Jalgaon Crime News : जळगाव महापालिका निवडणुकीच्या (Jalgaon Municipal Corporation Election 2026) पार्श्वभूमीवर ममुराबाद नाका येथे स्थिर सर्व्हेक्षण पथकाने मोठीकारवाईकेलीआहे. यात एका कारची तपासणी केली असता तब्बल 29 लाख रुपये रोकड, 3 किलो चांदी व 8 तोळे सोने आढळूनआलेआहे. कारमधील तिघांनी हा मुद्देमाल बऱ्हाणपूरहून जळगाव (Jalgaon) येथील सराफा दुकानांसाठी नेल्याचे सांगितले, परंतु त्यांच्याकडे पावत्या नव्हत्या. परिणामी पोलिसांनी पंचनाम्यानंतर हा मुद्देमाल भरारी पथकाच्या ताब्यात घेतला असून, पावत्या सादर केल्यानंतर पुढील निर्णय घेतला जाणार आहे. मात्रऐननिवडणुकीच्याकाळातसंशयास्पदरोकडआणिसोनेचांदीसापडूनआल्यानेपरिसरातखळबळउडालीआहे. शिवायआतापोलीसतपासाअंतीसत्यकळू शकणार आहे. मात्र, निवडणुकीच्या धामधुमीत जळगावपोलिसांचीहीमोठीकारवाईअसूनपावत्यानसल्यानेसंशयबळावलाआहे.
Jalgaon Election 2026: जळगावमध्ये महिलांना पैसे वाटल्याचा व्हिडीओ व्हायरल
राज्यात महापालिका निवडणुकांच्या प्रचाराचीसांगताझालीआहे. आताप्रतीक्षाअसणारआहेतीमतदानआणित्यांनतरच्यानिकालाची. मात्रअसेअसतानाराज्यात काही ठिकाणी मतदारांना पैसे वाटप करण्यात येत असल्याच्याघटनाघडतानादिसतआहे. जळगावमध्येही मतदारांना पैसे वाटप करण्यात येत असल्याचा आरोप करण्यात येत आहे. आपल्या उमेदवाराला मतदारांनी मतदान करावं, यासाठी जळगावमधील प्रभाग क्रमांक 11 मधील शिवसेना शिंदे गटाचे संतोष पाटील आणि ललित कोल्हे यांच्या वतीने मतदार महिलांना पैसे वाटप केला जात असल्याचा व्हिडिओ व्हायरल करत कैलास हटकर या अपक्ष उमेदवाराने राजकीय क्षेत्रात खळबळ उडवून दिली आहे. अशातच आता पुन्हा त्यांनी महिलांना डांबून ठेवल्याचा आरोप करत तसा व्हिडीओ देखील सोशल मिडियामध्ये व्हायरल केल्याने खळबळ उडाली आहे.
Jalgaon News :महिलाना डांबून ठेवल्याचा आरोप व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
दरम्यान, जळगाव शहरातील प्रभाग क्रमांक 11 मधील शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संतोष मोतीराम पाटील आणि कारागृहात असलेल्या ललित कोल्हे यांच्यासाठी हे पैसे वाटले जात असल्याच्या आरोप केले होते. यानंतर महिलाना डांबून ठेवल्याचा आरोप देखील विरोधी उमेदवार कैलास हटकर यांनी केला आहे. तशा स्वरूपातील व्हिडिओ त्यांनी सोशल मीडियावर वायरल केल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
आणखी वाचा
