Shivraj Motegaonkar NEET Exam 2026 Paper Leak: नीट पेपरफुटीचा (NEET Exam Paper Leak) कट शिवराज मोटेगावकरने (Shivraj Motegaonkar) त्याच्या साथीदारांना हाताशी धरुन अतिशय सुनियोजितपणे आखल्याचं सीबीआयच्या तपासात समोर येत आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी शिवराज मोटेगावकरच्या तपासात विविध धक्कादायक माहिती समोर येत आहे. शिवराज मोटेगावकर RCC कोचिंग क्लासचा संचालक एनटीएशी निगडीत प्राध्यापकांशी मोटेगावकरचे संबंध होते. पी.व्ही.कुलकर्णीसोबत मोटेगावकरचे घनिष्ठ संबंध आहेत. मोटेगावकरने परीक्षेपूर्वीच प्रश्न मिळवून उत्तरांसह मुलांपर्यंत पोहोचवले. मोटेगावकरच्या मोबाईलमध्ये पेपरफुटीचे अनेक पुरावे मिळाले. त्यानंतर आता शिवराज मोटेगावकरच्या मुलाची देखील सीबीआय कार्यालयात चौकशी सुरू आहे. 

NEET Exam 2026 Paper Leak:  मोटेगावकरच्या मुलाची सीबीआय कार्यालयामध्ये चौकशी 

शिवराज मोटेगावकर याच्या मुलाची पुण्यातील सीबीआय कार्यालयामध्ये चौकशी सुरू आहे, शिवराज मोटेगावकरच्या मुलाने बारावीची परीक्षा दिली आहे आणि, त्यालाही फुटलेल्या नीट प्रश्नपत्रिकाचा फायदा झाल्याचा बोललं जात आहे. शिवराज मोटेगावकरच्या मुलासोबत शिवराज मोटेगावकरच्या आरसीसी क्लासमध्ये शिकणाऱ्या आणखी तीन विद्यार्थ्यांची त्यांच्या पालकांसह सीबीआय ऑफीसमध्ये चौकशी केली जात आहे. 

NEET Exam 2026 Paper Leak: स्वतःच्या मुलाला देखील पेपरच्या माध्यमातून फायदा

नीटचा पेपर फुटला, त्याचा शिवराज मोटेगावकर कसा बाजार मांडला याच्याबद्दल सीबीआयने जो रिमांड रिपोर्ट सादर केला त्यामध्ये सांगितलं होतं, हा पेपर विकताना पैसे कमावताना, शिवराज मोटेगावकरने त्याच्या स्वतःचा मुलगा जो आता नुकताच बारावी परीक्षा आणि नीटची परीक्षा दिली आहे, त्या स्वतःच्या मुलाला देखील या फुटलेल्या पेपरच्या माध्यमातून फायदा पोहोचवण्याचं काम केलं, किंवा या मुलाला आधीच प्रश्नपत्रिका उपलब्ध करून दिली, अशा प्रकारची सीबीआयची माहिती आहे. त्यामुळे सीबीआयने शिवराज मोटेगावकरच्या मुलाला सीबीआयच्या ऑफिसमध्ये चौकशीसाठी बोलवले आहे. 

शिवराज मोटेगावकरच्या मुलासोबत दोन ते तीन वकील देखील आहेत. कारण शिवराज मोटेगावकरचा मुलगा हा बारावीला म्हणजे अल्पवयीन आहे, त्यामुळे त्याच्यासोबत वकील देखील आहेत. शिवराज मोटेगावकरच्या मुलासोबत इतर काही शहरांमध्ये देखील पालक आणि विद्यार्थी आहेत, जे या शिवराज मोटेगावकरच्या आरसीसी क्लासमध्ये शिकत होते. त्याचबरोबर शिवराज मोटेगावकर कडून मुलांना फुटलेला पेपर मिळाला असल्याचा संशय आहे. शिवराज मोटेगावकरच्या बँक अकाउंटमध्ये काही ट्रांजेक्शन आढळून आलेले आहेत, जे या विद्यार्थ्यांच्या पालकांकडून झाले आहेत, त्या अनुषंगाने त्या विद्यार्थ्यांना देखील त्यांना देखील पुण्यात सीबीआय ऑफिसने चौकशीसाठी बोललेले आहे, शिवराज मोटेगावकरचा मुलगा आणि तीन विद्यार्थी आणि पालक यांची चौकशी सीबीआयच्या पुण्यातील कार्यालयात होते आहे.

NEET Scam:  मेडिकल कॉलेजचे स्वप्न, मुलावर मोठा डाव

शिवराज मोटेगावकर याने त्याच्या मुलासाठी पेपर लिक केल्याचा संशय CBI ला आहे, मोटेगावकरच्या मुलाने यावर्षीच 12 वी उत्तीर्ण केली आहे आणि NEET चा पेपरही दिला आहे, मात्र मोटेगावकर याचे एक अपुर्ण स्वप्न त्यांना मुलाच्या रुपाने पुर्ण करायचे होते का अशी चर्चा आता होत आहे. मोटेगावकर आणि त्यांची पत्नी ह्या दोघांपैकी एकही जण MBBS डॉक्टर नाहीत आणि तुम्हाला स्व:तचे मेडिकल कॉलेज टाकायचे असेल तर तुम्ही किंवा तुमच्या घरातील एखादा व्यक्ती त्या क्षेत्रात सक्रीय, अनुभवी असण गरजेचं आहे. त्यामुळे मुलगा जर MBBS डॉक्टर झाला तर आपण त्याच्या नावाने मोठं हॉस्पीटल टाकू ही मोटेगावकरांची योजना असल्याचं बोललं जात आहे.  क्लासेस  लाईनमधून मोटेगावकरांनी कोट्यावधींची संपत्ती जमवली, ते सध्या ED च्या सुध्दा रडारावर आहेत. पण एवढ असूनही मोटेगावकरांचे स्व:तचे मेडिकल कॉलेज नाही.