एक्स्प्लोर

Latur News : 'मी आता जगणार नाही, माझी वाट पाहू नका'; कुटुंबियांना शेवटचा कॉल अन् सुखी संसाराची राख रांगोळी, लातूरच्या तरुणाने लंडनमध्ये संपवलं आयुष्य

Latur: घरापासून शेकडो मैल लांब असलेल्या या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या कुटुंबीयांसोबत केलेल्या फोनवरील संवाद ऐकून कुटुंबाच्याही काळजाचा ठोका चुकलाय. तर गावात देखील हळहळ व्यक्त केली जात आहे

Latur News : उच्च शिक्षणाच्या जोरावर परदेशात उत्तम नोकरी, महिन्याला लाखो रुपयांचा पगार. डोळ्यात सुखी आणि संपन्न आयुष्य जगण्याची स्वप्न. सुखी संसाराचा हा गाडा हाकताना आणि सगळेच सुरळीत असताना एका तरुणाने लंडनमध्ये (London) टोकाचं पाऊल उचल आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना समोर आली आहे. दरम्यान घरापासून शेकडो मैल लांब असलेल्या या तरुणाने आत्महत्या करण्यापूर्वी आपल्या कुटुंबीयांसोबत केलेल्या फोनवरील संवाद ऐकून कुटुंबाच्याही काळजाचा ठोका चुकला. तर गावात देखील या घटनेमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

साहजिकच आता प्रश्न पडाल असेल कि हि हृदयद्रावक घटना घडण्यामागचं नेमकं कारण काय? तर घटनेतील मृत हनमंत पाटील  (Hanumant Patil) हे मूळचे लातूर जिल्ह्यातील अहमदपूर तालुक्यातील बोडका येथील रहिवासी होते. उच्च शिक्षण घेतल्यानंतर ते लंडन येथे आयटी इंजिनिअर म्हणून कार्यरत होते. त्यांना महिन्याला तब्बल 8 लाख रुपये इतका मोठा पगारही मिळत होता. प्राथमिक माहितीनुसार, त्यांचा विवाह साधारण आठ वर्षांपूर्वी झाला होता. मात्र त्यांना अपत्य नव्हते. अशातच गेल्या वर्षभरापासून पती-पत्नीमध्ये टके उडत होते. तर कधी वैयक्तिक मतभेद आणि शाब्दिक चकमक होत होती. मात्र यामुळे त्यांची पत्नी त्यांच्यापासून विभक्त होऊन वेगळी राहत होती.

 Hanumant Patil Death :  कुटुंबावर तब्बल 2 कोटी रुपयांचा दावा 

दरम्यान, काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नीने हनमंत पाटील आणि त्यांच्या कुटुंबावर तब्बल 2 कोटी रुपयांचा दावा दाखल केला होता. या कायदेशीर दावा आणि सततच्या कौटुंबिक वादामुळे हनमंत हे प्रचंड मानसिक तणावाखाली होते. परिणामी त्यांनी याच नैराश्यातून टोकाचा निर्णय घेतला आणि लंडन येथील त्यांच्या राहत्या घरी गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली.

 Hanumant Patil: "मी आता जगणार नाही. माझी वाट पाहू नका" आत्महत्येपूर्वीचा शेवटचा फोन

मिळालेल्या माहितीनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी हनमंत पाटील यांनी अंतःकरणाने आणि अत्यंत भावनावश होऊन आपल्या नातेवाइकांशी फोनवरून अखेरचा संवाद साधला. फोनवर बोलताना त्यांचे शब्द ऐकून कुटुंबियांच्या पायाखालची जमीन सरकली. मात्र हजार मैलावर आपल्या लेकाला वाचवण्यासाठी समजावण्यासाठी कुठलाही पर्याय त्यांच्याकडे उरला नाही. यावेळी हनमंत पाटील म्हणाले, "मी आता जगणार नाही. माझी वाट पाहू नका. मी आत्महत्या करतोय, सर्वांची काळजी घ्या," असा शेवटचा निरोप त्यांनी दिला.

इतर महत्वाच्या बातम्या 

विशाल देवकर 
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

रेणापूरमध्ये चोरीप्रकरणी अल्पवयीन मुलांना खांबाला बांधून अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल, दोघांवर गुन्हा दाखल
रेणापूरमध्ये चोरीप्रकरणी अल्पवयीन मुलांना खांबाला बांधून अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल, दोघांवर गुन्हा दाखल
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Sanjay Raut PC : फडणवीस केंद्रात, मुख्यमंत्री बावनकुळे होतील, राऊत हसले अन् थेट बोलले
Nashik Operation Tiger Special Report : ठाकरेंच्या नगरसेवकांना ऑफर? नाशिकमध्ये एकीची वज्रमूठ
Devendra Fadnavis on Karjmafi : 50 हजार रुपयांऐवजी 2 लाखांपर्यंत कर्जमाफी मिळणार
SIR Form Maharashtra : SIR चा फॉर्म कसा भरायचा? संपूर्ण माहिती
ABP Majha Headlines Today 7 AM : 10 July 2026: एबीपी माझा हेडलाईन्स : Marathi News Maharashtra
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
'आम्ही तुम्हाला सर्वांसमोर उघडे पाडू...' न्यायालयाची महाराष्ट्र सरकारला 'सर्वोच्च' फटकार! न्यायालयाने इतका संताप का व्यक्त केला?
Team India Coach: टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
टीम इंडियाच्या कोचिंग स्टाफमध्ये मोठा फेरबदल होणार; गंभीर गुरुजींचे दोन सहकारी सोडून जाण्याची शक्यता!
Crime News: रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
रात्रीपासून शोधत होते, मध्यरात्री बांधकाम सुरू असलेल्या मॉलमध्ये सापडला चिमुरडीचा मृतदेह! संपवण्याआधी नको ते केलं अन्...
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
चार मिनिटांचा थरारक Video: थारला ATM बांधून सेंटरमधून उखडलं, खेचून नेताना दोरी तुटली, तिघांना जागेवरून हलेना, नोटा सुद्धा निघता निघेनात, शेवटी तिथंच टाकून फरार!
Nashik Crime News: गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
गुटखा तस्करीचा 'हायटेक' फंडा, रिमोट दाबताच वाहनाच्या नंबर प्लेटवर यायचा काळा पडदा; 'असा' झाला भांडाफोड
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
तब्बल 12 तास हायवे बंद, तुफान दगडफेक! भाजपने माजी गृहमंत्र्यांना पोटनिवडणुकीत तिकिट नाकारताच हिंसेचा आगडोंब, कार्यकर्त्यांचा हैदोस; एसपीसह 8 पोलिस जखमी, कलम 163 लागू करण्याची वेळ
Pune Moshi Building Collapse: अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
अवघ्या दीड वर्षांचा संसार मोडून पडला; आई-वडिलांचा आधार हरपला, मोशी कचरा डेपो दुर्घटनेत बळी गेलेल्या भावेशच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर
Jalna Crime News: बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
बस अडवून तरुणीला जबरदस्ती उतरवण्याचा प्रयत्न; जाब विचारताच चालकाला तरुणाकडून बेदम मारहाण, जालन्यातील संतापजनक घटना
Embed widget