Igatpuri Crime News :  इगतपुरी शहरातूनएकअतिशयधक्कादायकप्रकारसमोरआलाआहे. यात अल्पवयीन युवतीवर अत्याचार (Igatpuri Crime News) केल्याच्या प्रकरणाने एकच खळबळ उडाली आहे. मैत्रीचंनातंनिर्माण करत्यात विश्वास संपादन केला. सोबतच धर्म लपवून फसवणूक केल्याचा आरोप (Crime News) पिडीतेकडूनकेलाजातआहे. धक्कादायकबाब म्हणजे 2022 पासून अत्याचार केल्याचा आरोप (Crime) याप्रकरणीकरण्यातआलाआहे. याप्रकरणी संशयित आरोपी मुस्तफा शेख याच्यावर पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यातआलाअसून इगतपुरी पोलिसांकडून घटनेचासखोल तपास सुरुआहे.

Continues below advertisement

Igatpuri Crime News : कुटुंबाला संपवण्याची धमकी, धर्मांतर करण्यासाठीही वेळोवेळी दबाव

मिळालेल्यामाहितीनुसार, 2022 मध्ये युवती अल्पवयीन असताना तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार देण्यातआलीआहे. तरयाबाबतकुठे सांगितल्यास कुटुंबाला संपवण्याची धमकी देत वारंवार अत्याचार केल्याचं तक्रारीतम्हटलेआहे. सोबतच घरात घुसून दोन वेळा जबरदस्तीने बलात्कार केल्याचा देखील आरोप करण्यातआलाआहे. दुसरीकडे धर्मांतर करण्यासाठीही वेळोवेळी दबाव टाकल्याची फिर्याद देण्यातआलीआहे. 19 वर्षीय युवतीनेयाप्रकरणी इगतपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर संशयित आरोपी मुस्तफा शेख याच्यावर कारवाईकरत गुन्हा दाखल करण्यातआला. पोस्को अंतर्गत हा गुन्हा दाखल करण्यातआलाअसून इगतपुरी पोलिसांकडून घटनेचा तपास सुरुआहे. मात्रयाघटनेनेपरिसरातसंतापाचीलाटपसरलीआहे.

Continues below advertisement

Pune Accident News : भोर तालुक्यात भीषण अपघात; डंपरच्या धडकेत आजोबा-नातीचा मृत्यू

पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यात हातवे-तांभाड रस्त्यावर देऊळवाडीजवळ डंपरने दुचाकीला धडक (Accident News) दिल्याने झालेल्या अपघातात आजोबा आणि नऊ वर्षीय नातीचा मृत्यू झाला. शिवाजी नामदेव शिळीमकर (69) व तन्वी नितीन शिळीमकर (9) अशी मृतांची नावे असून दोघे आंबेगावहून तांभाडकडे जात होते. पाठीमागून आलेल्या डंपरने जोरदार धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. स्थानिकांनी त्यांना नसरापूर येथील रुग्णालयात नेले; मात्र डॉक्टरांनी मृत घोषित केले. या प्रकरणी राजगड पोलिसांनी डंपर चालक आकाश भुसने याला ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे. (Pune Accident News)

 इतर महत्वाच्या बातम्या