Jalgaon Crime:जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील भुसावळ (Bhusawal) येथे पैशांच्या वादातून 21 वर्षीय तरुणाला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. भूषण वावळे असे मृत तरुणाचे नाव आहे. तरुणाची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह महामार्गालगतच्या फुटपाथवर टाकून आरोपी पसार झाल्याची माहिती आहे. सुरुवातीला या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली होती. मात्र, तपासादरम्यान भूषणचा मृत्यू नैसर्गिक किंवा अपघाती नसून त्याची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. या प्रकरणी पोलिसांनी संजय दत्तू आवटे आणि प्रमोद लाहोरिया या दोन संशयितांना अटक केली असून, तिसरा संशयित फरार आहे.

Continues below advertisement

Jalgaon Crime: महामार्गालगत फुटपाथवर आढळला तरुणाचा मृतदेह

भुसावळमध्ये महामार्गालगत असलेल्या फुटपाथवर भूषण वावळे या 21 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. सुरुवातीला या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, मृत्यूच्या परिस्थितीबाबत संशय निर्माण झाल्याने पोलिसांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान समोर आलेल्या बाबींच्या आधारे भूषणचा मृत्यू हा अकस्मात नसून त्याची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे या प्रकरणाला वेगळे वळण मिळाले.

Jalgaon Crime: पैशांच्या वादातून भूषणचा काटा काढल्याचा संशय

मिळालेल्या माहितीनुसार, पैशांच्या वादातून भूषण वावळे याची हत्या करण्यात आल्याचा संशय आहे. आर्थिक व्यवहारावरून निर्माण झालेला वाद टोकाला गेल्यानंतर हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पैशांचा नेमका व्यवहार काय होता आणि वादाचे स्वरूप काय होते, याबाबत अधिक तपशील समोर येणे बाकी आहे.

Continues below advertisement

Jalgaon Crime: दोन आरोपी अटकेत

घटनेचा तपास करताना पोलिसांनी संशयितांचा माग काढला. या प्रकरणी संजय दत्तू आवटे आणि प्रमोद लाहोरिया या दोघांना अटक करण्यात आली आहे. तर या गुन्ह्यात सहभागी असल्याचा संशय असलेला तिसरा आरोपी अद्याप फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Jalgaon Crime: भुसावळमधील घटनेने खळबळ

पैशांच्या वादातून एका तरुणाचा जीव गेल्याच्या या घटनेमुळे भुसावळ परिसरात खळबळ उडाली आहे. सुरुवातीला अकस्मात मृत्यू म्हणून नोंद झालेल्या प्रकरणात तपासाअंती हत्येचा उलगडा झाल्याने पोलिसांच्या तपासाकडे लक्ष लागले आहे. या प्रकरणातील तिसऱ्या संशयिताचा शोध सुरू असून, पुढील तपासातून घटनेमागील नेमके कारण आणि इतर तपशील स्पष्ट होणार आहेत.

राज्य आणि देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या; पाहा व्हिडीओ

आणखी वाचा

Bhiwandi FDA Action: गुलाबजाम खरेदी करताय? जरा सावधान! भिवंडीत मिठाईच्या ट्रेमध्ये आढळला चक्क जिवंत उंदीर; FDA ची मोठी कारवाई