एक्स्प्लोर

Jalgaon Crime News: नेत्यांच्या घोषणा हवेतच विरल्या, चिमुकलीच्या कुटुंबीयांना न्याय मिळेना; जळगावात 3 वर्षांपासून कोर्टाच्या फेऱ्या, फास्टट्रॅक कुठंय?

Jalgaon Crime News: नसरापूर येथील घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळलेली असतानाच, जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील एका गावातील धक्कादायक वास्तव समोर आले आहे.

Jalgaon Crime News: नसरापूर येथील घटनेनंतर संपूर्ण राज्यात संतापाची लाट उसळलेली असतानाच, जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील भडगाव (Bhadgaon) तालुक्यातील एका गावातील धक्कादायक वास्तव समोर आले आहे. 2023 मध्ये घडलेल्या एका 7 वर्षीय चिमुकलीवरील अत्याचार आणि हत्या प्रकरणात, शासनाने दिलेली 'फास्टट्रॅक' न्यायाची आश्वासने हवेतच विरल्याचे दिसून येत आहे. तीन वर्षे उलटूनही पीडित कुटुंबाला अद्याप न्याय मिळालेला नाही, उलट पदरी उपेक्षा आणि कोर्टाच्या फेऱ्याच आल्या आहेत.

Jalgaon Crime News: नेमकं प्रकरण काय होतं?

2023 मध्ये भडगाव तालुक्यातील एका गावात सात वर्षांची चिमुकली दोन दिवस बेपत्ता होती. शोध घेतल्यानंतर तिचा मृतदेह गावातीलच एका गोठ्यातील कडब्याखाली सापडला होता. आरोपी स्वप्नील पाटील याने आमिष दाखवून बालिकेला गोठ्यात नेले, तिच्यावर लैंगिक अत्याचार केला आणि पुरावा नष्ट करण्यासाठी चेहऱ्यावर दगडाने वार करून तिला संपवले होते. या क्रूर कृत्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता.

Jalgaon Crime News: मंत्र्यांची आश्वासने आणि सद्यस्थिती

घटनेनंतर या मुद्द्याचे पडसाद विधानसभेतही उमटले होते. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या प्रकरणाचा खटला फास्टट्रॅक कोर्टात चालवून आरोपीला कठोर शिक्षा देण्याची ग्वाही दिली होती. मात्र, प्रत्यक्षात चित्र वेगळेच आहे. घरची आर्थिक परिस्थिती अत्यंत बेताची असतानाही पीडित मुलीचे आई-वडील आणि आजी केवळ न्यायाच्या आशेने कोर्टाच्या चकरा मारत आहेत. "आमच्या नातीला न्याय मिळेपर्यंत समाजात अशा घटना थांबणार नाहीत," अशी आर्त हाक पीडितेच्या आजीने दिली आहे.

Jalgaon Crime News: फास्टट्रॅक व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह 

या प्रकरणातील काही प्रमुख साक्षीदार ही लहान मुले आहेत. सुनावणीला होत असलेल्या विलंबामुळे आता ही मुले आणि कुटुंबीय धास्तावलेले आहेत. "आम्हाला खरंच न्याय मिळेल का?" असा सवाल ते उपस्थित करत आहेत. आमदार रोहित पवार यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली असता, कायद्यातील पळवाटांमुळे कठोर कायद्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. या निमित्ताने फास्टट्रॅक कोर्टाच्या कार्यपद्धतीवर गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. तीन वर्षांनंतरही निकाल न लागणे हीच का जलद न्यायव्यवस्था? साक्षीदार संरक्षण आणि वेळेत सुनावणी या यंत्रणा प्रभावीपणे राबवल्या जातात का? केवळ आश्वासनांच्या पलिकडे जाऊन पीडितांना प्रत्यक्ष न्याय कधी मिळणार, हा प्रश्न अनुत्तरितच आहे.

आणखी वाचा 

Sanjay Raut Nashik: महिलांच्या अंगावरचे व्रण पाहून संजय राऊत संतापले, IAS अधिकाऱ्याला झापलं, अखेर बावनकुळेंनी फोन केला

Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Nashik Crime: 'माहेरच्यांकडून नवीकोरी कार अन् तीन लाख रुपये आण'; सासरच्या छळाला कंटाळून येवल्यात विवाहितेने आयुष्य संपवलं
'माहेरच्यांकडून नवीकोरी कार अन् तीन लाख रुपये आण'; सासरच्या छळाला कंटाळून येवल्यात विवाहितेने आयुष्य संपवलं
धक्कादायक! पुण्यातील सहकार नगर हादरलं! दोन तरुणांनी केला गोळीबार, एक जण गंभीर जखमी
धक्कादायक! पुण्यातील सहकार नगर हादरलं! दोन तरुणांनी केला गोळीबार, एक जण गंभीर जखमी
Thane Assault Case : ठाण्यातील वृद्ध मारहाण प्रकरण, 14 तासांनंतर परप्रांतीय मुजोर कॅब चालकावर गुन्हा दाखल
ठाण्यातील वृद्ध मारहाण प्रकरण, 14 तासांनंतर परप्रांतीय मुजोर कॅब चालकावर गुन्हा दाखल
Thane : परप्रांतियाकडून वृद्धाला मारहाण, मनसे आक्रमक; अविनाश जाधवांनी ठाण्यातील मुजोर ओला-उबेर चालकांना चांगलंच चोपलं
परप्रांतियाकडून वृद्धाला मारहाण, मनसे आक्रमक; अविनाश जाधवांनी ठाण्यातील मुजोर ओला-उबेर चालकांना चांगलंच चोपलं
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Cab driver attacks senior citizen in Thane : वृद्धाला मारहाण साफ करा ही 'घाण' | Special Report
Vidhan Parishad Drama : विधान परिषदेच्या निवडणुकीचा गोंधळ सुरुच | Special Report
Is Mamata Banerjee merging TMC with Congress : ‘तृणमूल’ होणार‘काँग्रेस’? | Special Report
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Sonia Gandhi TMC Mamata Banerjee Merger Offer : काँग्रेसमध्ये तृणमूल विलीन करण्याचा प्रस्ताव
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Monsoon Rain Weather Updates: मान्सून कोकणात आला, पण मुंबईत येईना, नेमका कुठे अडकला? हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट
मान्सून कोकणात आला, पण मुंबईत येईना, नेमका कुठे अडकला? हवामान खात्याची महत्त्वाची अपडेट
Nashik Crime: 'माहेरच्यांकडून नवीकोरी कार अन् तीन लाख रुपये आण'; सासरच्या छळाला कंटाळून येवल्यात विवाहितेने आयुष्य संपवलं
'माहेरच्यांकडून नवीकोरी कार अन् तीन लाख रुपये आण'; सासरच्या छळाला कंटाळून येवल्यात विवाहितेने आयुष्य संपवलं
Kalyan Dombivli Water Cut: केडीएमसीचा मोठा निर्णय! कल्याण-डोंबिवलीत टप्प्याटप्प्याने 24 तास पाणीपुरवठा बंद, नेमकं कारण काय?
केडीएमसीचा मोठा निर्णय! कल्याण-डोंबिवलीत टप्प्याटप्प्याने 24 तास पाणीपुरवठा बंद, नेमकं कारण काय?
Bollywood Actress Sonika Gill Struggle Life: बॉलिवूड अभिनेत्रीचं वादळी आयुष्य, सहा लग्न मोडल्यानंतर सातव्यांदा थाटला संसार, पण नशीबी आली सवत, आयुष्यभर केला तडजोडीचा संसार
बॉलिवूड अभिनेत्रीचं वादळी आयुष्य, सहा लग्न मोडल्यानंतर सातव्यांदा थाटला संसार, पण नशीबी आली सवत, आयुष्यभर केला तडजोडीचा संसार
Sangli News : सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
सांगली महापालिकेत मोठी कारवाई! 37 कामचुकार कर्मचारी तडकाफडकी निलंबित, आयुक्तांचा दणका
Maharashtra LIVE News Updates: महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra LIVE News Updates: महत्त्वाच्या राजकीय घडामोडींचा आढावा फक्त एका क्लिकवर...
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
पाकव्याप्त काश्मीरमध्ये मोठी दुर्घटना, पाकिस्तानच्या लष्कराचं हेलिकॉप्टर कोसळलं, वैमानिकासह 20 सैनिकांचा मृत्यू
RBI Bank Director: रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, सहकार क्षेत्रातील दिग्गजांच्या मक्तेदारीला बसणार धक्का, काय आहे कुलिंग पिरीयडची अट?
रिझर्व्ह बँकेचा मोठा निर्णय, सहकार क्षेत्रातील दिग्गजांच्या मक्तेदारीला बसणार धक्का, काय आहे कुलिंग पिरीयडची अट?
Embed widget