Jalna Crime : लेकीच्या प्रेमसंबंधाची कुणकुणी लागताच जन्मदात्या बापाचा राग अनावर, निर्घृणपणे संपवत रचला मोठा डाव, पण..., जालना हादरलं!
Jalna Crime News : जालना शहरातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये लेकीच्या प्रेमप्रकरणाची कुणकुणी लागताच जन्मदात्या बापाने आपल्याच मुलीची निर्घृणपणे हत्या केली आहे.

Jalna Crime News : जालना शहरातून एक अतिशय खळबळजनक बातमी समोर आली आहे. ज्यामध्ये लेकीच्या प्रेमप्रकरणाची कुणकुणी लागताच जन्मदात्या बापाने आपल्याच मुलीची निर्घृणपणे हत्या केली आहे. दरम्यान हे कृत्य केल्यानंतर या हत्येबाबत कुणाला कळू नये म्हणून हा खून लपवण्याच्या नादात मुलीने फाशी घेतल्याचा बनाव रचला. त्यासाठी चक्क मुलीला दोरीच्या साहाय्याने अँगलला दोरी बांधून लटकवले. त्यानंतर कोणी तरी अज्ञात व्यक्तीने पोलिसाला एक मुलीने फाशी घेतल्याचा फोन करून माहिती दिली. मात्र पोलिसांनी तपासाअंती या घटनेचा छडा लावून सत्य समोर आणलं आहे.
निर्घृणपणे संपवत रचला मोठा डाव, पण...
मिळालेल्या माहितीनुसार, आपल्या मुलीचे एका मुलासोबत प्रेमप्रकरण चालू आहे. याची कुणकुण मुलीच्या बापाला लागली होती. त्यामुळे आपली गावात आणि समाजात बदनामी होईल, या भीतीपोटी बापाने या प्रकरणाला विरोध दर्शवत हत्येचा कट रचला. जालना येथील दावलवाडी येथे 5 सप्टेंबर रोजी हि धक्कादायक घटना घडलीय. दरम्यान, पोलीस तपासातील शवविच्छेदन अहवालातही हि हत्या गळा दाबल्याने मृत्यू झाल्याचे स्पष्ट झाले आहे. आरोपी वडील हरी जोगदंड यांना पोलिसांनी तात्काळ अटक केली असून बदनापूर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस या घटनेचा पुढील तपास करत असून या घटनेने जिल्ह्यात एकच खळबळ उडालीय.
बीड जिल्हा कारागृह पुन्हा वादाच्या भोवऱ्यात, विनापरवाना झाडांची दिवसाढवळ्या कत्तल
उपमुख्यमंत्री तथा बीडचे पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून महिनाभरापूर्वीच जिल्ह्यात 30 लाख वृक्षांची लागवड करण्यात आली होती. त्यानंतर वृक्ष संवर्धन चळवळ जिल्हा प्रशासनाकडून राबवली जात आहे. मात्र प्रशासनाच्या जिल्हा कारागृहाकडूनच मोठ मोठ्या झाडांची कत्तल करण्यात आलीय. सामाजिक कार्यकर्त्यांनी दिवसाढवळ्या होत असलेली वृक्षतोड समोर आणली. यावर आक्षेप घेत सामाजिक कार्यकर्त्यांनी पोलीस ठाणे गाठले आणि पोलिसांनी यावर कारवाई करत वृक्षांची तोड करून वाहतूक करणारे वाहन जप्त केले आहे. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या वृक्ष लागवडीची जागतिक पातळीवर नोंद घेण्यात आली होती. त्यामुळे आता तेच जिल्हाधिकारी या प्रकारावर काही कारवाई करतात का हे पाहणं महत्त्वाचं असेल.
ही बातमी वाचा:






















