एक्स्प्लोर

Ashok Kharat : 2022 साली साई संस्थानच्या कर्मचाऱ्याने जीवन संपवलं, आधी चार्जशिटमधून नाव वगळलं, आता पुन्हा तपासाचे आदेश, खरातचे पाय आणखी खोलात

Ashok Kharat : पत्नीशी सुरू असलेल्या कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर सासरे, मेहुणा आणि साडू यांच्याकडून त्यांना सातत्याने मानसिक छळ सहन करावा लागत होता.

Ashok Kharat : शिर्डी येथे कौटुंबिक वाद आणि सासरकडून होत असलेल्या छळाला कंटाळून ३७ वर्षीय तरुणाने २०२२ साली गळफास घेऊन आपलं जीवन संपवल्याची घटना घडली होती. या प्रकरणात आता महत्त्वाची घडामोड समोर आली असून, राहाता न्यायालयाने या गुन्ह्याचा पुन्हा नव्याने तपास करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे या प्रकरणात भोंदू अशोक खरात (Ashok Kharat) यांचा सहभाग होता का, याचा पुन्हा छडा लावला जाणार आहे.

Ashok Kharat :  जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्या 

विकास रामदास दिवटे (वय ३७, रा. शिर्डी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी त्यांचा भाऊ राजेंद्र दिवटे यांनी शिर्डी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनुसार, विकास हे साईसंस्थानमध्ये कार्यरत होते. पत्नीशी सुरू असलेल्या कौटुंबिक वादाच्या पार्श्वभूमीवर सासरे, मेहुणा आणि साडू यांच्याकडून त्यांना सातत्याने मानसिक छळ सहन करावा लागत होता. तसेच पत्नी व मुलाशी संपर्क साधण्यास अडथळे निर्माण केले जात होते आणि जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात असल्याचा आरोप करण्यात आला होता.(Ashok Kharat) 

या प्रकरणात शिर्डी पोलिसांनी सासरे, मेहुणा आणि भोंदू अशोक खरात यांच्यासह चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. आत्महत्येपूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्येही खरात यांचा उल्लेख असल्याचे समोर आले होते. मात्र, तपासादरम्यान पुरावे अपुरे ठरल्याने पोलिसांनी दाखल केलेल्या दोषारोपपत्रातून अशोक खरात यांचे नाव वगळण्यात आले होते. दरम्यान, या निर्णयाविरोधात पुन्हा तपासाची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर राहाता न्यायालयाने ही मागणी मान्य करत प्रकरणाचा पुनर्तपास करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयाच्या या आदेशानंतर शिर्डी पोलीस आता २०२२ मधील या आत्महत्येच्या प्रकरणाचा नव्याने तपास करणार असून, भोंदू अशोक खरात यांचा नेमका सहभाग होता का, याचा सखोल तपास करण्यात येणार आहे.

Ashok Kharat :  नेमकं प्रकरण काय?

कौटुंबिक वाद आणि सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या छळाला कंटाळून शिर्डीतील ३७ वर्षीय तरुणाने चार वर्षांपूर्वी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणी शिर्डी पोलिसांनी मृताच्या सासऱ्यांसह मेहुणा आणि भोंदू अशोक खरात यांच्यासह चौघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला होता. मात्र, तपासादरम्यान पुरावे अपुरे ठरल्याने खरातचे  नाव दोषारोपपत्रातून वगळण्यात आल्याची माहिती समोर आली होती. 

विकास रामदास दिवटे (वय ३७, रा. शिर्डी) असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी त्याचा भाऊ राजेंद्र दिवटे यांनी शिर्डी पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. तक्रारीनुसार, विकास दिवटे साईसंस्थानमध्ये कार्यरत होते आणि पत्नीशी घरगुती कारणांवरून त्यांचे वाद सुरू होते. या पार्श्वभूमीवर सासरे, मेहुणा आणि साडू यांच्याकडून त्यांना सातत्याने मानसिक छळ सहन करावा लागत होता. पत्नी व मुलाशी संपर्क साधण्यासही अडथळे निर्माण केले जात होते, तसेच जिवे मारण्याच्या धमक्याही दिल्या जात असल्याचे समोर आले होते.(Ashok Kharat) 

या वादात मीरगाव (ता. सिन्नर) येथील भोंदूबाबा अशोक खरात याचाही सहभाग असल्याचा उल्लेख फिर्यादीत करण्यात आला होता. विकास यांना या बाबाकडे नेण्यात आल्याचे सांगण्यात आले होते, त्यानेही त्यांना धमक्या देत त्रास दिल्याचा आरोप होता. या सततच्या मानसिक छळाला कंटाळून आणि बदनामीच्या भीतीने विकास दिवटे यांनी ९ जून २०२२ रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. घटनास्थळी पंचनामा करताना पोलिसांना सुसाइड नोटही सापडली होती. या प्रकरणात इतर तिघांविरुद्ध दोषारोपपत्र दाखल करण्यात आले असून, खरातचे नाव पुराव्याअभावी वगळण्यात आले असल्याचे पोलिस सूत्रांनी स्पष्ट केले.(Ashok Kharat) 

 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ह्रदयद्रावक घटना... लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी
ह्रदयद्रावक घटना... लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी
ऑनलाईन जुगारात तरुण कर्जबाजारी! चोरी करुन कर्ज फेडण्याचा प्रकार उघड, रायगड पोलिसांची कारवाई 
ऑनलाईन जुगारात तरुण कर्जबाजारी! चोरी करुन कर्ज फेडण्याचा प्रकार उघड, रायगड पोलिसांची कारवाई 
धक्कादायक! मुंबईत एका भोंदूबाबाला अटक, महिलांना बेशुद्ध करुन अत्याचार करत असल्याचा आरोप
धक्कादायक! मुंबईत एका भोंदूबाबाला अटक, महिलांना बेशुद्ध करुन अत्याचार करत असल्याचा आरोप
Thane Crime News :कल्याण टिटवाळ्यातील हायप्रोफाईल सोसायटीत मुंबई पोलिसांची धाड; 6 कोटींच्या अमली पदार्थांच्या 5 हजार गोळ्या जप्त, महिलेला अटक
कल्याण टिटवाळ्यातील हायप्रोफाईल सोसायटीत मुंबई पोलिसांची धाड; 6 कोटींच्या अमली पदार्थांच्या 5 हजार गोळ्या जप्त, महिलेला अटक
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
IPS Transfer : राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
राज्यातील नऊ IPS अधिकाऱ्यांच्या बदल्या; कोल्हापूर, सातारा, सांगली, गडचिरोलीसह अनेक जिल्ह्यांत फेरबदल
Female CM India: काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
काँग्रेस आणि भाजप, कोणत्या राज्यात कोणत्या पक्षानं मुख्यमंत्री पदावर महिलांना दिली संधी?
बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
Video: बनावट जातप्रमाणपत्र, नॉट रिचेबल सहर शेख माध्यमांसमोर; म्हणाल्या, आरोप बिनबुडाचे, वानखेडेतील फोटोवरही स्पष्टीकरण
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
ह्रदयद्रावक घटना... लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी
ह्रदयद्रावक घटना... लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी
Tushar Doshi : मोठी बातमी : साताऱ्याचे SP तुषार दोशी यांची बाजूच्या जिल्ह्यात बदली, एकनाथ शिंदेंच्या सभेदिवशी साताऱ्यात मोठी घडामोड
साताऱ्याचे SP तुषार दोशी यांची बाजूच्या जिल्ह्यात बदली, एकनाथ शिंदेंच्या सभेदिवशी साताऱ्यात मोठी घडामोड
'तोपर्यंत इराणशी चर्चा होऊच शकत नाही..' मध्यस्थी करणाऱ्या असीम मुनीरांनी फोनवरून ट्रम्पना थेट सुनावलं, म्हणाले, मी विचार करतो; अनेक आशियाई देश दबावात, तेल-वायू पुरवठा थांबला, कारखाने बंद पडले
'तोपर्यंत इराणशी चर्चा होऊच शकत नाही..' मध्यस्थी करणाऱ्या असीम मुनीरांनी फोनवरून ट्रम्पना थेट सुनावलं, म्हणाले, मी विचार करतो; अनेक आशियाई देश दबावात, तेल-वायू पुरवठा थांबला, कारखाने बंद पडले
Video: मालकीण प्रिती झिंटाने 'जादू की झप्पी' देताच अर्शदीपचं 'आनंद माझ्या पोटात मावेना'! थेट मैदानात बल्ले बल्ले, मोहम्मद शमी हसत हसत तोंडाकडं पाहतच राहिला
Video: मालकीण प्रिती झिंटाने 'जादू की झप्पी' देताच अर्शदीपचं 'आनंद माझ्या पोटात मावेना'! थेट मैदानात बल्ले बल्ले, मोहम्मद शमी हसत हसत तोंडाकडं पाहतच राहिला
Embed widget