Jogeshwari Crime News : रेल्वेत आता रेल्वेचे कर्मचाऱ्यांसाठी सुद्धा सुरक्षित नाहीका? असाप्रश्नआताविचारलाजातोय. असाप्रश्नविचारण्यामागचंकारणम्हणजे जोगेश्वरी रेल्वे स्थानकात (Jogeshwari Railway Station) तिकीट तपासणीदरम्यान रेल्वे कर्मचाऱ्यावर प्रवाशानं हल्ला केल्याचीघटनाघडलीआहे. यात विना तिकीट प्रवास करणाऱ्या प्रवाशाला 500 रुपयांचा दंड भरण्यास सांगितल्याने वाद उफाळूनआला. अशातच दंड भरण्यास नकार देत RPF कार्यालयात नेण्यासही आरोपीचा विरोध होता. अशातच RPF कार्यालयात नेत असताना आरोपीने तिकीट तपासणी कर्मचाऱ्याच्या चेहऱ्यावर मुक्का मारतमारहाणकेल्याचीमाहितीसमोरआलीआहे. (Jogeshwari Crime News)
Jogeshwari Crime News: रेल्वेकर्मचाऱ्याला डोळ्याखाली गंभीर दुखापत; 7 टाके लागले
दरम्यान, मुक्का चष्म्यावर लागल्याने चष्म्याची काच फुटली. यातरेल्वेकर्मचाऱ्याला डोळ्याखाली गंभीर दुखापत झाल्याचीमाहितीआहे. तरधक्कादायकबाबम्हणजेयामारहाणीत जखमी रेल्वे कर्मचारी आशीष रंजन गुप्ता यांच्या डोळ्याखाली डॉक्टरांनी 7 टाके घालावेलागलेआहे. 9 सप्टेंबर रोजी सायंकाळी 4.55 वाजता जोगेश्वरी स्थानकातील प्लॅटफॉर्म चर्चगेट दिशेकडील ब्रिजवर ही घटना घडलीआहे.
Jogeshwari Crime : सरकारी कर्मचारी कर्तव्य बजावत असताना अडथळा आणण्याच्या उद्देशाने हल्ला, गुन्हादाखल
मिळालेल्यामाहितीनुसार, आशीष रंजन गुप्ता हे पश्चिम रेल्वेत CCTC म्हणून कार्यरत आहे. गेल्या दोन वर्षांपासून जोगेश्वरी स्थानकात ते ड्युटी करतात. तर आरोपीचे नाव अजय शिवकुमार धिवर, (वय 31 वर्षे) आहे. याप्रकरणी रेल्वे पोलीस आणि RPF कर्मचाऱ्यांच्या मदतीने आरोपीला ताब्यात घेण्यातआलेआहे. तर जखमी रेल्वे कर्मचाऱ्यावर सध्या ट्रॉमा रुग्णालयात उपचार सुरुआहे. अंधेरी रेल्वे पोलिसांकडून आरोपीविरोधात BNS कलम 121(1) अंतर्गत गुन्हादाखलकरण्यातआलाअसून सरकारी कर्मचारी कर्तव्य बजावत असताना अडथळा आणण्याच्या उद्देशाने हल्ला केल्याचा कर्मचाऱ्याचा आरोप आहे. काल (10 सप्टेंबर) रात्री FIR दाखल करण्यातअसलाअसून पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
