एक्स्प्लोर

Imtiaz Jaleel : एमआयएम नगरसेवक मतीन पटेलांवरील कारवाईवरून इम्तियाज जलील भडकले; म्हणाले, न्यायाधिशांना हे मान्य आहे का?

मनपा प्रशासनाच्या वकिलांनी 7 दिवसाचा वेळ देतो म्हणून कोर्टात सांगितले होते. मग अशी काय घाई होती कि 24 तासात घर पाडण्यात आले? असा संतप्त सवाल करत माजी खासदार इम्तियाज जलील यांनी उपस्थित केला आहे.

Imtiaz Jaleel छत्रपती संभाजीनगर : नारेगावमध्ये राहणाऱ्या लोकांना मी धन्यवाद देतो, त्यांनी कारवाई शांतपूर्ण होऊ दिली. महानगर पालिकेनेजी कारवाई केली त्याला शांततेने प्रतिसाद दिला. मतीन (Mateen Patel) कुटुंबीय यांनी फुलांचा वर्षाव केला तो त्यांना नव्हता, त्यांच्या अन्यायाला होता. मिडीयाचा रोल सुद्धा निंदनीय आहे. आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी हे कृत्य केलेले आहे. माझा कोर्टाला देखील प्रश्न आहे. मतीन यांच्या वकिलांनी 15 दिवसांची मुदत मागीतली होती. मनपा प्रशानाच्या वकिलांनी 7 दिवसाचा वेळ देतो म्हणून कोर्टात सांगितले होते. मग अशी काय घाई होती कि 24 तासात घर पाडण्यात आले? असा संतप्त सवाल करत एआयएमआयएम पक्षाचे माजी खासदार आणि नेते इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी उपस्थित केला आहे. (Imtiaz Jaleel on Nida Khan Home Demolition)

Imtiaz Jaleel: अशी काय घाई होती कि अवघ्या 24 तासाच्या आत घर पाडलं?

छत्रपती संभाजीनगरमध्ये एआयएमआयएम नगरसेवक मतीन पटेल यांचे घर आणि कार्यालय आज (बुधवारी) सकाळी बुलडोझरने पाडण्यात आले. ही कारवाई महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामाच्या प्रकरणात केली आहे. नाशिकमधील टीसीएस कंपनीतील अत्याचार आणि धर्मांतर (chhatrapati sambhajinagar) प्रकरणातील आरोपी निदा खानला 7 मे रोजी छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आली होती. मतीन पटेलने तिला आपल्या घरात आश्रय दिला होता. यानंतर 9 मे रोजी महानगरपालिकेने अनधिकृत बांधकामाबाबत नोटीस बजावली होती आणि 72 तासांत उत्तर मागितले होते.(chhatrapati sambhajinagar) आज मतिन खानच्या त्या घरावर देखील बुलडोजर चालवण्यात आलं, एकंदरीत या प्रकरणावरून इम्तियाज जलील यांनी पत्रकार परिषद घेत या प्रकरणावर भाष्य केलं आहे.

हायकोर्टच्या न्यायाधिशांना हे मान्य आहे की नाही? (Imtiaz Jaleel on Nida Khan Home Demolition)

दरम्यान, दुपारी 12 वाजताच्या सुमारास नोटीस लावण्यात आली, त्यानंतर 24 तासही होऊ दिले नाहीत आणि तुम्ही कारवाई केली? मतीनवर (Mateen Patel) आरोप सिद्ध झाले नाहीत. यावर फक्त आरोप होतो आणि त्याला दोषी ठरवण्याचं काम केले जातंय. याचा आम्ही निषेध करतो. राज्यात उत्तर प्रदेशसारखं कल्चर सुरू आहे. आरोप झाले की त्याचे घर पडण्याचं. जस्टिस गवई यांनी 2024 मध्ये या बाबत जजमेंट दिले आहे. हायकोर्टच्या न्यायाधिशांना हे मान्य आहे की नाही? राज्यात गुंडाराज आहे का? हे गुंडाराज नाहीतर काय आहे? मी गेलो असतो तर लोकांनी विरोध केला असता. ते घर आम्ही बांधून देणार आहोत. सरकारलाही आम्हाला मॅसेज द्यायचा आहे, गुंडगिरी करून तुम्ही घर पाडू शकता, मात्र आम्ही ते उभारू, असेही इम्तियाज जलील म्हणाले.

इम्तियाज जलीलसाठी वेगळा कायदा आहे का? (Imtiaz Jaleel on Mateen Patel Home Demolition)

शहरात 40 टक्के घर अनधिकृत आहेत. भारतीय जनता पार्टीच्या अनेकांची घर अनधिकृत आहेत. त्यांच्यावर कारवाई होत नाही मग इम्तियाज जलीलसाठी वेगळा कायदा आहे का? असा संतप्त सवाल देखील त्यांनी यावेळी उपस्थित केला.

15 वर्षांपासून 'एबीपी माझा'मध्ये कार्यरत....
Read More
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
धक्कादायक! धोंड्याच्या महिन्यात भाऊजीलाच संपवलं; 3 लाखांत मेहुण्यानेच दिली सुपारी, अपघाताचा बनावही केला
धक्कादायक! धोंड्याच्या महिन्यात भाऊजीलाच संपवलं; 3 लाखांत मेहुण्यानेच दिली सुपारी, अपघाताचा बनावही केला
मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 5 कोटींचे 3.2 किलो सोनं जप्त, एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांसह 7 जण अटकेत
मुंबई विमानतळावर डीआरआयची मोठी कारवाई; 5 कोटींचे 3.2 किलो सोनं जप्त, एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांसह 7 जण अटकेत
Maharashtra Live blog updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा वाचा फक्त एका क्लिकवर...
Maharashtra Live blog updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या घटनांचा आढावा वाचा फक्त एका क्लिकवर...
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Maharashtra Drought Alert : एल निनोचा प्रभाव वाढला; राज्यातील अनेक तालुक्यांवर दुष्काळाचं सावट | ABP Majha
Jaykumar Gore Solapur : मी फक्त पोस्टमन, मी आदेशाप्रमाणे कार्यक्रम लावतो; जयकुमार गोरेंचे वक्तव्य
Shivrajyabhishek Sohala 2026 : किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा सोहळा, लाखो शिवभक्तांची मांदियाळी | Special Report
Khan Sir Case : चार दिवसानंतर खान सर कोर्टासमोर हजर... सगळं प्रकरण काय? | Special Report
Koyana Dam : कोयनेचं पाणी आटलं, 1952 सालचं जुनं बामणोली दिसलं Special Report
Advertisement

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
India Alliance: पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
पेट्रोल, गॅस, डिझेल दरवाढीचा भडका ते महागाईचा आगडोंब ते विद्यार्थ्यांचा आक्रोश; इंडिया आघाडीने हुंकार भरला, मोदी सरकारला देशव्यापी घेरण्याची तयारी, उद्याच्या बैठकीत 23 पक्ष एकटवणार
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
एक्स PSI ते तहसीलदार, लाचखोर अधिकारी विजय चव्हाण नेमकं कुठले; सोशल मीडियात सक्रीय, फॉलोअर्स किती?
हाच 'तो' व्यक्ती ज्यानं मला धमकी दिली, पहाटे तीन वाजता बाबा अझीमच्या घरी पहाटे तीनला नेत दाऊद इब्राहिमला फोन करायला लावला; ललित मोदीचा थेट नाव आणि फोटो शेअर करत सनसनाटी गौप्यस्फोट
हाच 'तो' व्यक्ती ज्यानं मला धमकी दिली, पहाटे तीन वाजता बाबा अझीमच्या घरी पहाटे तीनला नेत दाऊद इब्राहिमला फोन करायला लावला; ललित मोदीचा थेट नाव आणि फोटो शेअर करत सनसनाटी गौप्यस्फोट
India vs Afghanistan: अफगाणी फिरकीत वेगवान तोफ धडाडली! रशीद खान घराघरात पोहोचला, पण कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध पाच बळी घेत इतिहास रचलेला तो पहिला अफगाण गोलंदाज कोण?
अफगाणी फिरकीत वेगवान तोफ धडाडली! रशीद खान घराघरात पोहोचला, पण कसोटी क्रिकेटमध्ये भारताविरुद्ध पाच बळी घेत इतिहास रचलेला तो पहिला अफगाण गोलंदाज कोण?
गुलाबी आँखे जो तेरी देखी..; नागपुरात मुख्यमंत्र्यांनी गायले दोन गाणे; दुसरं गाणं धर्मेंद्रचं सुपरहीट, टाळ्या वाजवून दाद
गुलाबी आँखे जो तेरी देखी..; नागपुरात मुख्यमंत्र्यांनी गायले दोन गाणे; दुसरं गाणं धर्मेंद्रचं सुपरहीट, टाळ्या वाजवून दाद
जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतात, जय भीमच्या घोषणा देतात ही अराजकता आहे? फडणवीसांनी थोडा विचार करावा, महाराष्ट्राचे सीएम आहात, यूपीचे नाही; मुख्यमंत्र्यांच्या टीकेवर अभिजितचा पलटवार
जे आंबेडकरांचे पुस्तक घेऊन चालतात, जय भीमच्या घोषणा देतात ही अराजकता आहे? फडणवीसांनी थोडा विचार करावा, महाराष्ट्राचे सीएम आहात, यूपीचे नाही; मुख्यमंत्र्यांच्या 'अराजकतावादी' टीकेवर अभिजितचा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 जून 2026 | रविवार

Embed widget