Crime News: मेघालयातील शिलाँग येथे राजा रघुवंशी यांच्या हनिमून दरम्यान झालेल्या संशयास्पद हत्येप्रकरणी, त्यांची पत्नी सोनम रघुवंशी आज (9 जून) उत्तर प्रदेशातील गाजीपूर जिल्ह्यातून सापडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सोनमने रविवार-सोमवारच्या मध्यरात्री मध्य प्रदेशातील इंदूर येथील तिच्या कुटुंबातील सदस्यांना फोन केला.  फोन येताच, इंदूर पोलिसांनी तातडीने कारवाई केली आणि त्यांनी यूपी पोलिसांशी संपर्क साधला. त्यानंतर गाजीपूर पोलिसांनी त्याला एका ढाब्यावरून शोधून काढले. इंदूरमधील एक जोडपं 11 मे 2025 रोजी लग्न केल्यानंतर हनिमूनसाठी शिलाँगला गेले होते. हे दोघं 20 मे रोजी मेघालयात पोहोचले आणि 23 मे रोजी त्यांनी शेवटचं आपल्या कुटुंबाशी बोलणं केलं. त्यानंतर दोघांचेही मोबाईल बंद आले.आता या प्रकरणात सोनम रघुवंशीचा एक सीसीटीव्ही व्हायरल होत आहे. (Sonam Raghuwanshi)

सोनम रघुवंशीचा CCTV व्हायरल

दरम्यान, सोनम रघुवंशीचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये सोनम तिचा पती राजासोबत स्कूटी बुक करण्यासाठी गेली आहे. जेव्हा राजा स्कूटीवर बसतो आणि त्याची पत्नी सोनमला त्याचे हेल्मेट धरायला बोलावतो तेव्हा सोनम मागे जाते आणि तिच्या मोबाईल फोनवर वेगाने काहीतरी टाइप करताना दिसते. व्हिडिओ पाहिल्यानंतर, ती कोणालातरी गुप्त संदेश पाठवत असल्याचा संशय वाढत आहे. सोशल मीडियावर, त्याचा संबंध हत्येशी जोडला जात आहे.

सोनम अचानक गाझीपूरमध्ये हजर राहिल्यानं गुढ वाढलं

या प्रकरणात आतापर्यंत प्रचंड गुढता दिसून आली आहे. सुमारे 17 दिवसांपूर्वी शिलाँगमध्ये राजा रघुवंशी यांच्या मृत्यूची बातमी आली आणि तेव्हापासून मध्य प्रदेश आणि मेघालय पोलिस या प्रकरणाचा तपास करत होते. आता इतक्या दिवसांनंतर, सोनम अचानक गाजीपूरमध्ये हजर राहिल्याने आणि तिने स्वतः कुटुंबाशी संपर्क साधल्याने तपास यंत्रणांसमोर अनेक नवीन प्रश्न निर्माण होत आहेत. सोनमच्या वडिलांनी संपूर्ण प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली आहे. शिलाँग ते गाजीपूर हे अंतर अंदाजे 1162 किमी आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे. या मार्गावर थेट रेल्वे नाही. जरी तुम्ही खाजगी वाहनाने किंवा हिचहायकिंगने सतत प्रवास केला तरी किमान 25 तास लागतात. अशा परिस्थितीत, सोनमने हे अंतर कापून इतके दिवस पोलिसांच्या नजरेतून सुटणे ही बाब आश्चर्याची ठरत आहे. पोलिस आता सोनमची चौकशी करून संपूर्ण घटनेचे दुवे जोडण्याचा प्रयत्न करत आहेत.

नक्की प्रकरण काय?

इंदूरमधील एक जोडपं 11 मे 2025 रोजी लग्न केल्यानंतर हनिमूनसाठी शिलाँगला गेले होते. हे दोघं 20 मे रोजी मेघालयात पोहोचले आणि 23 मे रोजी त्यांनी शेवटचं आपल्या कुटुंबाशी बोलणं केलं. त्यानंतर दोघांचेही मोबाईल बंद आले. काही दिवसांनी पोलिसांना त्यांची भाड्याने घेतलेली स्कूटी सोहरारीम परिसरात सोडून दिलेली आढळली. या घटनेनंतर 2 जून रोजी वेई सोडोंग धबधब्याजवळील एका नाल्यात राजा रघुवंशीचा कुजलेला मृतदेह सापडला. पोलिसांनी ही हत्या असल्याचा गुन्हा दाखल केला. राजाचा मृत्यू झाल्यानंतर त्याची पत्नी सोनमचा काहीच पत्ता लागेना. त्यामुळे तिचं अपहरण झालं की तस्करीचा भाग आहे, यावर कुटुंबीयांना संशय येऊ लागला. राजा रघुवंशी हे इंदूरमधील एक वाहतूक व्यावसायिक होते. त्यांचं सोनमशी 11 मे रोजी लग्न झालं होतं. राजाचा मृतदेह सापडल्यानंतर पोलिस सोनमचा शोध घेत होते. अखेर सोनम गाझीपूरमध्ये सापडली. त्यामुळे शिलाँगमध्ये नेमकं काय घडलं आणि राजाचा मृत्यू कसा झाला, हे आता लवकरच स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

हेही वाचा

सोनम इंदूरमधून हनिमूनला मेघालयात गेली, पण नवऱ्याचा थेट मृतदेहच सापडला अन् आता गाजीपुरात 17 दिवसांनी स्वत: मध्यरात्री धाब्यावर सापडली; पोलिसांनी सांगितलेल्या घटनाक्रमाने थरकाप