Imtiaz Jaleel छत्रपती संभाजीनगर : नारेगावमध्ये राहणाऱ्या लोकांनामी धन्यवाद देतो, त्यांनी कारवाई शांतपूर्ण होऊ दिली. महानगर पालिकेनेजी कारवाई केली त्याला शांततेने प्रतिसाद दिला. मतीन (Mateen Patel) कुटुंबीय यांनी फुलांचा वर्षाव केला तो त्यांना नव्हता, त्यांच्या अन्यायाला होता. मिडीयाचा रोल सुद्धा निंदनीय आहे. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी हे कृत्य केलेले आहे. माझा कोर्टाला देखील प्रश्न आहे. मतीन यांच्या वकिलांनी 15 दिवसांची मुदत मागीतली होती. मनपा प्रशानाच्या वकिलांनी 7 दिवसाचा वेळ देतो म्हणून कोर्टात सांगितले होते. मग अशी काय घाई होती कि 24 तासात घर पाडण्यात आले? असासंतप्तसवालकरत एआयएमआयएम पक्षाचे माजी खासदार आणिनेते इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनीउपस्थितकेलाआहे. (Imtiaz Jaleel on Nida Khan Home Demolition)

Imtiaz Jaleel: अशी काय घाई होती किअवघ्या 24 तासाच्याआतघरपाडलं?

छत्रपती संभाजीनगरमध्ये एआयएमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांचे घर आणि कार्यालय आज (बुधवारी) सकाळी बुलडोझरने पाडण्यात आले. ही कारवाई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामाच्या प्रकरणात केली आहे. नाशिकमधील टीसीएस कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतर (chhatrapati sambhajinagar) प्रकरणातील आरोपी निदा खानला 7 मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली होती. मतीन पटेलने तिला आपल्या घरात आश्रय दिला होता. यानंतर 9 मे रोजी महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस बजावली होती आणि 72 तासांत उत्तर मागितले होते.(chhatrapati sambhajinagar) आज मतिन खानच्या त्या घरावर देखील बुलडोजर चालवण्यात आलं, एकंदरीतयाप्रकरणावरून इम्तियाज जलील यांनीपत्रकारपरिषदघेतयाप्रकरणावरभाष्यकेलंआहे.

हायकोर्टच्या न्यायाधिशांना हे मान्य आहे की नाही? (Imtiaz Jaleel on Nida Khan Home Demolition)

दरम्यान, दुपारी 12 वाजताच्यासुमारास नोटीस लावण्यात आली, त्यानंतर 24 तासही होऊ दिले नाहीत आणि तुम्ही कारवाई केली? मतीनवर (Mateen Patel) आरोप सिद्ध झाले नाहीत. यावर फक्त आरोप होतो आणि त्याला दोषी ठरवण्याचं काम केले जातंय. याचा आम्ही निषेध करतो. राज्यात उत्तर प्रदेशसारखं कल्चर सुरू आहे. आरोप झाले की त्याचे घर पडण्याचं. जस्टिस गवई यांनी 2024 मध्ये या बाबत जजमेंट दिले आहे. हायकोर्टच्या न्यायाधिशांना हे मान्य आहे की नाही? राज्यात गुंडाराज आहे का? हे गुंडाराज नाहीतर काय आहे? मी गेलो असतो तर लोकांनी विरोध केला असता. ते घर आम्ही बांधून देणार आहोत. सरकारलाही आम्हाला मॅसेज द्यायचा आहे, गुंडगिरी करून तुम्ही घर पाडू शकता, मात्र आम्ही ते उभारू, असेही इम्तियाज जलील म्हणाले.

इम्तियाज जलीलसाठी वेगळा कायदा आहे का? (Imtiaz Jaleel on Mateen Patel Home Demolition)

शहरात 40 टक्के घर अनधिकृत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या अनेकांची घर अनधिकृत आहेत. त्यांच्यावर कारवाई होत नाही मग इम्तियाज जलीलसाठी वेगळा कायदा आहे का? असासंतप्तसवालदेखीलत्यांनीयावेळीउपस्थितकेला.