठी बीकेसी येथील त्याच्या कार्यालयात जात आहे. पण त्याऐवजी तो युक्रेनला गेला आणि तिथून त्याने पत्नी काजलला मेसेज केला की, मी युक्रेनला पोहोचलो असून मी परत येणार नाही. तसेच तू मला  विसरून जा, दुसरा मार्ग निवड. असा मेसेज आरोपी पतीने पत्नीला पाठवला यामुळे पत्नी नैराश्यात गेली होती, त्यानंतर तिला खूप मानसिक त्रास झाला आणि 10 नोव्हेंबर रोजी दिवाळी सणानिमित्त तिने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली.


कल्याणमध्ये येताच पतीला बेड्या


आत्महत्या करण्यापूर्वी तिच्या काही मित्रांना मेसेज करून आत्महत्या करणार असल्याची माहिती दिल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आहे. शिवाय मृत पत्नीने तिच्या आईला पतीकडून होणाऱ्या आघाताची माहिती दिली होती. तसेच  काजलने आपले जीवन संपवल्यानंतर, गुरुवारी तिचा पती नितीश मायदेशी परतला आणि परत आल्याची माहिती मिळताच  त्याला त्याच्या राहत्या घरातून  अटक केली. दुसरीकडे  आरोपी पती नितीशला अटक केल्यानंतर मृत पत्नीच्या  कुटुंबीय त्यांच्या मुलीचा जीव घेतल्याबद्दल त्याला जास्तीत जास्त शिक्षा देण्याची मागणी करत आहेत.


ही बातमी वाचा: