Jalgaon Accident News : जळगाव जिल्ह्याच्या चोपडा-विरवाडा (Chopda-Virwada road) रस्त्यावर एकभीषणअपघाताची (Jalgaon Accident)घटनाघडलीय. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने अर्टिका कार दुभाजकावर आदळलीय. याभीषणअपघातात अर्टिका गाडीचाअक्षरशःचेंदामेंदाझालाअसून दोन जणठारतर तीन जण जखमी असल्याचीमाहितीआहे. घटनेचीमाहितीमिळताच घटनास्थळी नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि जखमींना रुग्णालयात हलवले. अपघात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे कार दुभाजकवर आदळून हा अपघात झाल्याची सूत्रांची माहिती आहे.

Jalgaon Accident News : अपघात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे अपघात

मिळालेल्यामाहितीनुसार, चोपडा तालुक्यातील विरवाडा येथून चोपड्याच्या दिशेने येत असताना आज (16 फेब्रुवारी) सकाळी 5.30 वाजेच्या सुमारास अर्टिका (MH 19 BS 1008) या गाडीचा भीषण अपघात झाला. या अपघातात राहुल अमृत भोई आणि मयूर अरुण राजपूत या दोन व्यक्ती जागीच ठार झाले आहेत. तर तीन जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये बंटी रविंद्र कोळी

Accident News : दोघांचा जागीच अंत, तर 3 जण गंभीर

आणि राकेश भगवान राजपूत (गिरासे) या दोन जणांना मोरेश्वर हॉस्पिटल येथे उपचार सुरु आहेत. तर विजय अमृत भोई यांना गंभीर जखमी असल्यामुळे त्यांना जळगावयेथ हलवण्यात आलेले आहे. अपघातानंतरस्थानिक नागरिकांनी तातडीने मदतकार्य सुरू केले आणि जखमींना रुग्णालयात हलवले. अपघात चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्यामुळे कार दुभाजक वर आदळून हा अपघात झाल्याची सूत्रांची माहिती आहे. सध्यापोलीसयाप्रकरणाचीपुढीलकारवाईकरतआहेत.

Jalgaon News :पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये तुफान हाणामारी, गुन्हा दाखल

जळगावच्या चोपडा ग्रामीण पोलिस ठाण्याच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांमध्ये हाणामारी झाल्याची घटना घडली आहे. या तुफान हाणामारीत दोघे पोलिस कर्मचारी जखमी झाल्याची माहिती आहे. शशिकांत पारधी आणि राकेश पाटील असे जखमी असलेल्या दोन्ही पोलिस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

दरम्यान, या हाणामारीत राकेश पाटील यांच्या डाव्या हाताला तसेच डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर धुळे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर शशिकांत पारधी यांच्या डोक्याला जबर मार लागला असून त्यांच्यावर देखील चोपडा येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेपूर्वी दोघांमध्ये हातेड–अन्वर्दे शिवार परिसरात दोघांची भेट झाली आणि वादाचे रूपांतर तुफान हाणामारीत झाले. ड्युटी वाटप, हजेरी आणि अंतर्गत कामकाजाच्या कारणावरून दोघांमध्ये काही दिवसांपासून पासूनचे पूर्ववैमनस्य असल्याने त्यांतून काल रात्री हाणामारी झाल्याची माहिती आहे. अशातच आता दोघा पोलिस कर्मचाऱ्या विरोधात सार्वजनिक ठिकाणी हाणामारी केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी वाचा