जालना : दुचाकीवरून आलेल्या अज्ञात तीन आरोपींकडून शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकर (Arjun Khotkar) यांचा कट्टर समर्थक गजानन तौरवर गोळीबार (Firing) करून भरदिवसा हत्या करण्यात आली होती. या घटनेने जालना (Jalna) जिल्ह्यात खळबळ उडाली असून, पोलिसांनी दोन संशयित आरोपींना ताब्यात देखील घेतले आहेत. मात्र, पोलिसांच्या तपासात अनेक खुलासे होत असल्याने गजानन तौर हत्याकांडाला आता नवीन वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे. कारण, यातील फरार असलेला मुख्य आरोपी टायगर हा हिस्ट्रीशीटर असून, नांदेड (Nanded) पोलीस त्याचा अनेक दिवसांपासून शोध घेत आहे. सोबतच, या प्रकरणातील पाचपैकी 2 आरोपींचा जालना-नांदेड असा प्रवास असल्याने गजानन तौर याची सुपारी देऊन हत्या करण्यात तर आली नाही ना? या दिशीने पोलीस तपास करत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
जालन्याचा किंग म्हणून सोशल मीडियावर चर्चेत असेलला आणि माजी मंत्री अर्जुन खोतकर यांचा कट्टर समर्थक असलेल्या गजानन तौरची भरदिवसा गोळ्या झाडून हत्या करण्यात आली आहे. जालना जिल्ह्यात या घटनेने मोठी खळबळ उडाली आहे. सुरवातीला जुन्या वादातून आणि पैश्यांच्या देवाणघेवाण मधून ही हत्या करण्यात आल्याचे बोलले जात होती. मात्र, हत्या झाल्यावर पोलिसांनी काही तासातच दोन संशयित आरोपींना ताब्यात घेतले होते. त्यांची पोलिसांकडून कसून चौकशी केली जात असतानाच या हत्याकांडाचा म्होरक्या हिस्ट्रीशीटर टायगर असल्याचे समोर आले.
टायगरवर यापूर्वी देखील गुन्हे दाखल
विशेष म्हणजे टायगरवर नांदेड, जालना, बिदर या तीन ठिकाणी पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. ज्यात, सेवली पोलीस ठाण्यात शेतीच्या वादातून वृद्धाच्या खुनाचा, जालना जिल्ह्यातील घनसावंगी येथेही गोळीबार केल्याचा गुन्हा टायगरवर दाखल आहे. तसेच, नांदेड पोलीस त्याच शोध घेत असून, त्याला शोधून देण्यासाठी 50 हजाराचे बक्षीस ठेवण्याच्या हालचाली नांदेड पोलिसांकडून सुरु आहे. त्यामुळे टायगर सापडल्यावरच गजानन तौर हत्याकांडाचे खरे कारण समोर येणार आहे.
सर्वच आरोपी वेगवेगळ्या ठिकाणचे
जालना शहरात गजानन तौर याची भरदिवसा हत्या करण्यात आल्याने एकच खळबळ उडाली आहे. त्यामुळे ही हत्या कोणत्या करणातून झाली याची वेगवेगळी चर्चा जिल्ह्यात सुरु आहे. पोलिसांनी दोघांना त्याब्यात देखील घेतले आहे. विशेष म्हणजे, यातील सर्वच आरोपी वेगवेगळ्या ठिकाणचे असल्याने सुपारी देऊन गजाननची हत्या तर करण्यात आली नाही ना? या दृष्टीने देखील पोलीस तपास करत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या:
मोठी बातमी! जालन्यात गोळीबार, एकाचा जागीच मृत्यू; घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल