Hingoli FDA Action: हिंगोलीच्या प्रसिद्ध खिचडी-भजीच्या हॉटेलमध्ये खिचडीमध्ये चक्क आळ्या आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महाराजा भजियेवाले या हॉटेलमधील खिचडीमध्ये आळ्या आढळल्यानंतर भाजप (BJP) पदाधिकारी प्रीती जयस्वाल यांनी याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केलाय. दरम्यान, या प्रकाराची गंभीर दखल घेत अन्न व औषध प्रशासनाने हॉटेलची तपासणी केली असता तपासणीदरम्यान हॉटेलमध्ये स्वच्छतेचे अत्यंत गंभीर उल्लंघन होत असल्याचे आढळून आले. हॉटेलमध्ये अस्वच्छता आणि अन्नपदार्थ हाताळताना आवश्यक स्वच्छतेचे निकष पाळले जात नसल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले आहे. यानंतर अन्न व औषध प्रशासनाने कारवाई करत हॉटेलचा परवाना निलंबित केला असून हॉटेल बंद करण्याचे आदेश दिले आहेत. (Hingoli FDA Action)

Continues below advertisement

दरम्यान, हिंगोलीत प्रसिद्ध असलेल्या खिचडी-भजीच्या चवीवर आता अस्वच्छतेचा डाग लागला असून, नागरिकांच्या आरोग्याशी खेळ करणाऱ्या हॉटेल चालकांवर प्रशासन किती कठोर कारवाई करणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. 

FDA Action:  अन्न वाढण्यासाठी न्यूजपेपरचा वापर, गंभीर त्रुटींमुळे महाराजा हॉटेलचा FSSAI परवाना तात्काळ निलंबित 

Continues below advertisement

हिंगोलीत महाराजा हॉटेलवर अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई करण्यात आली आहे. तपासणीत अन्न हाताळणाऱ्या कर्मचाऱ्यांची वैद्यकीय प्रमाणपत्रे नसणे, ॲप्रन आणि हातमोजे न वापरणे, हात धुण्याची सुविधा नसणे, अस्वच्छ परिसर आणि उघड्या कचराकुंड्या अशा गंभीर त्रुटी आढळल्या आहेत. तसंच फरशीवर धूळ-माती आणि कचरा साचलेला होता, कीटक नियंत्रणाची नोंद नव्हती आणि अन्न वाढण्यासाठी न्यूजपेपरचा वापर होत असल्याचही समोर आलं. या गंभीर त्रुटींमुळे महाराजा हॉटेलचा FSSAI परवाना तात्काळ निलंबित करण्यात आला असून, हॉटेल बंद करण्यात आलं आहे.

या कारवाईत, कर्मचाऱ्यांची वैद्यकीय प्रमाणपत्रे नाहीत. ॲप्रन, हातमोज्यांचा वापर नाही, हात धुण्याची सुविधा नाही, सफाई आणि कीटक नियंत्रणाचे रेकॉर्ड नाही, उघड्या कचराकुंड्या, अस्वच्छ ड्रेनेज, फरशीवर धूळ-माती आणि कचरा आढळूनआलाअसून FSSAI परवाना देखील दर्शनी भागात लावलेलाआढळून लालेला नाही. तसेच अन्नासाठी न्यूजपेपरचा वापर होतअसल्याने FSSAI नेकारवाईचाबडगाउगारत परवाना तात्काळ निलंबित करण्याचेआदेशदिलेआहे. तसेच महाराजा हॉटेल देखील बंद करण्यातआलेआहे.

इतर महत्वाच्या बातम्या