Kolhapur Crime : कोल्हापूर जिल्ह्यात 2021 च्या तुलनेत 2022 मध्ये नोंदवलेल्या गुन्ह्यांची (Kolhapur Crime) संख्या वाढली आहे. कोल्हापूर पोलिसांनी (Kolhapur Police) दिलेल्या आकडेवारीवरून हे सिद्ध झाले आहे. दुसरीकडे, गुन्ह्यांचा उकल होण्यातही म्हणावी तशी वाढ झालेली नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले की, प्रत्येक गुन्ह्याची नोंद करण्याची यंत्रणा अधिक मजबूत करण्यात आली असून, त्यामुळे दरवर्षी गुन्ह्यांची नोंद होण्याचे प्रमाण वाढत आहे.


ते पुढे म्हणाले की, “गुन्हे दाखल झाल्याशिवाय गुन्हेगारांवर कारवाई होऊ शकत नाही. न्याय सुनिश्चित करण्यासाठी, पोलिसिंगच्या नियम पुस्तकानुसार गुन्हा नोंदवणे खूप महत्वाचे आहे. तथापि, गुन्ह्यांच्या प्रकरणांचा शोध घेताना पोलिस अनेकदा अपयशी ठरतात. कोल्हापूर पोलिसांकडून (Kolhapur Crime) मिळालेल्या आकडेवारीवरून असे दिसून येते की तपासाचे प्रमाण कमी आहे आणि दोषी सिद्ध होण्याचे प्रमाणही कमी आहे.


2022 मध्ये सशस्त्र दरोड्याच्या 110 प्रकरणांची नोंद झाली. तथापि, आतापर्यंत फक्त 66 प्रकरणांचा उलघडा झाला आहे. दुचाकी चोरीच्या प्रकरणांचा शोध घेण्याचे प्रमाण केवळ 29 टक्के आहे. खून, खुनाचे प्रयत्न, सरकारी अधिकाऱ्यांवरील हल्ले इत्यादी प्रमुख गुन्ह्यांमध्ये पोलिसांचा शोध 100 टक्के आहे. महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांच्या बाबतीत पकडण्याचे प्रमाण 99 टक्के आहे. महिलांवरील 563 गुन्ह्यांची नोंद झाली होती, तर 2021मध्ये 528 गुन्हे नोंदवले गेले होते. (Kolhapur Crime)


संशयिता ओळखीतील तरी अधिक महिला गुन्हे नोंदवण्यासाठी पुढे येत आहेत, यावरून त्यांचा पोलिस यंत्रणेवर असलेला विश्वास दिसून येतो. महिलांना न्याय मिळेल हे माहीत आहे, असे कोल्हापूरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.


अपघातांमध्ये 423 जणांचा मृत्यू 


गेल्यावर्षी 420 ठिकाणी झालेल्या 722 अपघातांमध्ये 423 जणांचा मृत्यू झाला. ज्यांना आता ब्लॅक स्पॉट घोषित करण्यात आले आहे. रस्त्यांमध्ये आवश्यक संरचनात्मक (structural) बदल करून हे ब्लॅक स्पॉट अपघातमुक्त करण्यासाठी संबंधित विभागांना सांगण्यात आले आहे.


इतर महत्वाच्या बातम्या 


Kolhapur Crime : लग्नाच्या आमिषाने महिला सहकाऱ्यावर अत्याचार; कळंबा जेल अधिकाऱ्याला बेड्या