Jalna Crime News: जालन्यातील मर्चंट बँक आणि पूर्णवादी बँकेतील घोटाळा प्रकरण ताजे असतानाच, आता जिल्ह्यातील बदनापूर शहरातील कॅनरा बँकेत तब्बल 7 कोटी 31 लाख रुपयांचा अपहार झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. बँकेच्या स्ट्राँग रूममधील सोन्याच्या दागिन्यांची चोरी करून त्याजागी बनावट सोने ठेवल्याचे समोर आल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

Continues below advertisement

Jalna Crime News: बँक अधिकारीच ठरले सूत्रधार

मिळालेल्या माहितीनुसार, कॅनरा बँकेच्या शाखेत सोन्याच्या दागिन्यांचे पुनर्मूल्यांकन (Re-valuation) प्रक्रिया सुरू असताना हा मोठा गैरप्रकार उघड झाला. आरोपींनी संगनमत करून लॉकरमधील अस्सल सोन्याच्या दागिन्यांची चोरी केली आणि त्याऐवजी बनावट सोने तारण म्हणून ठेवले. या प्रक्रियेत बँकेची 7 कोटी 31 लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे, या चोरीचे पुरावे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले असून, त्यामध्ये एक बँक अधिकारी स्वतः तिजोरीतील दागिने काढताना स्पष्टपणे दिसत आहे.

Jalna Crime News: पोलिसांची कारवाई: मॅनेजर आणि सुवर्णकार अटकेत

याप्रकरणी बदनापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तातडीने सूत्रे हलवत बँक मॅनेजर विजेंद्र पाटणकर आणि बँकेचा अधिकृत सुवर्णकार प्रवीण बुऱ्हाडे या दोघांना अटक केली आहे. मात्र, सीसीटीव्हीत दागिने चोरी करताना दिसलेला दुसरा बँक अधिकारी संजय डोंगरे हा सध्या फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Continues below advertisement

Jalna Crime News: आठवड्याभरातील तिसरा मोठा घोटाळा

जालना जिल्ह्यात गेल्या आठवड्याभरात तीन वेगवेगळ्या बँकांमध्ये अशा प्रकारचे अपहार समोर आले आहेत. यामुळे गुंतवणूकदार आणि ग्राहकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरू असून यात अजून मोठ्या माशांचे धाबे दणाणले आहेत. या गुन्ह्यात आणखी कोणाचे हात गुंतले आहेत का, याचा तपास पोलीस करत आहेत.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

Manohar Mama Bhosale : मित्रासोबत हॉटेलमध्ये जेवताना चर्चा ऐकली; नंतर जवळ येऊन मनोहर मामाच्या अघोरी विद्येबद्दल सांगितलं, नंबरही दिला अन्....; फिर्यादीने तक्रारीत काय काय सांगितलं?

Manohar Mama Bhosale News: केबिन, 11 हजारांची पावती आणि अमावस्येला 150 आलिशान गाड्या; मनोहर भोसलेच्या आश्रमात काय काय?