एक्स्प्लोर

Kalpana Kharat: अशोक खरातच्या पत्नीला मोठा दणका, कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन फेटाळला; न्यायालयाचे कडक ताशेरे, नेमकं काय घडलं?

Kalpana Kharat: शिर्डी पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या फसवणूक आणि बेकायदेशीर सावकारी प्रकरणातील आरोपी कल्पना खरातला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा दणका दिला आहे.

Kalpana Kharat: शिर्डी पोलीस ठाण्यात (Shirdi Police Station) दाखल झालेल्या फसवणूक (Cheating) आणि बेकायदेशीर सावकारी प्रकरणातील आरोपी कल्पना अशोक खरातला मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने मोठा दणका दिला आहे. कल्पना खरातने अटकेपासून वाचण्यासाठी न्यायालयात दाखल केलेला अटकपूर्व जामीन अर्ज (Anticipatory Bail) न्यायालयाने तपासातील गंभीर पुरावे पाहता फेटाळून लावला आहे. या प्रकरणात आता तिची पोलीस कोठडीत चौकशी होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

Kalpana Kharat: नेमकं प्रकरण काय आहे?

या खटल्यातील फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार, त्याने आरोपींकडून 3 कोटी रुपये 2 टक्के मासिक व्याजाने कर्ज म्हणून घेतले होते. या कर्जाच्या हमीपोटी आरोपींनी फिर्यादीच्या शेतीचे खरेदीखत कल्पना खरातच्या नावाने लिहून घेतले होते. पुढे फिर्यादीने घेतलेले कर्ज आणि त्यावरील व्याजाची संपूर्ण रक्कम प्रामाणिकपणे परत केली. मात्र, पैसे परत मिळूनही आरोपींनी फिर्यादीची जमीन त्याच्या नावे परत करण्यास साफ नकार दिला. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच फिर्यादीने पोलिसात धाव घेतली होती.

Kalpana Kharat: 'केवळ पत्नी असल्याने गोवले'; कल्पना खरातचा अजब दावा

अटकेच्या भीतीने कल्पना खरातने औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला होता. न्यायालयात युक्तिवाद करताना कल्पना खरातने दावा केला की, "या संपूर्ण आर्थिक व्यवहारात माझा कोणताही थेट सहभाग नव्हता. मी केवळ मुख्य आरोपीची पत्नी असल्याने मला या गुन्ह्यात गोवण्यात आले".

Kalpana Kharat: बँक खात्यातील नोंदी अन् स्वाक्षऱ्यांमुळे बिंग फुटले

कल्पना खरातचा हा दावा खोडून काढण्यासाठी सरकारी पक्षाने तपासादरम्यान गोळा केलेले महत्त्वाचे पुरावे न्यायालयासमोर सादर केले. सरकारी वकिलांनी न्यायालयात स्पष्ट केले की, फिर्यादीच्या जमिनीच्या खरेदीखतावर खुद्द कल्पना खरातच्या स्वाक्षऱ्या आहेत. एवढेच नव्हे तर, तिच्या बँक खात्यातील व्यवहारांच्या नोंदींवरून तिला या संपूर्ण बेकायदेशीर व्यवहाराची पूर्ण माहिती असल्याचे आणि तिचा यात सहभाग असल्याचे स्पष्ट पूरक पुरावे तपासात आढळले आहेत.

Kalpana Kharat: दिशाभूल केल्याबद्दल न्यायालयाचे कडक ताशेरे

दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने कल्पना खरातच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. न्यायालयाने आपल्या निरीक्षणात नोंदवले की, "अर्जदार महिलेने आपल्याला या व्यवहाराची माहिती नसल्याचा केलेला दावा प्रथमदर्शनी पूर्णपणे खोटा असल्याचे दिसून येत आहे. तिने स्वतःचा गुन्ह्याशी संबंध लपवण्यासाठी आणि न्यायालयाची दिशाभूल करण्यासाठी अनेक महत्त्वाची तथ्ये जाणीवपूर्वक दडपली आहेत".

खरेदीखतावरील स्वाक्षऱ्या आणि बँक खात्यातील व्यवहार हे कल्पना खरातचा गुन्ह्यातील प्राथमिक संबंध दर्शवण्यासाठी पुरेसे आहेत. त्यामुळे या गंभीर गुन्ह्याची सखोल पाळेमुळे खणून काढण्यासाठी आरोपीची कोठडीतील चौकशी आवश्यक आहे, असे स्पष्ट करत न्यायालयाने कल्पना खरातचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळून लावला आहे.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा 

Ashok Kharat Case: मोठी बातमी: अशोक खरात प्रकरणात उज्ज्वल निकमांची एन्ट्री; विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पतीच्या छळाला कंटाळून महिलेने 10 महिन्यांच्या लेकीला संपवलं, मृतदेह घेऊन पोहोचली थेट पोलिस स्थानकात, सोलापूरच्या बार्शीत धक्कादायक घटना
पतीच्या छळाला कंटाळून महिलेने 10 महिन्यांच्या लेकीला संपवलं, मृतदेह घेऊन पोहोचली थेट पोलिस स्थानकात, सोलापूरच्या बार्शीत धक्कादायक घटना
संतापजनक! महाविद्यालयीन तरुणीवर सलग एक वर्ष चौघांकडून लैंगिक अत्याचार, पुण्यात धक्कादायक घटना, चार आरोपींना अटक 
संतापजनक! महाविद्यालयीन तरुणीवर सलग एक वर्ष चौघांकडून लैंगिक अत्याचार, पुण्यात धक्कादायक घटना, चार आरोपींना अटक 
Nashik Crime News: पतीनं पत्नी अन् चिमुकल्याला निर्दयीपणे संपवलं; स्वतःही घेतलं विष, रूग्णालयात मृत्यूशी झुंज, नाशिकमधील हादरवणारी घटना
पतीनं पत्नी अन् चिमुकल्याला निर्दयीपणे संपवलं; स्वतःही घेतलं विष, रूग्णालयात मृत्यूशी झुंज, नाशिकमधील हादरवणारी घटना
Khalil Shaikh and Ravindra Dhangekar Case : खलील शेख प्रकरणी रवींद्र धंगेकरांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी पुढे ढकलली, कोर्टात नेमकं काय घडलं? अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरेंनी दिली माहिती
खलील शेख प्रकरणी रवींद्र धंगेकरांच्या अटकपूर्व जामीनावरील सुनावणी पुढे ढकलली, कोर्टात नेमकं काय घडलं? अ‍ॅड. विजयसिंह ठोंबरेंनी दिली माहिती
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

NEET Result 2026 Pune Krushna Hundekari : नीट परिक्षेच्या निकालात गडबड; पुण्यातील विद्यार्थिनीचे आरोप
Tear bomb attack on CJP Protest : आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रू धुराचा वापर
Gunaratna Sadavarte PC : कायदा तोडल्यास गुन्हा दाखल करा, ठाकरेंच्या आंदोलनावर सदावर्तेंचा हल्लाबोल!
Sonam Wangchuk Protest : दिल्लीत वादंग, मुंबईत वादळ, ठाकरेंनी सुनावलं Special Report
Ravindra Dhangekar Not Reachable : रवींद्र धंगेकरांवर अटकेची टांगती तलवार, प्रकरण काय? | Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत ते संसदेच्या चौकटीपर्यंत विद्यार्थ्यांचा देशव्यापी रस्त्यावर आक्रोश; दिल्लीत पोलिसांनी डोकीच्या डोकी फोडली, करंट दिला, तरुणी सुद्धा रक्तबंबाळ, राज्यातही एकच आक्रोश
Share Market : सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
सेन्सेक्स निफ्टीत मोठी घसरण, गुंतवणूकदारांची 1.83 लाख कोटींची कमाई, शेअर बाजारात नेमकं काय घडलं?
Amit Shah : CJP च्या आंदोलनामुळं नवी दिल्लीत बैठकांचा धडाका, अमित शाहांची धर्मेंद्र प्रधान यांच्यासोबत बैठक, इतर दोन मंत्र्यांची हजेरी 
अभिजित दिपकेच्या सीजेपीच्या आंदोलनाचा परिणाम, दिल्लीत बैठकांचा धडका, अमित शाहांच्या बैठकीत तीन मंत्र्यांची उपस्थिती  
Delhi Jantar Mantar Protest: 'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
'दिल्ली पोलिसांनी सोनम वांगचूक यांच्या पत्नी गीतांजली यांना केसांना धरुन खेचलं, लाठीमारात 40-50 विद्यार्थ्यांची डोकी फोडली', सीजेपीचा गंभीर आरोप
Yogendra Yadav : संसदेकडे जाणारे सर्व रस्ते गर्दीने भरुन गेलेत, लाखोंचा जमाव पाहून योगेंद्र यादव भारावले, म्हणाले, 'हा ऐतिहासिक क्षण...'
50 वर्षांनंतर शिक्षण आणि बेरोजगारीच्या मुद्यावर युवक रस्त्यावर उतरले, योगेंद्र यादव व्हिडिओ शेअर करत म्हणाले...
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
जंतरमंतरवरील आंदोलकांना करंट दिल्याचा अत्यंत गंभीर आरोप; अनेकांना भर आंदोलनात करंटचे झटक्यावर झटके, पोलिसांनी आरोपाचं उत्तर सुद्धा दिलं नाही
Samruddhi Mahamarg Accident : मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
मुलीच्या इंजिनिअरिंगच्या ॲडमिशनसाठी परिवार पुण्याला गेला; मुलगी तिथेच राहिली, परतताना ट्रकनं कारला धडक दिली, तिघे होरपळले, दोन्ही ड्रायव्हरसह 5 जणांचा मृ्त्यू अपघाताची A टू Z माहिती समोर
Geetanjali Wangchuk : आम्ही देशासाठी लढतोय, शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
शिक्षण व्यवस्थेची जबाबदारी न सांभाळू शकणाऱ्यांचा राजीनामा घ्या, गीतांजली वांगचुक यांची मागणी
Embed widget