अहिल्यानगर : शेकडो महिलांचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या भोंदूबाबा अशोक खरातवर (Ashok kharat) एका मागोमाग एक गुन्हे दाखल होत आहेत. अनेक पीडित महिला समोर येऊन खरातविरुद्ध गुन्हा नोंदवत असून काहींनी फसवणूक व आर्थिक व्यवहाराबाबतही तक्रारी दिल्या आहेत. विशेष म्हणजे, अशोक खरात हा सावकारकीचाही धंदा करायचा, त्यामध्ये त्याची पत्नी देखील भागिदार होती. त्यामुळे, त्याच्या पत्नीविरुद्ध देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, गुन्हा दाखल होताच कल्पना खरातने (Ahilyanagar) धूम ठोकली. आता, अशोक खरातची फरार पत्नी कल्पना खरात हिच्याविरोधात लुकआऊट नोटीस (Police) जारी करण्यात आली. त्यामुळे, कल्पना खरात परदेशात पळून जाण्याचा मार्ग बंद झाला आहे. 

Continues below advertisement

शिर्डी पोलिसांकडून कल्पना खरातविरुद्ध लुकआऊट नोटीस जारी करण्यात आल्याने आता देशातील सर्वच विमानतळावरुन संबंधित व्यक्तीला विदेशी प्रवासाची बंदी घालण्यात आली आहे. शिर्डीत भोंदू अशोक खरातसह पत्नीवर शेतकऱ्याची फसवणूक आणि सावकारकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यानंतर खरातची पत्नी कल्पना खरात फरार झाल्या असून शिर्डी पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू आहे. त्यातच, आरोपी कल्पना खरात परदेशात पळून जाण्याची शक्यता वर्तवली जात होती. कारण, यापूर्वी अशोक खरात देखील परदेशात पळून जाण्याच्या तयारीत होती. मात्र, पोलिसांनी त्याला संधीच दिली नाही, त्याच पार्श्वभूमीवर आता कल्पना खरात यांनाही पळून जाता येऊ नये म्हणून शिर्डी पोलिसांकडून लुकआऊट नोटीस जारी करण्यात आली. त्यामुळे, कल्पना खरातची नाकेबंदी झाली आहे. 

खरातच्या पत्नीवर कुठला गुन्हा (Ashok kharat wife)

शिर्डीतील 4 एकर भूखंडाच्या खरेदी-विक्री व्यवहारात फसवणूक केल्याप्रकरणी अशोक खरातसह पाच जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. मूळ जमीन मालक रावसाहेब गोंदकर यांनी यासंदर्भात फिर्याद दिली होती. कर्ज फेडण्यासाठी व्याजाने पैसे देऊन, सावकारी पाशात ओढून जमीन बळकावल्याचा आरोप खरात कुटुंबावर आहे. या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी फसवणूक आणि सावकारी अधिनियमांतर्गत गुन्हा नोंदवला आहे. अशोक खरात, त्याची पत्नी कल्पना खरात, शिर्डीतला मध्यस्थ अरविंद बावके, किरण सोनावणे, अशोक तांबे यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. 

Continues below advertisement

हेही वाचा

जरा मोठ्याने बोल...न्यायाधीशांचे 2 प्रश्न; अशोक खरातचे हात जोडून उत्तर, आजच्या सुनावणीत काय काय घडलं? A टू Z माहिती