इंदापूर :  इंदापूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. जमिनीच्या वादातून जन्मदात्या (Indapur Crime News) आईला आणि वडिलांना त्यांच्याच दोन्ही मुलांनी भर रस्त्यात मारहाण केली आहे. इंदापूर शहरानजीक सलीम लॉन्सच्या परिसरात ही घटना घडली आहे. याप्रकरणी इंदापूर पोलीस (Indapur Crime News) ठाण्यात तुकाराम किसन राऊत या 65 वर्षीय वृद्धाच्या तक्रारीवरून आरोपी मुलगा संजय तुकाराम राऊत आणि राजेंद्र तुकाराम राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडिलांनी आई अंजना राऊत हिच्या नावावरील जमीन का विक्री केली याचा जाब विचारत जन्मदात्या मुलांनी हातातील लाकडी दांडक्याने भर रस्त्यावर वृद्ध वडिलांना मारहाण केली आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.(Indapur Crime News)

Continues below advertisement

Indapur Crime News:  दोघा मुलांनी वृद्ध आई-वडिलांना केली लाकडी दांडक्याने मारहाण 

मिळालेल्या माहितीनुसार, आईच्या नावावरती असलेली जमीन विकल्याच्या कारणावरून दोन मुलांनी आपल्याच वृद्ध आई-वडिलांना लाकडी दांडक्याने मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची घटना रविवारी (दि. ३०) सायंकाळी तरंगवाडी येथे घडली. याप्रकरणी वडिलांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्या दोघांविरुद्ध इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संजय तुकाराम राऊत व राजेंद्र तुकाराम राऊत (दोघे रा. माळवाडी नं.२, ता. इंदापूर) अशी आरोपींची नावे आहेत. तुकाराम किसन राऊत (वय ६५, रा. सरस्वतीनगर, इंदापूर) असे फिर्याद देणाऱ्या त्यांच्या वडिलांचे नाव आहे.(Indapur Crime News) पोलिसांनी या घटनेबाबत सांगितले की, फिर्यादी राऊत हे पत्नी अंजना यांच्यासह सरस्वतीनगर येथे राहतात. त्यांची दोन्ही मुले त्यांच्या कुटुंबासह स्वतंत्र राहतात. रविवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास तुकाराम राऊत हे आपल्या आजारी पत्नी अंजना समवेत तरंगवाडी गावच्या हद्दीत रस्त्यावरून जात होते. त्यावेळी त्यांची दोन्ही मुले कारमधून तेथे आली. आई अंजना हिच्या नावावरील जमीन का विकली? असा जाब विचारत दोघांनी लाकडी दांडक्याने आई वडिलांना मारहाण केली.

Indapur Crime News: विकलेली जमीन परत घ्या, नाहीतर... मुलांनी दिली जीवे मारण्याची धमकी

विकलेली जमीन परत घ्या, अन्यथा तुम्हाला आमचा हिसका दाखवतो, असं  म्हणत दोन्ही मुलांनी  शिवीगाळ, दमदाटी करून जीवे मारण्याची धमकी दिली. यावेळी आरडोओरडा आणि आवाज ऐकून नागरिक जमा झाले. त्यांच्यापैकीच एकाने पोलिसांना फोन केल्यानंतर पोलिस घटनास्थळी पोहोचले. या मारहाणीत तुकाराम राऊत यांना पाठीवर, तोंडावर, दोन्ही पायावर, डाव्या खांद्यावर दुखापत झाली. तर अंजना राऊत यांच्या उजव्या हाताच्या मनगटाजवळ व कमरेला मार लागल्याचे फिर्यादीमध्ये नमूद करण्यात आले आहे. मारहाणीची घटना घडत असताना जमलेल्या नागरिकांपैकी कोणीतरी व्हिडीओ काढला, तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.